All SportsMovie Reviewsports news

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपट

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपट

स्पोर्टसवर आधारित सर्वोत्तम पाच चित्रपट तुम्हाला माहीत आहे काय, प्रेरणादायी असलेले हे चित्रपट तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पाहा. स्पोर्टसवर आधारित अनेक चित्रपट आहेत, त्यातील सर्वोत्तम पाच चित्रपट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुम्हाला कसे वाटले हे चित्रपट आम्हाला जरूर कळवा.

5. Not Out (Kousalya Krishnamurthy Movie)- व्हिक्टोरी (कौसल्या मुरुगेसन)

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=8L8oLtSxrX4″ column_width=”4″]

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. कौसल्या मुरुगेसन, मुरुगेसन या शेतकऱ्याची मुलगी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याची आकांक्षा बाळगते जेणेकरुन ती देशाच्या विजयात मदत करून आपल्या क्रिकेटप्रेमी वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकेल.

क्रिकेट हे भारतीयांचं पहिलं प्रेम. अर्थात, ते पुरुष क्रिकेटभोवतीच भुंगा घालत राहिलं. मात्र, हा चित्रपट Not Out (Kousalya Krishnamurthy Movie) महिला क्रिकेटपटूवर आधारित आहे. हिंदी भाषेत नॉट आउट नावांने हा चित्रपट यू ट्यूबवर उपलब्ध आहे. मात्र, चित्रपटाचं मूळ नाव कौसल्या कृष्णमूर्ती असंच आहे. ही कहाणी कौसल्या मुरुगेसन या कृषिकन्येची आहे. बाप शेतात राब राब राबत असतो. मात्र, ते क्रिकेटप्रेमीही होती. त्यामुळे कौसल्यालाही क्रिकेट आवडायचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचा ध्यास तिने घेतला होता. देशासाठी खेळायचं आणि विजय मिळवून वडिलांच्या चेहऱ्यावर हास्याची रेषा उमटवायची हे तिचं स्वप्न होतं.

मूळ तामीळ भाषेतला हा चित्रपट Not Out (Kousalya Krishnamurthy Movie) हिंदीत डब केलेला आहे. ही कहाणी आंध्र प्रदेशातील एका दुर्गम खेड्यातील किशोरवयीन मुलीची आहे. तिला क्रिकेटपटू बनयाचं तर होतं, पण त्यात अनेक अडथळे येतात.

दिग्दर्शक श्रीनिवास भीमानेनी रिमेक चित्रपट बनविण्यासाठी विशेष ओळखले जातात. कौसल्या कृष्णमूर्ती हा चित्रपट कान या तामीळ चित्रपटाचा रिमेक आहे. संपूर्ण चित्रपट क्रिकेटभोवती फिरतो. मात्र, त्याला भावनिक किनार आहे. अलीकडच्या काळात क्रिकेटवर आधारित टॉलीवूडचे बरेच चित्रपट येऊन गेले. मात्र, कौसल्या कृष्णमूर्ती हा चित्रपट थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. चित्रपटात कथा तशी फार नाही, पण क्रिकेट भरपूर आहे. कौसल्या कृष्णमूर्तीची भूमिका ऐश्वर्या राजेशने, तर तिच्या वडिलांची भूमिका राजेंद्र प्रसाद यांनी, तर आईची भूमिका झांसी यांनी साकारली आहे. एक वेगळा रिमेक चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. तुम्हाला Not Out (Kousalya Krishnamurthy Movie) हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Not Out (Kousalya Krishnamurthy Movie)

  • दिग्दर्शक : श्रीनिवास राव भिमानेनी
  • भूमिका : ऐश्वर्या राजेश, राजेंद्र प्रसाद, शिवाकार्तिकेयन

