All SportsEnvironmentalsciencesports news

डंख मारल्यानंतर मधमाश्या मरतात का?

मधमाश्या डंख मारल्यानंतर मरतात का?

डंख मारल्यानंतर मधमाश्या मरतात का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बऱ्याच जणांना वाटतं, की मधमाश्या डंख मारल्यानंतर मरतात. मात्र, खरंच तसं आहे काय, या प्रश्नांचा ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी घेतलेला वेध…

मधमाश्या डंख मारल्यानंतर मरतात का

  • James B. Dorey
    Lecturer in Biological Sciences, University of Wollongong
  • Amy-Marie Gilpin
    Lecturer in Invertebrate Ecology, Western Sydney University
  • Rosalyn Gloag
    School of Life and Environmental Sciences Research Fellow, University of Sydney

सिडनी : आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी मधमाशीने (Honey Bee) डंख मारलाच असेल. अर्थात, हा काही मजेदार अनुभव नाही. मात्र, ज्या मधमाशीने आपल्याला डंख मारला ती मरण पावेल, असा विचार करून आपल्याला कदाचित खेदाची किंवा सूडाची भावनादेखील वाटली असावी. प्रत्यक्षात 99.96% मधमाशी प्रजातींमध्ये असे अजिबात घडत नाही. म्हणजे डंख मारल्यानंतर मधमाशी मरत नाही.

जगभरातील सुमारे 21,000 प्रजातींमध्ये केवळ आठ प्रजाती अशा आहेत, ज्या डंख मारल्यानंतर मरतात. दुसरा उपसमूह अजिबात डंख मारू शकत नाही आणि बहुतांश मधमाश्या त्यांना हव्या तितक्या वेळा डंख मारू शकतात. मात्र, प्रकरण इथंच संपत नाही.

मधमाश्यांची गुंतागुंत आणि त्यांची डंख मारण्याची क्षमता समजून घेण्यासाठी आपल्याला डंखाचा आकार, मधमाश्यांचे गुप्तांग आणि वृत्ती समजून घ्यावी लागेल.

आमच्या देखण्या आणि घातक मधमाश्या

युरोपीय मधमाशी (Western honey bee) जिला एपिस मेलिफेरा (apis mellifera) म्हंटले जाते. या मधमाशीने डंख मारल्याचे तुम्हाला कदाचित आठवत असेल. मूळ युरोप आणि आफ्रिकेतील या मधमाश्या आज जगात जवळपास सर्वत्र आढळतात.

या जगभरातील आठ मधमाश्यांच्या प्रजातींपैकी एक आहेत. यात एपिस मधमाश्या (apis mellifera) एकूण मधमाश्यांच्या प्रजातींपैकी फक्त 0.04% प्रतिनिधित्व करतात. आणि हो, या मधमाश्या डंख मारल्यानंतर मरतात. पण असे कसे होते?

आपण असं म्हणू शकतो, की ते राणी आणि कॉलनीसाठी मरतात. मात्र, या मधमाश्या डंख झाल्यानंतर मरतात. याचे खरे कारण म्हणजे त्यांचे काटेरी डंख. हे काटे इतके तीक्ष्ण असतात, की बहुतेक वेळा ते मधमाशीला डंख बाहेर काढण्यापासून रोखतात.

हेच कारण आहे, की डंख मारल्यानंतर मधमाशी आपल्या त्वचेतील उपांग सोडते आणि त्या उपांगाशिवाय उडून जाते. मधमाशी दूर गेल्यानंतर ती तिच्या जखमांनीच मरते. मात्र, डंख तिथेच अडकून राहतो आणि अधिक विष फेकत राहतो.

या व्यतिरिक्त, मधमाश्या आणि गांधीलमाशी (wasp) (बहुधा युरोपीय मधमाश्या) या ऑस्ट्रेलियातील सर्वांत प्राणघातक विषारी कीटक आहेत. 2017-18 मध्ये विषारी प्राण्यांमुळे झालेल्या 19 मृत्यूंपैकी 12 मृत्यू या लहान कीटकांमुळे झाले आहेत.

[jnews_block_27 include_post=”4147,4139″]

मधमाश्यांचा डंख म्हणजे काय?

कमीत कमी बहुतांश मधमाश्या, गांधीलमाशी आणि मुंग्यांमध्ये डंख ही अंडी घालण्यासाठीची नळी (ovipositor) असते, जी स्वसंरक्षणासाठीही अनुकूल असते. डंख मारणाऱ्या कीटकांचा हा समूह, एक्युलेट वॅस्प (Aculeata Wasps) (मधमाश्या आणि मुंग्या तांत्रिकदृष्ट्या एक प्रकारच्या गांधीलमाश्या आहेत) 190 दशलक्ष वर्षांपासून स्वसंरक्षणासाठी डंख मारत आहेत. हे त्यांचे परिभाषित वैशिष्ट्य आहे, असं तुम्ही म्हणू शकता.

