• Latest
  • Trending
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Tuesday, September 26, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

बेलारूसच्या अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने 29 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन-2023 टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 29, 2023
in All Sports, sports news, Tennis
0
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

मेलबर्न : बेलारूसच्या अरिना सबालेन्का (Aryna Sabalenka) हिने 29 जानेवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन-2023 टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. अरिना सबालेन्का हिने अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत 24 वर्षीय अरिना सबालेन्का पाचव्या, तर 23 वर्षीय एलेना रिबाकिना 25 व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी या दोघी तीन वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्या तिन्ही लढतींत अरिना सबालेन्का हिनेच जिंकल्या होत्या. या वेळीही अरिनानेच बाजी मारली. एलेनाची सुरुवात तर चांगली होती. पहिल्या सेटमधील तिसऱ्याच गेममध्ये तिने अरिनाची सर्व्हिस भेदत एलेनाने 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र, ही आघाडी तिला टिकवता आली नाही. त्यानंतर सलग दोन गेम जिंकून अरिनाने 4-4 अशी बरोबरी साधली. नवव्या गेममध्ये अरिनाला सर्व्हिस राखता आली नाही. दहाव्या गेममध्ये अरिनाला प्रतिकाराची संधी न देता एलेनाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. आव्हान राखण्यासाठी अरिनाला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. या सेटमध्ये तिने 5-2 अशी आघाडी घेतली. मात्र, यासाठी तिला प्रत्येक पॉइंटसाठी संघर्ष करावा लागला. आठव्या गेममध्येच तिने दोन सेट पॉइंट मिळवले होते. मात्र, एलेनाने झुंज देऊन सर्व्हिस राखली. नवव्या गेममध्ये मात्र सर्व्हिस राखून अरिना सबालेन्का हिने सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हानही राखले.

निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत 3-3 अशी बरोबरी होती. सातव्या गेममध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. या गेममध्ये अरिनाने फोरहँडचे फटके जबरदस्त वेगाने मारले. एलेना रिबाकिना हिने दोन ब्रेक पॉइंट वाचवले. मात्र, तिसरा पॉइंट ती वाचवू शकली नाही. पाठोपाठ आठव्या गेममध्ये अरिना सबालेन्का हिने सर्व्हिस राखली आणि 5-3 अशी आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी एलेना रिबाकिना हिला नववी गेम जिंकणे गरजेचे होते. ही गेम तिने जिंकली. त्यानंतर दहावी गेम रोमहर्षक ठरली. या गेममध्ये अरिना सबालेन्का हिने 40-30 अशा आघाडीसह मॅच पॉइंट मिळवला होता. तो मॅच पॉइंट एलेनाने वाचवला. त्यानंतर तिने आणखी दोन मॅच पॉइंट वाचवले. मात्र, चौथा मॅच पॉइंट वाचवण्यात ती अपयशी ठरली अन् अरिना सबालेन्का हिने कोर्टवर ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा जल्लोष केला.

पहिलेच ग्रँडस्लॅम

  • अरिना सबालेन्काने कारकिर्दीतील एकेरीचे पहिलेच ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.
  • या जेतेपदामुळे अरिना आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोचेल.
  • उपविजेती रिबाकिना जागतिक क्रमवारीत पंचविसाव्या स्थानावरून पहिल्या दहांत येईल. 
  • १९6८नंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सबालेन्का 2९वी महिला टेनिसपटू ठरली.
  • ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी अरिना बेलारूसची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. यापूर्वी, बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने 20१2 आणि 20१3मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.  

या यशाचे श्रेय माझ्या संपूर्ण संघाला जाते. गेल्या वर्षी आम्हाला अनेक चढ-उतारांतून जावे लागले. आम्ही खूप मेहनत घेतली. या यशात माझ्या संघाचा मोलाचा वाटा आहे.
– अरिना सबालेन्का, विजेती

Currently Playing

अरिनाचं विजेतेपद, चर्चा मात्र गर्भारपणाची!

अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आणि टेनिसविश्वात सोशल मीडियावर वेगळ्याच गमतीदार चर्चांनी रंग भरला. ही चर्चा सुरू होती विजेत्या महिलांच्या गर्भारपणाची. आश्चर्य वाटले ना? झालं काय, की 2016 ते 2022 या दरम्यान जेवढ्या महिलांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले, त्या सर्व सध्या (2023) गर्भवती तरी आहेत किंवा मातृत्वसुख तरी उपभोगत आहेत. “या क्रमाने विचार केला, तर पुढच्या वर्षी कदाचित अरिना गर्भवती असेल… आम्ही वाट पाहतोय…” अशी गमतीदार चर्चा ट्विटरवर रंगली होती. 2016 ची विजेती अँजेलिक कर्बर, 2021 ची विजेती नाओमी ओसाका आणि 2022 ची विजेती ॲश्ले बार्टी या सर्व सध्या गर्भवती आहेत. कॅरोलिन वॉझ्नियाकी आणि सेरेना विल्यम्स या दोघीही सध्या मातृत्वसुखाचा आनंद घेत आहेत. आश्चर्य म्हणजे माजी अव्वल टेनिसपटू जेनिफर कॅप्रियात (Jennifer Capriati) आणि 2020 ची विजेती सोफिया केनिन (Sofia Kenin) या दोन्ही ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेत्या गेल्या 26 वर्षांपासून गर्भवतीही राहिल्या नाहीत आणि त्यांना अद्याप मूलही नाही. या योगायोगाला अधोरेखित करीत चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरही चर्चा सुरू केल्या. या चर्चांनी सबालेन्कालाही हसू आवरले नाही. तिनेही गमतीने म्हंटले, की “मी याबाबत संघाशी आणि माझा बॉयफ्रेंड काँस्टेटिन कोल्टसोव (Konstantin Koltsov) याच्याशी चर्चा करीन.” ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेशी असलेला हा योगायोग अरिना सबालेन्का हिच्याबाबत खरा ठरतो की आणखी काही ट्विस्ट येतात, याचं औत्सुक्य मात्र चाहत्यांना आहे.

2016 पासून ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या महिलांचा असाही योगायोग…

  • 2016, अँजेलिक कर्बर : सध्या गर्भवती
  • 2017, सेरेना विल्यम्स : गर्भवती असताना विजेती
  • 2018, कॅरोलिन वॉझ्नियाकी : दुसऱ्या मुलाचा नुकताच जन्म
  • 2019 & 2021, नाओमी ओसाका : सध्या गर्भवती
  • 2022, अश्ले बार्टी : नुकतीच गर्भवती
    (2023 पर्यंतची ही स्थिती)

Read more at:

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच
All Sports

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

by Mahesh Pathade
February 24, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का
All Sports

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

by Mahesh Pathade
January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण
All Sports

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

by Mahesh Pathade
February 11, 2023
रॉजर फेडरर अखेरचा सामना
All Sports

रॉजर फेडरर याचा तो अखेरचा सामना

by Mahesh Pathade
February 13, 2023
रॉजर फेडरर टेनिस
All Sports

Roger Federer- ‘फेडएक्स’चा Tennis प्रवास थांबला…

by Mahesh Pathade
February 15, 2023
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!