HockeyInspirational story

Mumtaz Khan struggle | संघर्षकन्या मुमताज खान

संघर्षकन्या मुमताज खान

मुमताज खान mumtaz khan | कदाचित हॉकीपटू म्हणून लौकिक मिळवू शकली नसती. मात्र, २०११ मध्ये शालेय स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत नीलम सिद्दिकी या महिला प्रशिक्षकाने तिची गुणवत्ता हेरली आणि हॉकी खेळण्याचा सल्ला दिला.

त्या वेळी ती अवघ्या सहा वर्षांची होती. तिला हॉकी कसा खेळतात हेच माहिती नव्हतं. Mumtaz Khan struggle | 

वय तरी काय, अवघ्या सहा वर्षांचं. त्यामुळे काय खेळायचं आणि काय खेळू नये, याची जाण तिला तर अजिबातच नव्हती.

नीलम सिद्दिकी यांनी तिच्या वडिलांना सांगितलं, की तिला हॉकी खेळवा. इथूनच मुमताजच्या आयुष्याने कलाटणी घेतली. आज ती भारतीय महिला युवा संघाची हुकमी खेळाडू ठरली आहे. Mumtaz Khan struggle | 

लखनौमध्ये कँट भागातच तोफखाना बाजार आहे. तेथे मुमताजचं कुटुंब राहतं. मुमताजचे वडील हफीज खान यांचा भाजी विक्रीचा हातगाडा आहे. आई गृहिणी.

मुमताजला एक भाऊ आणि चार बहिणी आहेत. या सगळ्यांसाठी जेवढं शक्य होईल तेवढी मदत करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

Mumtaz Khan struggle |  मुमताजला हॉकीने वेड लावलं. अर्थात, हा खेळ निवडताना तिला बऱ्याच अडचणी आल्या. 

मुमताजने जेव्हा पहिल्यांदा हॉकी स्टीक हाती घेतली तेव्हा तिची आई भयंकर संतापली होती.

अनेकदा तिला आईच्या हातचा मारही खावा लागला. मात्र जेव्हा तिने आपली कामगिरी सिद्ध केली तेव्हा तिच्या आईवडिलांनीही कौतुक वाटू लागलं.

तिला खेळण्यास परवानगीच दिली नाही, तर तिला गरज पडेल तेव्हा पदरमोड करून आईने तिला मदतही केली.

वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असला तरी आमदनी यथातथाच असायची. कधी कधी पाचशे रुपयांचा व्यवसाय होतो, तर कधी एक रुपया मिळणेही अवघड.

रोजचा जगण्याचा संघर्ष असताना खेळासाठी मुमताजला पैसे तरी कुठून मिळणार? आईने रोज थोडे थोडे साचवलेले पैसे तिला देत असली तरी ते पुरेसे नसायचे.

याच मुमताजने २०१८ मध्ये अर्जेंटिनात झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अंतिम फेरीत भारतीय संघाला अर्जेंटिनाकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी मने जिंकली ती मुमताजनेच.

या स्पर्धेत भारताने ४० व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला होता. अर्थातच हा गोल होता मुमताजचा. संपूर्ण युवा ऑलिम्पिकमध्ये मुमताजने दोन डझन गोल केले होते. 

फॉरवर्डवर खेळणाऱ्या मुमताजने २०१६ मध्ये रांचीमध्ये तर २०१७ मध्ये रोहतकमध्ये राष्ट्रीय सबज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेत कौशल्य सिद्ध केले.

देशाचं नाव उज्ज्वल केलं तरी तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही.

Mumtaz Khan struggle | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिचा सत्कार केला, आर्थिक मदतीची घोषणाही केली. मात्र, दीड वर्षे उलटले तरी तिच्यापर्यंत मदत पोहोचली नाही. या सरकारी अनास्थेला काय म्हणावं?

चीन, अमेरिकेचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खोऱ्याने मेडल मिळवतात. ही गुणवत्ता 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात का नाही, असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडत असेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधताना मुमताजसारख्या खेळाडूंचा संघर्ष जाणून घ्यायला हवा.

