माद्रिद
Rafael Nadal won’t play in US Open | टेनिसविश्वातील प्रतिष्ठेच्या अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अनेक दिग्गजांनी खेळण्यास नकार दिला आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे गतविजेत्या रफाएल नदालची.
Rafael Nadal won’t play in US Open | गतविजेत्या नदालने करोना महामारीमुळे या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन ओपन नदालसाठी महत्त्वाची होती. या स्पर्धेमुळे त्याला रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅम किताबांशी बरोबरी करण्याची संधी होती. त्यामुळे त्याला फेडररशी बरोबरी करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
अमेरिकन ओपन न खेळण्याची घोषणा नदालने ट्विटद्वारे केली आहे. तो म्हणाला, ‘‘सध्याची स्थिती गंभीर आहे. करोना महामारीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कधी असे वाटते, की यावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे.’’
Rafael Nadal won’t play in US Open | अमेरिकन ओपन खेळण्याची इच्छा असली तरी सध्याच्या परिस्थितीत प्रवास करणे धोक्याचे आहे.
फेडररही खेळणार नाही
महिला गटातील गतविजेती अॅश्ले बार्टीनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाठोपाठ निक किर्गियोसनेही करोना महामारीचे कारण पुढे करीत ही स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता नदालनेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याने आयोजकांना मोठा धक्का आहे. रॉजर फेडररही ही स्पर्धा खेळू शकणार नाही. यामागे करोना महामारीचे कारण नाही. मात्र, त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे समजते.
Comments 2