Cricket

front-foot no-balls | आता फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर

फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर!

दुबई ः क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय मैदानी अंपायर घेणार नाहीत. आता हा निर्णय टीव्ही अंपायर अर्थात थर्ड अंपायर करणार आहेत. TV umpire to call front-foot no-balls | या निर्णयाची अंमलबजावणी इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेपासून करण्यात येणार आहे. आयसीसीने 5 ऑगस्ट 2020 रोजी हा निर्णय जाहीर केला.

TV umpire to call front-foot no-balls | कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय मैदानातील अंपायरऐवजी टीव्ही अंपायर घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सांगितले, की इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेदरम्यान फ्रंटफूट नोबॉलच्या तंत्राचे अवलोकन केले जाईल. नंतर ठरवले जाईल, की टीव्ही अंपायरद्वारे हा निर्णय पुढे सुरू ठेवायचा किंवा नाही.

‘‘इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यानच्या कसोटी मालिकेत फ्रंटफूट नोबॉल तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. दोन्ही संघांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे.’’ – आयसीसीचे ट्विट

TV umpire to call front-foot no-balls | नुकत्याच झालेल्या इंग्लंड-आयर्लंड दरम्यानच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतही या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी 2019 मध्ये भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान मर्यादित षटकांच्या मालिकेतही हा प्रयोग करण्यात आला होता.

असा घेतला जाईल निर्णय

TV umpire to call front-foot no-balls | गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर त्याच्या फ्रंटफूट लँडिंग पोजिशनवर टीव्ही अंपायरची नजर असेल. चेंडू नोबॉल असेल तर तशी सूचना मैदानी अंपायरला केली जाईल. कारण मैदानी अंपायरला आता फ्रंटफूट नोबॉलवर त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसेल. मात्र अन्य नोबॉलवर निर्णय घेण्याचा अधिकार मैदानी अंपायरला असेल.

TV umpire to call front-foot no-balls | फेब्रुवारी 2020 मध्येच फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय टीव्ही अंपायरकडे सोपविण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्या वेळी चीनवगळता कुठेही करोना महामारीचा प्रभाव नव्हता. भारत – वेस्ट इंडीज सामन्यातही या प्रयोगाची अंमलबजावणी झाली होती. त्याच वेळी आयसीसीने स्पष्ट केले होते, की हा प्रयोग सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यांत केला जाईल. इंग्लंड- पाकिस्तान कसोटी सामन्याद्वारे आता हा प्रयोग अंतिम टप्प्यात येईल.

जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या क्रिकेट सामन्यांत टीव्ही अंपायरकडे फ्रंटफूट नोबॉलवर निर्णय घेण्याचा अधिकार सोपविण्यात आला होता. त्या वेळी 12 सामन्यांत चाचणी घेण्यात आली होती. यात 4,717 चेंडू टाकण्यात आले होते. त्यात 13 नोबॉल होते.

का घेतला हा निर्णय?

TV umpire to call front-foot no-balls | क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग होत आहे. निर्णयात अचूकताही येत आहे. असे असले तरी पूर्ण क्षमतेने तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. खेळाडूंनाही थर्ड अंपायरकडे दाद मागण्याचे अधिकार मर्यादितच आहेत. त्यामुळे बहुतांश निर्णय मैदानी अंपायरकडेच आहेत. मात्र, एक मानवी चूक संपूर्ण सामन्यावर परिणाम करू शकते, याचे अनेक दाखले आहेत.

मैदानी अंपायरला मर्यादा आहेत. विशेषतः नोबॉलच्या बाबतीत अनेकदा निर्णय चुकले आहेत. निर्णायक सामन्यांत चुकीच्या निर्णयामुळे मैदानी अंपायरवर टीकाही झाली आहे. त्यामुळेच आयसीसीने यात अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणजे थर्ड अंपायरवर सोपविलेला फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय.

आयसीसीचे महाप्रबंधक जोफ अलार्डिस (Geoff Allardice) यांनी सांगितले, की क्रिकेटमध्ये सामनाधिकाऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाची चांगली परंपरा राहिली आहे. मला विश्वास आहे, की या तंत्रज्ञानाच्या प्रयोगामुळे फ्रंटफूट नोबॉल निर्णयातील चुका कमी होतील.

नोबॉल न टाकणारा कपिलदेव एकमेव भारतीय गोलंदाज

क्रिकेटच्या इतिहासात कपिलदेव एकमेव भारतीय गोलंदाज आहे ज्याने एकही नोबॉल टाकलेला नाही. जगात असे खूप कमी गोलंदाज आहेत, ज्यात कपिलदेवचा समावेश आहे. कपिल देवने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 131 कसोटी सामने आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. कपिलदेवबरोबरच इंग्लंचा इयान बोथम, पाकिस्तानचा इम्रान खान, ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली, वेस्ट इंडीजचा लेन्स गिब्स यांनीही कारकिर्दीत एकदाही नोबॉल टाकलेला नाही.


हेही वाचा… झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून देव खेळला


कारकिर्दीत एकही नोबॉल न टाकलेले गोलंदाज

  • कपिलदेव (भारत) ः 131 कसोटी व 225 वनडे सामने
  • इयान बोथम (इंग्लंड) ः 102 कसोटी सामने आणि 116 वनडे सामने
  • इम्रान खान (पाकिस्तान) ः 88 कसोटी सामने आणि 175 वनडे सामने
  • डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया) ः 70 कसोटी सामने
  • लेन्स गिब्स (वेस्ट इंडीज) ः 79 कसोटी व 3 वनडे सामने

हे माहीत आहे का?

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रत्येक ‘नो बॉल’वर ‘फ्री हिट’ देण्याचा निर्णय 5 जुलै 2015 पासून लागू करण्यात आला. यापूर्वी फक्त फ्रंटफूट नोबॉलवरच हा निर्णय होता. आता कोणत्याही नोबॉलवर फ्री हिट देण्यात येते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!