4. Iqbal (2005) Movie इकबाल

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपट

हिंदी भाषेतला इकबाल (Iqbal (2005) Movie) हा प्रेरणादायी चित्रपट आहे. दिग्दर्शन आणि लेखन नागेश कुकुनूर यांचं आहे, तर श्रेयस तळपदे, नसिरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला (Iqbal (2005) Movie) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटही क्रिकेटभोवतीच फिरणारा आहे. एका लहानशा खेड्यातला मुलगा क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पाहतो. त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचं असतं. मात्र, त्याची कोणीही दखल घेत नाही. त्याचं कारण म्हणजे तो मूकबधिर असतो. मात्र, एका प्रशिक्षकाने त्याच्यातलं कौशल्य हेरलं आणि त्याला त्याच्या स्वप्नपंखांना बळ दिलं. नसिरुद्दीन शाह याने प्रशिक्षकाची भूमिका साकारली. श्रेयस तळपदे आणि नसिरुद्दीन शाह या दोघांनी ताकदीने भूमिका वठवल्या आहेत. एक प्रेरणादायी चित्रपट पाहायचा असेल तर Iqbal (2005) चित्रपट तुम्ही जरूर पाहा. यात ध्येयासक्त वाटचाल आहे. विशेषतः स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट लहान मुलांना जरूर दाखवायला हवा.

Iqbal (2005)

  • भूमिका : Shreyas Talpade, Naseeruddin Shah, Girish Karnad, Shweta Basu, Yatin Karyekar, Prateeksha Lonkar, Dilip Salgaonkar, Jyoti Joshi, Adarsh, Balakrishna, Gururaj Manepalli, Kapil Dev (Special Appearance), D. Santosh.
  • निर्माता : Mukta Searchlight Films
  • लेखक, दिग्दर्शक : Nagesh Kukunoor

3. Paan Singh Tomar (2012) Movie (पान सिंह तोमर)

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=EPYHGxULkAA” column_width=”4″]

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. अनेक दिग्गज खेळाडूंच्या आयुष्यात चढ-उतार आले आहेत. काहींन मार्ग सापडला, तर काही जण उद्ध्वस्त झाले. पान सिंह तोमर (Paan Singh Tomar (2012) Movie) हा चित्रपट दुसऱ्या प्रकारातला. एका खेळाडूचं आयुष्य कस उद्ध्वस्त होतं आणि त्याला वेगळा मार्ग निवडण्यास व्यवस्था कशी भाग पाडते यावर हा चित्रपट आधारित आहे. भारतातील एक अनामिक खेळाडू पान सिंह तोमर याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. चंबळ गावातला पान सिंह सलग सात वर्षे राष्ट्रीय विजेता राहिला. या उत्तम धावपटूला मात्र परिस्थितीसमोर हतबल व्हावं लागलं आणि तो डाकू बनला.

आपल्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी आठ वर्षे तो संघर्ष करीत राहिला. अखेर परिस्थितीसमोर हतबल होत त्याला बंदूक हातात घ्यावी लागली. जसजसा हा चित्रपट पुढे सरकतो तसतसा पान सिंह याचा सामान्य माणूस ते डाकू असा प्रवास रोचक होत जातो. पानसिंह तोमरची शोकांतिका यात अधिक अधोरेखित होते. Paan Singh Tomar (2012) चित्रपट खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हा चित्रपट अधिक आवडेल. विशेषतः इरफान खान याने पान सिंह तोमरची भूमिका ताकदीने उभी केली आहे. त्याचा अभिनय सुरेखच. संवादफेक तर अप्रतिम.

यात इरफान खान याला 2013 मध्ये उत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला आहे.

फिल्मफेअर अॅवॉर्ड

  • Best Screenplay: Sanjay Chauhan 2013
  • Best Screenplay: Tigmanshu Dhulia 2013

राष्ट्रीय पुरस्कार

  • Best Feature Film Tigmanshu Dhulia 2012
  • Best Actor Irrfan Khan (2012)

Paan Singh Tomar (2012) हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

2. Zidd (2023) जिद्द

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=rppeSnJCdFA” column_width=”4″]

