• Latest
  • Trending
wheelchair cricket  | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू

wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू

August 9, 2020
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Friday, March 31, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू

‘व्हीलचेअर क्रिकेट’कडे Wheelchair cricket | बीसीसीआयचे BCCI | अध्यक्ष सौरव गांगुली लक्ष देणार का?

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 9, 2020
in Cricket
4
wheelchair cricket  | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

क्रिकेट म्हंटलं, की बख्खळ पैसा! विशेषत: भारतीय क्रिकेट संघ म्हंटला, की प्रत्येक खेळाडू मालामाल होतो, असं म्हणतात. पण हे सर्वच क्रिकेटपटूंबाबत अजिबात खरं नाही. विशेषत: दिव्यांग क्रिकेटपटूंबाबत wheelchair cricket | तर अजिबातच नाही. 

Mahesh Pathade Sports Journalist, Blogger
कोण होते वीक्स? एका महान फलंदाजाची कहाणी...

विंडीजचे माजी दिग्गज फलंदाज सर एवर्टन वीक्स यांनी भारताविरुद्ध असा काही विक्रम केला, जो 1948 पासून कोणीच मोडू शकलेला नाही. कोण हे वीक्स आणि काय आहे त्यांचा विक्रम…

हा एकमेव भारतीय फलंदाज होता जो वीक्स यांच्या विक्रमाजवळ पोहोचला

70 वर्षांत हा एकमेव भारतीय फलंदाज होता, ज्याने वीक्स यांच्या विक्रमाजवळ जाऊ शकला. कोण आहे भारतीय फलंदाज….

दिव्यांग क्रिकेटपटूंमध्ये ज्यांना पाय नाही अशा खेळाडूंची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ‘व्हीलचेअर क्रिकेट’ Wheelchair cricket | खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार आता तरी बीसीसीआयने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना साकडे घातले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या खेळाडूंना wheelchair cricket | आपल्या छत्रछायेत घ्यावे, अशी मागणी होत आहे.

wheelchair cricket | भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज निर्मल सिंग ढिल्लन सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. पंजाबचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोगा गावात दूध विकून आपला चरितार्थ चालवत आहे.

photo source Google
photo source Google

संतोष रंजागणे याचीही अवस्था वेगळी नाही. कोल्हापूरचा रहिवासी असलेला संतोष दुचाकी गाड्यांची दुरुस्ती करीत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी धावाधाव

wheelchair cricket | रायपूरचा पोशन ध्रुव एका गावात वेल्डिंगच्या दुकानावर काम करीत होता. करोना महामारीमुळे लॉकडाउन झालं आणि हे हातचं कामही गेलं. आता तो शेतावर दीडशे रुपये रोजावर काम करीत आहे.

हे सर्व भारतीय संघाचे क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी देशाचा लौकिक वाढवला त्या क्रिकेटपटूंच्या नशिबी ही बिकट अवस्था आली आहे. मैदानावर एकेका धावेसाठी आपलं पूर्ण कौशल्य पणास लावणारे हे खेळाडू आता अन्नाच्या एकेका कणासाठी झुंजत आहेत.

बीसीसीआयची अनास्था

wheelchair cricket | क्रिकेटपटू असले तरी त्यांना मदतीचा हात मिळू शकलेला नाही. कारण व्हीलचेअर संघटना बीसीसीआयच्या छत्राखाली येत नाही.

लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयला दिव्यांग क्रिकेटपटूंच्या विकासासाठी एक समिती स्थापन करण्यास सुचवले होते. अद्याप ही समिती नियुक्त करण्यात आलेली नाही. बीसीसीआयला कधी या क्रिकेटपटूंविषयी आस्थाच वाटली नसल्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.

भारतीय व्हीलचेयर क्रिकेट Wheelchair cricket | संघाचा कर्णधार सोमजित सिंह आहे. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघटनेबाबत चर्चाही केली होती.

व्हीलचेअर क्रिकेट गांगुलींना माहितीच नव्हतं..!

wheelchair cricket | सोमजित सिंह म्हणाला, ‘‘दिव्यांग क्रिकेटपटूंबाबतच्या धोरणाबाबत कोणतीही चर्चा होत नाही. त्यावर सौरव गांगुली यांनी मदतीचे आश्वासनही दिले होते. त्यांना भारताच्या व्हीलचेअर क्रिकेटबाबत फारशी माहितीच नव्हती. आमची कामगिरी ऐकून ते थक्कच झाले.’’