किंबहुना, इतक्या उत्क्रांतीसह त्यांनी विविध प्रकारचे डंख मारण्याची रणनीतीही विकसित केली आहे. आता मधमाश्यांकडे परत जाऊया. युरोपीय मधमाशीचे डंख मधमाशीच्या डंखाप्रमाणेच वेदनादायक असतो. श्मिट (Schmidt) कीटक डंख वेदना सूचकांकामध्ये (Sting Pain Index) 4 पैकी 2 गुण मिळवतात. मात्र, इतर बहुतांश मधमाश्यांसारखा समान परिणाम टाकत नाहीत.अर्थात, मी कमी काळजी घेणाऱ्या सहकाऱ्यांकडून काही वेदनादायक अनुभव ऐकले आहेत.

दुसरीकडे, बहुतांश मधमाश्यांच्या प्रजाती हव्या तितक्या वेळा डंख मारू शकतात. कारण त्यांच्या डंखामध्ये मधमाश्यांमध्ये आढळणारे काटे नसतात. तथापि, त्या अशाच डंख मारत राहिल्यास अखेरीस त्यांचे विष संपुष्टात येऊ शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मधमाश्यांच्या शेकडो प्रजातींनी त्यांची डंख मारण्याची क्षमता पूर्णपणे गमावली आहे.

जागतिक स्तरावर, मेलिपोनिनी या जमातीमध्ये “डंखरहित मधमाश्यांच्या” 537 प्रजाती (सर्व मधमाश्यांच्या प्रजातींपैकी सुमारे 2.6%) आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियात केवळ 11 प्रजाती (Austroplebeia and Tetragonula genera) आहेत. या शांतताप्रिय लहान मधमाश्यांना पोळ्यांमध्येही ठेवता येते आणि मध बनवता येते. डंख नसलेल्या मधमाश्या राग आल्यावर चावतात व आपल्या पोळ्याचे रक्षण करू शकतात. परंतु तुम्ही कदाचित त्यांना प्राणघातक डंख असलेल्या झुंडीपेक्षा अधिक उपद्रवी मानू शकता.

ऑस्ट्रेलियात एकमेव मधमाशी कुटुंब आहे (जगभरात एकूण सात कुटुंबे आहेत), ज्या एकमेव ऑस्ट्रेलिया खंडातच आढळतात. हे स्टेनोट्रिटिडे (Stenotritidae) कुटुंब आहे, ज्यामध्ये 21 प्रजाती आहेत. हे सौम्य आणि मोठे (त्यांची लांबी 14-19 मिमी. युरोपीय मधमाश्यांच्या दुप्पट) कोणत्याही कार्यात्मक डंखाशिवाय फिरू शकतात.

आता प्रश्न असा आहे, की जर डंख अंडी घालणाऱ्या नळ्या असतील तर… नरांचे काय? सर्व मधमाशी प्रजातींच्या नर मधमाश्यांमध्ये डंख नसतो. म्हणजे डंखरहित त्यांची शरीररचना असते. जर तुम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तर काही नर मधमाश्या अजूनही “डंख” मारण्याचे नाटक करतील. काही नर गांधीलमाश्या थोडी हानीही पोहोचवू शकतील. मात्र, त्यांच्याकडे डंख निर्माण करण्यासाठी विष नसते.

मधमाश्या नेहमीच डंख का मारतात?

मग जर बहुतांश मधमाश्या डंख मारू शकत असतील तर युरोपीय मधमाश्या नेहमीच डंख का मारतात? या प्रश्नाची काही संभाव्य उत्तरे आहेत. मुख्य म्हणजे युरोपीय मधमाश्या जगभर मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यांच्या वसाहतींमध्ये साधारणतः 50,000 सदस्य असतात आणि त्या अन्नाच्या शोधासाठी 10 किलोमीटरपर्यंत उडू शकतात. त्या तुलनेत, बहुतांश वन्य मधमाश्या फार कमी अंतरावर (200 मीटरपेक्षा कमी) अन्न शोधतात आणि त्यांना आपल्या पोळ्याजवळच राहावे लागते.

कठोर परिश्रम करणाऱ्या युरोपीय मधमाश्या खरोखरच मैलोन् मैल काम करतात. दुसरे म्हणजे युरोपीय मधमाश्या सामाजिक आहेत. ते आपल्या माता, बहिणी आणि भावांचे रक्षण करण्यासाठी अक्षरशः जीव देऊ शकतात. याच्या उलट, बहुतांश मधमाश्या (आणि गांधीलमाश्या) खरं तर एकांतप्रिय असतात (एकल माता स्वतःसाठीच करतात) आणि त्यांच्या सामाजिक नातेवाइकांच्या परोपकारी आक्रमकतेचा अभाव असतो.

जटिल नातं

आमच्या युरोपीय मधमाश्यांशी आपले मजेदार नाते आहे. या मधमाश्या प्राणघातक असू शकतात.त्या आक्रमकपणे पोळ्याचे रक्षण करतात. मात्र, त्या पिकांच्या परागीकरणासाठी महत्त्वाच्या आहेत आणि मध पुरवतात.

मात्र, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, की प्रजातींच्या बाबतीत त्या अल्पसंख्याक आहेत. आमच्याकडे हजारो देशी मधमाश्यांच्या प्रजाती आहेत (ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 1,600 हून अधिक आढळल्या आहेत), ज्या डंख मारण्यापेक्षा गुणगुणण्याची शक्यता अधिक आहे.

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1636″]

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!