भारतीय क्रिकेट संघाला जे क्रीडा साहित्य लागते, त्यासाठी आता निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांसाठी जगभरातील मोठमोठ्या कंपन्या उतरण्याची शक्यता आहे. सध्या जर्मनीतील प्युमा कंपनीने आघाडी घेतली आहे. ‘प्युमा’चा PUMA | प्रतिस्पर्धी ‘आदिदास’ही Adidas | या शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
नाइकेने बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळला
प्युमा जर्मनीतील क्रीडा साहित्य आणि फूटवेअर निर्माता कंपनी आहे. नाइके Nike | कंपनीची अद्याप स्पष्ट भूमिका नाही. अद्याप पुष्टी मिळालेली नाही, की नाइके पुन्हा बोली लावणार किंवा नाही. त्यांनी आधीच बीसीसीआयची कमी बोली लावण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. ‘नाइके’ने Nike | २०१६ के २०२० साठी ३७० कोटी रुपये दिले होते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘प्युमाने आयटीटी (Invitation to Tender) खरेदी केले आहे. या टेंडरची किंमत एक लाख रुपये आहे. टेंडर खरेदी केले म्हणजे ती कंपनी बोली लावणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र बोली लावण्यासाठी त्यांनी इच्छा दाखवली आहे.’’
‘मर्चंडाइस’ही लावणार बोली
असं म्हंटलं जातं, की आदिदासनेही या निविदेत रुची दाखवली आहे. मात्र, ते प्रायोजन अधिकारासाठी बोली लावणार आहे किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. जर्मनीची आणखी एक कंपनी ‘मर्चंडाइस’ही (merchandise) प्रायोजकांच्या शर्यतीत येणार आहे. ही कंपनी स्वतंत्रपणे बोली लावू शकते. त्यासाठी स्वतंत्र निविदा आहे.
कंपनीचे स्टोअर किती आहेत, यावरही उत्पादनांची विक्री अवलंबून असते. ‘प्युमा’चे साडेतीनशेपेक्षा अधिक स्टोअर्स, तर आदिदासचे साडेचारशेपेक्षा अधिक आउटलेट आहेत.
एका तज्ज्ञाने सांगितले, ‘‘जर एखादी नवी कंपनी पाच वर्षांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची बोली लावून अधिकार खरेदी करीत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. ही नाइकेने दिलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी असेल.’’
ते म्हणाले, ‘‘बोर्डाने प्रथम नाइकेला प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी फेटाळला आहे. यावरून असे स्पष्ट होते, की नाइकेला एक तर इच्छा नाही किंवा तो आणखी कमी रकमेची बोली लावू पाहत आहे.’’
गेल्या काही वर्षांपासून ‘प्युमा’ला भारतीय बाजारपेठ खुणावत आहे. विशेषत: आयपीएलद्वारे आणि आता भारतीय कर्णधार विराट कोहली, तसेच स्टार फलंदाज केएल राहुल या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
बीसीसीआयने गेल्या निविदाप्रक्रियेत प्रतिसामना बोलीची आधारभूत किंमत ८८ लाख रुपये लावली होती. आता ती घटवून ६१ लाख रुपये करण्यात आली आहे.
Comments 4