Cricket

BCCI-SOP | बीसीसीआय पुन्हा सुरू करणार क्रिकेट प्रशिक्षण

प्रशिक्षणात ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रतिबंध

ज्या सरकारने मिशन बिगीन अगेनअंतर्गत मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. त्यात ६० वर्षांवरील कलाकारांना प्रतिबंध करण्यात आला होता. बीसीसीआयनेही ‌BCCI SOP | आता हेच नियम क्रिकेट प्रशिक्षणाला लावले आहेत.

बीसीसीआयने राज्य संघटनांना मानक संचालन प्रक्रिया ‌BCCI SOP | जारी केली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे, की राज्य संघटनांनी क्रिकेट प्रशिक्षण सुरू करताना आधी आपल्या प्रशिक्षण केंद्रावर संमतिपत्र भरून घेणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण शिबिरात ६० वर्षांवरील किंवा ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशा व्यक्तींना एसओपी ‌BCCI SOP | परवानगी दिली जाणार नाही.
बीसीसीआयने १०० पानांच्या एसओपीनुसार ‌BCCI SOP | अर्ज तयार केला आहे. ही अर्ज खेळाडूंच्या स्वाक्षरीसह भरून घेतला जाणार आहे. करोना महामारीदरम्यान प्रशिक्षण घेताना मी जी जोखीम घेत आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आहे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

भारतात २०१९-२०२० चे स्थानिक क्रिकेट सत्र मार्चमध्ये संपले. मात्र, ऑगस्टमध्ये सुरू होणारे सत्र आता विलंबाने सुरू होईल. करोनाच्या संकटकाळात सामन्यांच्या संख्येत कपात होईल हे जवळपास निश्चित आहे. BCCI SOP |

क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, ‘‘खेळाडू, स्टाफ आणि संबंधित व्यक्तींच्या आरोग्य आणि सुरक्षेची जबाबदारी राज्य संघटनांची असेल.’’

BCCI SOP | सरकारचे पुढील दिशानिर्देश मिळेपर्यंत ६० वर्षांवरील सहयोगी स्टाफ, अधिकारी आणि मैदानी स्टाफशिवाय उपचार घेत असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण शिबिरात प्रतिबंध करण्यात आला आहे.

स्टेडियमवर पोहोचण्यापासून प्रशिक्षण काळापर्यंत खेळाडूंना सुरक्षा नियमांचं तंतोतंत पालन करावे लागणार आहे.

प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय पथकाकडून खेळाडूंना कीही ऑनलाइन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यात खेळाडू आणि स्टाफने केलेला प्रवास आणि त्यांची गेल्या दोन आठवड्यांची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.

जर एखाद्या खेळाडूला किंवा स्टाफमध्ये कोणाला कोविड-१० ची लक्षणं दिसली तर त्याला पीसीआर चाचणी करावी लागेल.

‌BCCI SOP | एसओपीनुसार, ‘‘एक दिवसाच्या अंतराने (पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी) दोन चाचण्या कराव्या लागतील. जर दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या तर खेळाडूला प्रशिक्षणात सहभागी होता येईल.’’

BCCI SOP | खेळाडूंनी स्टेडियममध्ये एन-९५ मास्क (विना रेस्पिरेटर वॉल्व) तोंडावर लावणे आवश्यक आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणीच नाही, तर प्रशिक्षणादरम्यानही चष्मा लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

शिबिर आयोजनापूर्वी मुख्य चाचणी अधिकारी सर्व खेळाडू व स्टाफचा एक वेबिनार आयोजित करतील. शिविरापूर्वी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जाईल.

Read more…

मग अरुणलाल आणि डेव्ह वॉटमोर यांचं काय?

‌भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राज्य संघटनांना जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेत ‌BCCI SOP | ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रशिक्षण शिबिरात परवानगी दिलेली नाही. आता याचा फटका अरुण लाल (Arun Lal) आणि ऑस्ट्रेलियाचे डेव्ह वॉटमोर (Dav Whatmore) यांना बसू शकतो. कारण अरुण लाल बंगाल संघाचे, तर वॉटमोर बडोदा संघाचे प्रशिक्षक आहेत.

बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अरुण लाल (वय 65)

वॉटमोर ६६ वर्षांचे आहेत. त्यांना एप्रिल २०२० मध्ये बडोदा संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्त केले होते. अरुणलाल यांचंही वय ६५ आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बंगालने मार्चमध्ये रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. बीसीसीआयच्या एसओपीनुसार ‌BCCI SOP | हे दोन्ही प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करू शकणार नाही.

डेव्ह वॉटमोर

बीसीसीआयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘ही एसओपी ‌BCCI SOP | आहे. कोणत्याही संघासाठी नियमांचं उल्लंघन करणे कठीण असेल. त्यामुळे अरुणलाल आणि वॉटमोर या प्रशिक्षकांना सहभागी होता येणार नाही’’

बडोदा क्रिकेट संघटनेचे (BCA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की बीसीसीआयच्या एसओपीनुसार ‌BCCI SOP | ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर यांच्यासोबत काम करणे अवघड असेल.

अधिकाऱ्याने सांगितले, की विश्वकप विजेता प्रशिक्षक वॉटमोर यांच्याबाबीत बीसीए (‌BCA) लवकरच एक बैठक घेणार असून, त्यात बीसीसीआयच्या एसओपीबाबत ‌BCCI SOP | चर्चा करण्यात येईल.

अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘सध्या तरी इतर कोणत्याही नावाबाबत चर्चा करण्यात आलेली नाही.”

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!