सोमजितने सुरुवातीला उत्तर प्रदेश व्हीलचेयर क्रिकेट संघटना आणि नंतर स्क्वाड्रन लीडर अभयप्रताप सिंह या दोघांनी मिळून राष्ट्रीय संघटना तयार करण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

wheelchair cricket | अभयप्रताप सिंह वायुसेनेत निवृत्त फायटर पायलट आहेत, जे सध्या व्हीलचेअरवर आहेत. क्रिकेटपटूंना अपेक्षा आहे, की बीसीसीआयने ज्याप्रमाणे महिला क्रिकेटचा विकास केला आहे, त्याप्रमाणे दिव्यांग क्रिकेटपटूंचाही करावा,

बीसीसीआयची मान्यता न मिळाल्याने राज्य स्तरावर अनेक संघटना आता फोफावल्या आहेत. व्हीलचेअर क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे टाकावे लागत आहेत.

संतोष म्हणाला, ‘‘जेव्हा आम्ही नेपाळ दौऱ्यावर गेलो होतो, त्या वेळी एका संघटनेने आम्हाला प्रत्येकाला १५ हजार रुपये भरायला लावले होते. त्या वेळी माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. त्यानंतर मी भारतीय व्हीलचेअर संघटनेशी जोडलो गेल्यानंतर या संघटनेने माझी खूप काळजी घेतली.’’

संतोषला राज्य सरकारकडून एक हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्याचे वडील व भाऊ त्याला धान्य देतात.

बांग्लादेश आणि नेपाळविरुद्ध खेळलेला निर्मलसिंह म्हणाला, ‘‘मला फेसबुकवरून व्हीलचेयर क्रिकेटविषयी माहिती मिळाली. मी चाचणी दिली. पंजाब, तसेच भारतीय संघासाठी माझी निवड झाली. या खेळामुळे आम्हाला आमचं कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली.’’

कधी दूध विक्री, तर कधी फर्निचरचे पॉलिश

म्हशीचं दूध विकून महिन्याला चार हजार रुपये कमावणारा निर्मल कधी कधी फर्निचर पॉलिश करण्याचंही काम करतो.

ते म्हणाला, ‘‘मी दुसरं काय करणार? माझ्या आईची जबाबदारी आहे माझ्यावर. माझा लहान भाऊ मजुरीसाठी बहारिनला गेला आहे. मात्र, आता तेही काम गेलं आहे. करोना महामारीमुळे आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे.’’

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की, ‘‘सध्या बीसीसीआयमध्ये कोणतीही उपसमिती नाही. दिव्यांग क्रिकेट बीसीसीआयच्या एका उपसमितीत राहू शकेल, पण त्यासाठी काही काळ जावा लागेल. बीसीसीआयने संविधानिक सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे आधी मंडळाची चौकट स्पष्ट होणे गरजेचे आहे.’’

हेही वाचा...

This is a big decision taken by the AGM of BCCI | बीसीसीआयच्या एजीएमने घेतले हे मोठे निर्णय

This is a big decision taken by the AGM of BCCI | बीसीसीआयच्या एजीएमने घेतले हे मोठे निर्णय

December 24, 2020
wheelchair cricket  | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू

wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू

August 9, 2020
BCCI-SOP | बीसीसीआय पुन्हा सुरू करणार क्रिकेट प्रशिक्षण

BCCI-SOP | बीसीसीआय पुन्हा सुरू करणार क्रिकेट प्रशिक्षण

August 4, 2020
Tags: wheelchair cricketआर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटूदिव्यांग क्रिकेटपटूबीसीसीआयव्हीलचेअर क्रिकेट
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
front-foot no-balls | आता फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर

front-foot no-balls | आता फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर

Comments 4

  1. Pingback: नदालही खेळणार नाही अमेरिकन ओपन! - kheliyad
  2. Pingback: Tennis TW3 | वयचोरी रोखणारी टीडब्लूथ्री चाचणी किती विश्वासार्ह? - kheliyad
  3. Pingback: Swastika Ghosh | राष्ट्रीय खेळाडूचं कुटुंब रस्त्यावर! - kheliyad
  4. Pingback: Jhulan Goswami | आता लक्ष्य २०२२ च्या विश्वकरंडकावर! - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!