वयाची सत्यता तपासणाऱ्या ‘टीडब्लूथ्री’वरच आता प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली
वयचोरीची प्रकरणे सध्या प्रत्येक खेळात पाहायला मिळतात. टेनिसविश्वही यातून सुटलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस महासंघाने (AITA) वयचोरी रोखण्यासाठी ‘टीडब्लूथ्री’ Tennis-TW3 | चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, तज्ज्ञांनी ‘टीडब्लूथ्री’वर शंका उपस्थित केली आहे. या चाचणीपेक्षा ‘एफईएलएस पद्धत’ FELS | किंवा ‘एपिजेनेटिक क्लॉक’ epigenetic clock | अधिक विश्वसनीय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
‘टीडब्लू ३’ Tennis-TW3 | म्हणजे टॅनर व्हाइटहाउस ३ (Tanner Whitehouse 3). या चाचणीवरून तज्झांचे दोन गट पडले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाही (IOC) वाटते, की ‘टीडब्लू ३’ बऱ्याचअंशी अनिर्णायक आहे. अर्थात, या चाचणीचा व्यापक स्वरूपात उपयोग केला जातो.
Tennis-TW3 |देशातील प्रमुख क्रीडा संघटना टीडब्लूथ्री चाचणीचा उपयोग करतात. यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) खेळाडूंची ‘टीडब्लू ३’ चाचणी करतात.
काय आहे टीडब्लू ३ चाचणी?
हाडांच्या परिपक्वतेचे निष्कर्ष टॅनर-व्हाइटहाउस (TW3) किंवा एफईएलएस (FELS) द्वारे काढली जातात. रक्ताचे नमुने, अल्ट्रासाउंड आणि एमआरआय बिगरविकिरण पद्धतीने केले जाते. मात्र, आयओसीच्या मतानुसार, तेही फारसे अचूक नाहीत.
हेही वाचा… भारतीय टेनिसची एके47
‘टीडब्लूथ्री’मध्ये व्यक्तीच्या हाडांची परिपक्वता तपासण्यासाठी डावा हात आणि मनगटाचा एक्स-रे काढला जातो. यातून व्यक्तीच्या वयाची निश्चिती केली जाते. मनगटाच्या स्कॅनमध्ये वयाचा अंदाज २० हाडांच्या तपासणीतून काढला जातो. ही हाडे सुरुवातीला वेगवेगळी असतात. मात्र, वाढत्या वयानंतर ती एकत्र होतात.
रेडिओग्राफसाठी डावा हात आणि मनगटाचा उपयोग केला जातो. त्यामागे हे कारण आहे, की बहुतांश लोकांचा उजवा हात अधिक सक्रिय असतो. अशा वेळी डाव्या हाताच्या तुलनेत उजवा हात जखमी होण्याची शक्यता अधिक असते.
डॉ. सुनीता कल्याणपूर आणि त्यांचे रेडिओलॉजिस्ट पती अर्जुन कल्याणपूर यांनी एआयएफएफ (AIFF)साठी सुमारे तीन हजार फुटबॉलपटूंची टीडब्लू ३ (TW3) चाचणी केली आहे. त्यांनीही मान्य केलं, की ही चाचणी शंभर टक्के योग्य नाही. मात्र, या चाचणीचा वयनिश्चितीचा अंदाज बऱ्यापैकी चांगला आहे.
अर्जुन कल्याणपूर यांनी सांगितले, ‘‘गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात खूप बदल झाले आहेत. आम्ही डेन्मार्कमधील एका सॉफ्टवेअरचा उपयोग करतो. प्रक्रिया बऱ्यापैकी चांगली आहे. यात एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. विशेषत: मुलांनाही फारशी जोखीम नसते. सुरुवातीला वयाचा फरक किमान चार वर्षांपर्यंत असायचा. आता फार तर सहा ते नऊ महिन्यांचा असतो.’’
Tennis-TW3 |तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यातून आलेला वयाचा निष्कर्ष आणि आणि मूळ वयात दोन-तीन वर्षांचा फरक असू शकतो.
मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे फिजिओ अमांडा जॉन्सन म्हणाले, ‘‘ज्या मुलाचा वेगाने विकास होतो, तो वयाच्या १३ व्या वर्षीच १६ वर्षांचा दिसू शकतो. संशोधनांती असे समजले आहे, की एखाद्या सांघिक खेळात जी मुलं मोठी आणि मजबूत असतात, त्यांची निवड होण्याची शक्यता अधिक असते. अशी मुले चाचणीदरम्यान जैविक वयापेक्षा अधिक परिपक्व असतात.’’
अमांडा यांनी हेही सांगितले, की ‘एमयूएफसी’ने (MFUFC) हाडे आणि जैविक वय यातील तपासणीवर अभ्यासही केला होता.
ते म्हणाले, ‘‘या अभ्यासात असे समजले, की सुमारे ३० टक्के खेळाडूंची वाढ एक तर उशिरा होते किंवा लवकर होते. अशा वेळी वयनिश्चिती समूहात प्रशिक्षणातून गेलेल्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षणातील निश्चित आहाराचा लाभ घेता येत नाही.’’
Tennis-TW3 | आयओसीने जून २०१० मध्ये या मुद्द्यावर सांगितले, ‘‘वेगवेगळ्या मुलांच्या वाढीचा वेग वेगवेगळा असतो. एक्स-रे स्कॅनिंगद्वारे हाडांच्या वयाचं आकलन मर्यादित आहे. यामुळे जैविक वयाचा अचूक मूल्यांकन होत नाही.
Tennis-TW3 | लखनौचे स्पोर्ट्स मेडिसिन अभ्यासक डॉ. सरनजित सिंह यांनी सांगितले, की यासाठी ‘एपिजेनेटिक क्लॉक’ (epigenetic clock) ही पद्धत अधिक अचूक आहे.
ते म्हणाले, ‘‘एपिजेनेटिक क्लॉक (epigenetic clock) मध्ये आपण मिथाइल समूहांच्या आण्विक मार्करला पाहतो. यातून डीएनएला जोडताही येतं आणि विलगही करता येतं. डीएनए मार्करच्या अभ्यासाला एपिजेनेटिक्स (epigenetics ) म्हंटले जाते. सध्याच्या काळात हे अभ्यासाचे वेगळे आणि सक्रिय क्षेत्र आहे.’’
Popular Post...
बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी बिबळ्या नावाने ओळखला जाणारा प्राणी म्हणजेच बिबट्या (Leopard). त्याला पँथेरा पार्ड्स (Panthera pardus)...
आसन म्हणजे नक्की काय?
आसन म्हणजे नक्की काय? आसनांचा विचार करण्यापूर्वी आसन म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूण आसने किती, मानवाला...
ओमकाराचे महत्त्व | What are benefits of OM?
What are benefits of OM? ओमकाराचे महत्त्व | What are benefits of OM ओमकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनम...
100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?
100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे? आपल्याला वारा जाणवतो, पण तो कधी दिसत नाही. तो पाहायचा असेल, तर मी...
What is Surya bhedan Pranayam? सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?
सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय? What is Surya bhedan Pranayam? मागच्या भागात आपण प्राणायामचे महत्त्व जाणून घेतले, तसेच हिवाळ्यात कुठले श्वसनाचे...
शीतली प्राणायाम कसा करावा?
उन्हाळा व योगाभ्यास उन्हाळा ऋतू म्हंटला, की खरं तर मुलांची खूप मज्जा असते. शाळेला सुटी... नुसती धम्माल. मात्र हेही लक्षात...
अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी
Mount Everest seresi part 6 | अरुणिमा सिन्हा... अदम्य साहसाचं दुसरं नाव. तुमचे पाय कापले आणि कुणी सांगितलं, जा डोंगर...
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही?
भारताने काही राष्ट्रीय मानके निश्चित केलेली आहेत. या मानकांमध्ये राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय गीत वगैरे वगैरेंचा समावेश आहे. आपण...
जगातील सर्वात मोठे जंगल कोणते?
जगातील सर्वात मोठे जंगल कोणते, असा प्रश्न विचारला तर ते अमेझॉन वर्षावन (Amazon rainforest) आहे. यालाच इंग्रजीत अमेझॉनिया (Amazonia) किंवा...
ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती
ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती मेलबर्न : बेलारूसच्या अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने 29 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन-2023...
Comments 3