या  गुणवान खेळाडूंना त्यांच्या जगण्याच्या गरजाही पूर्ण करता येत नाही.

ही विदारक स्थिती जेव्हा सरकारी यंत्रणा समजून घेईल, तेव्हा भारतही खोऱ्याने पदकं मिळवेल. मुमताजला प्रशिक्षणाची सुविधा अवश्य मिळेल.

तिला उत्तम दर्जाचा पौष्टिक आहारही मिळेल, पण प्रत्येक घास घेताना तिच्या डोळ्यासमोर तिचे भावंडं समोर दिसतील, आईचा चेहरा आठवेल. त्यांना रोज पुरेसं अन्न जर मिळत नसेल तर मुमताजला ते सुग्रास भोजनही गोड लागणार नाही.

खरं तर खेळाडूची मानसिक अवस्था तपासणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. मुमताज या सगळ्या अडथळ्यांवर मात करीत पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय.

अर्थात, तिने खेळ निवडला, त्याच वेळी तिने हा सगळा संघर्ष स्वीकारला.

मुमताजने एका मुलाखतीत सांगितले, “जर इन्जुरी झाली तर खेळाडूचं करिअर संपतं. माझ्या पायाला अशीच इन्जुरी झाली होती. मी आयर्लंडला खेळण्यास गेले होते. अंतिम सामन्यात अखेरची पाच मिनिटे शिल्लक असताना माझ्या पायाच्या लिगामेंट तुटल्या. बेंगलुरूतच उपचार झाले. हॉकी इंडियाने माझा सगळा खर्च केला. आता मी तंदुरुस्त आहे. नंतर मी ज्युनिअर संघातही स्थान मिळवलं. संघर्ष तर खूप आहे, पण जो या संघर्षातून पुढे गेला, त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असतं.”

२०१५ मध्ये छत्तीसगडमध्ये आणि २०१६ मध्ये रांची येथे ती उत्तर प्रदेश संघाकडून ज्युनिअर गटातील राष्ट्रीय स्पर्धाही खेळली आहे.

एवढेच नाही, तर डिसेंबर २०१६ मध्ये थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये झालेल्या १८ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत मुमताजने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

छावणी परिषदेची मदत


एकदा हिन्दुस्तान शिखर समागममध्ये एका मुलाखतीत तिने आपला संघर्ष सांगितला तेव्हा सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

तिचा हा सगळा खडतर प्रवास ऐकून छावणी परिषदेने तिला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. छावणी परिषदेच्या बैठकीत सैन्याधिकारी आणि नगरसेवकांनी मुमताजचे हिंदुस्तान शिखर समागमशी संबंधित सर्व व्हिडीओ प्रोजेक्टरद्वारे पाहिले.

ते पाहिल्यानंतर बोर्डाने मुमताजला तत्काळ ११ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मिश्रा व माजी उपाध्यक्ष प्रमोद शर्मा यांनीही मदतीचा हात पुढे केला.

या दोघांनी मुमताजला नोकरी मिळेपर्यंत दर महिन्याला प्रत्येकी पाच हजार अशी एकूण दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. 

मुमताज लखनौच्या कँट क्षेत्रातील रहिवासी आहे. तिचे वडील कँटमध्ये भाजीचा हातगाडा लावतात. कोणत्याही सुविधा नसताना ती खचली नाही. ती खेळत राहिली आणि देशाचे नाव उज्ज्वल केले.

तिच्या या कामगिरीची दखल घेऊन २२ फेब्रुवारी रोजी हिंदुस्तान शिखर समागममध्ये तिचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी तिने आपल्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला होता.

ते ऐकून अनेक जण तिला मदत करण्यासाठी पुढे आले. काही जणांनी तर मंचावरच मदतीची घोषणा केली. आता लखनौच्या छावणी बोर्डानेही मदतीचा निर्णय घेतला आहे.

read more

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!