All SportsYoga for Women

ओमकाराचे महत्त्व | What are benefits of OM?

 

What are benefits of OM?

ओमकाराचे महत्त्व | What are benefits of OM


yoga for women

ओमकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनम
कामदम मोक्षदं चैव ओमकाराय नमो नमः।।

मकार म्हणजे प्रणवजप. योगसाधनेत, हिंदू संस्कृतीमध्ये प्रणव जपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओमकार हा बीजमंत्र आहे.

ओमकार ही फक्त ध्वनी नसून अनंत शक्तीचे प्रतीक आहे. ओमला पूर्ण ब्रह्मांड व सृष्टी यांचे स्वरूप मानले जाते. ओमकार जपाला वैज्ञानिक महत्त्वही दिले आहे. ओमकार म्हणजे वैश्विक ऊर्जेशी जोडले जाण्याची अद्भुत किमया साधणारा शास्त्रशुद्ध वैज्ञानिक अनुभव.

ॐ ची उत्पत्ती


ओमकार हा तीन अक्षरांनी बनला आहे. ती तीन अक्षरे- अ, उ, म.

यामध्ये

‘अ’कार हा उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्माचे प्रतीक
‘उ’कार हा पालनकर्त्या विष्णूचे प्रतीक
‘म’कार हा संहारकर्त्या शिवाचे प्रतीक

या तीन शक्तींचे एकरूप म्हणजे ओमकार.
अ + उ + म या तीन मात्रा व बिंदू अशा साडेतीन मात्रांनी ओम हा शब्द तयार झाला आहे.

अ, उ, म ही तीन आद्याक्षरे आहेत. त्यांचा उच्चार करताना ओठ थोडेसे उघडून ‘अ’ हा स्वर उच्चारला जातो. त्याचे कंपन नाभीपाशी म्हणजे मणिपूर चक्रापाशी जाणवते.

‘उ’ हा स्वर तोंडाच्या चंबूप्रमाणे आकार करून उच्चारला जातो. त्याचे कंपन गळ्यापाशी म्हणजेच विशुद्ध चक्रापाशी जाणवते.

What are benefits of OM?


मात्र ओमकार म्हणण्याचे काय लाभ होतो किंवा दररोज ओमकार साधना का करावी ते बघूया.

दररोज ओमकार साधना केली तर त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, वैचारिक असे भरपूर फायदे होतात. What are benefits of OM? |

ओमकार जपाने मानसिक शांतता मिळते. सकारात्मकता (positivity) वाढते. नकारात्मक भावना कमी होतात. आत्मविश्वास वाढतो. मन खंबीर, सशक्त होण्यास मत होते.

शरीरात चैतन्य, ऊर्जा वाढते. अहंभाव कमी होण्यास मदत होते. मनावरचा संयम वाढतो. योगसाधनेसाठी पूरक वातावरण निर्माण होते.

आध्यात्मिक प्रगती होते. सप्तचक्र व कार्यान्वित होण्यासाठी उपयोग होतो. धारणा- ध्यान करण्यासाठीची बैठक तयार होते. सकारात्मक शांतता मिळते.

ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते. कारण प्रणवसाधनेने मन एकाग्र व शांत झाल्याने आपली विचार करण्याची क्षमता वाढते. शारीरिक फायदेही मिळतात.

आजकाल प्रत्येकाचीच दिनचर्या ही अतिशय व्यस्त व तणावग्रस्त आहे. त्यामुळे रक्तदाब, चिडचिड, त्रागा, हार्मोनल इनबॅलन्स आदी समस्या खूप वाढत आहेत.

तणावाने निर्माण होणारा मधुमेह, महिलांच्या समस्या, पाळीचे त्रास, थायरॉइड, हृदयासंबंधीचे त्रास, आम्लपित्त, अस्थमा अशा अनेक शारीरिक व्याधी, समस्या डोके वर काढत आहेत.

या समस्या कमी करण्यासाठी एक प्रभावी उत्तम उपाय म्हणजे प्रणव साधना म्हणजेच ओमकार साधना, जी आनंदी उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच म्हणता येईल.

पण चार-पाच वेळा ओमकार म्हंटले म्हणजे हे फायदे लगेच मिळतील का? तर नाहीच मिळणार. ही साधना आहे. प्रत्येकाला दररोज करणे आवश्यक आहे.

निदान रोज अकरा वेळा तरी ओमकार उच्चारण करावे, जेवढे जास्त कराल तेवढा अधिक लाभ होईल. जसे 21 / 51 / 101 / 108 या पद्धतीने.

what-are-benefits-of-om

What is Omkar meditation?


ओमकार म्हणताना तो एका लयीमध्ये (rhythm) म्हणावा. शांतपणे म्हणावा. खूप ओरडून, गळा ताणून करू नये. ज्याप्रमाणे तंबोऱ्याची तार क्रमशः छेडत जाताना पहिल्या तारेचा नाद पुढील तारेच्या नादांमध्ये सामावून जातो व एक सुंदर ध्वनी येतो, त्याप्रमाणे ओमकार जप असावा.

ही साधना करताना शक्यतो एखाद्या आसनावर / सतरंजीवर बसावे. खुर्चीवर बसून केले तरी चालते. जे अंथरुणाला खिळलेले रुग्ण आहेत, त्यांनीही झोपूनच ओमकार साधना करण्यास हरकत नाही. कारण त्यांच्या मनाला शांतता मिळेल. नवऊर्जा निर्माण होईल. बरे होण्याची इच्छाशक्ती निर्माण होईल.

जर तुम्ही सुखासन, पद्मासन, स्वस्तिकासन, बसून ध्यानोपयोगी आसनात बसून साधना केली तर उत्तमच. पाठीचा कणा ताठ असावा. डोळे बंद करावेत. एक दीर्घ श्वास घ्यावा व श्वास सोडत ओमचे उच्चारण करावे.

ओमकाराचे महत्त्व


दोन्ही हात ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा, प्रणवमुद्रेत शक्यतो असावेत. पहाटे / सूर्योदयाच्या वेळी ओमकार साधना करणे उत्तम, पण जर कुणाला शक्य नसेल तर दिवसभरात जेव्हा वेळ असेल व पोट रिकामे असेल तेव्हा नक्की साधना करावी. लाभच होईल.

ओमकार म्हणजे वैश्विक ऊर्जा
ओमकार म्हणजे चैतन्य
ओमकार म्हणजे आदिशक्ती
ओमकार म्हणजे प्रारंभ-सुरुवात
ओमकार म्हणजे महान वैदिक मूलमंत्र

ओमकार म्हणण्याचे बरेच प्रकार सांगितले जातात. ते तुम्ही योगतज्ज्ञांकडून किंवा आध्यात्मिक गुरूंकडून शिकून घेऊ शकता किंवा सोप्या पद्धतीने अ..उ…म या प्रकारे म्हणू शकता किंवा जपप्रमाणेही म्हणू शकता.

या पद्धतीने ओमकार म्हणून तुमच्या मनाला शांतता, प्रसन्नता मिळेल. या पद्धतीने साधना करू शकता.

[jnews_block_23 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238,103″]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!