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. महिला कुस्तीगिरावर आधारित हा चित्रपट आहे. हरियाणातल्या बोली भाषेतील संवाद भारीच आहेत. एका गावातील मुलीला समाजातल्या बुरसटलेल्या विचारसरणीला छेद द्यायचा आहे. तिला सिद्ध करायचंय, की महिला फक्त लग्नासाठी आणि पोरं जन्माला घालणारी मशीन नाही. त्यामुळेच तिने कुस्तीत करिअर करून स्वप्न साकारण्याची जिद्द उराशी बाळगली. हा चित्रपट तिच्या ध्येयासक्त वाटचालीवरच आधारित आहे. हरियाणवी भाषेत हा चित्रपट असला तरी ती हिंदीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना भाषेची कोणतीही अडचण येत नाही. मन्ने गर्व हे बेटी हे पित्याच्या मुखी असलेलं वाक्य अभिमानास्पद वाटतं. एकूणच चित्रपट छान आहे. फक्त कुस्ती कसलेल्या मल्लांसारखी वाटत नाही. मात्र, किमान समजण्यापुरती कुस्ती ठीक आहे. बाकी एकूणच चित्रपट छान आहे. कुटुंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. यातला संदेश महत्त्वाचा आहे. तो लोकांपर्यंत पोहोचतो हेच या चित्रपटाचं यश आहे.

Zidd (2023)

  • दिग्दर्शक : Manoj Fogat
  • लेखक : Anil Bhoop Sharma
  • भूमिका : Sikander Chouhan, Dholiya, Pm Dudi, Siddhart, Alok Bhardwaj, Rajeev, Garrima Kapoor, Meera, Shreya Khanna, Asha, Rakesh Kumawat.

1. Jersey (2019) जर्सी

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=qky1I3a2e0Q” column_width=”4″]

स्पोर्टसवर सर्वोत्तम पाच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. जर्सी (Jersey) चित्रपट सुरेखच. हा मूूळचा दक्षिणेतला चित्रपट आहे. मी हिंदी भाषेत अनुवादित केलेला चित्रपट पाहिला आहे. याच चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक बनवला आहे. तो मी पाहिलेला नाही. मात्र, मूळ चित्रपटाचाच हिंदी भाषेत अनुवादित केलेला चित्रपट भारीच वाटला. लेखक-दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी यांनी हा जर्सी (Jersey) अप्रतिम साकारला आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा दुसराच चित्रपट आहे. शंभरात एक खेळाडू स्टार होतो. त्याला आपण डोक्यावर घेऊन नाचतो. मात्र उरलेल्या 99 खेळाडूंचं काय? त्यांच्या आयुष्यातल्या चढ-उताराकडे आपण दुर्लक्ष करतो. या चित्रपटाचा नायक अर्जुन (नानी) मात्र या 99 खेळाडूंपैकी एक आहे. प्रचंड प्रतिभावान असूनही तो प्रकाशात येत नाही. तमिळ चित्रपटाच्या अधिक छटा आहेत. ‘नानी’चा अभिनय सुंदर आहे.

अर्जुन (नानी) हा एक विवाहित पुरुष आहे, जो उदास जीवन जगतो. त्याची पत्नी सारा (श्रद्धा श्रीनाथ) आणि मुलगा नानी हेच त्याचं विश्व. सारा काहीशी अलिप्त आणि नोकरीत गुरफटलेली असते. तिचं वागणं अर्जुनला पटत नसलं तरी जुळवून घेत असतो. मात्र, त्याचा मुलगा त्याच्यावर खूप प्रेम करतो. ही कहाणी 1996 मधली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वी अर्जुन हा उगवता क्रिकेट खेळाडू होता. मात्र, त्याची कारकीर्द अचानक संपुष्टात आली आणि त्याला क्रिकेटपासून अलिप्त राहावं लागलं. मात्र, वयाच्या 36 व्या वर्षी त्याला क्रिकेटमध्ये पुन्हा वळण्याची इच्छा झाली. अर्थात, ती इच्छा होती की हतबलता हे चित्रपट (Jersey) पाहिल्यानंतरच कळतं. पुढे काय होतं, याची उत्सुकता शेवटपर्यंत राहते.

Jersey (2019) जर्सी

  • भूमिका : Nani, Shraddha Srinath, Satyaraj, Ronit Kamra, Brahmaji, Subbaraju, Rahul Ramakrishna, Sampath Raj,Praveen
  • दिग्दर्शक : Gowtam Tinnanuri
  • निर्माता : Suryadevara Naga Vamsi
  • संगीत : Anirudh Ravichander

इजाजत म्हणजे न सुटलेल्या प्रेमाचा गुंता

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”109″]

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!