• Latest
  • Trending
मेरी कोम हिच्याविषयी हे वाचलंय का?

अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी

August 10, 2020
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Thursday, September 28, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी

आधी तो तिला मोठ्या भावासारखाच वाटला... मग पुढे काय झालं, की ते एकमेकांचे जीवनसाथी झाले? वाचा अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 10, 2020
in Boxing, Inspirational Sport story, Inspirational story, Mary Kom
2
मेरी कोम हिच्याविषयी हे वाचलंय का?
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

अशी मिळाली मेरी कोमच्या लग्नाला मंजुरी...

तो तिला आधी मोठ्या भावासारखा वाटला. चला कोणी तरी आहे, जो आपली काळजी करतोय.. मग असे काय घडले, जे एकमेकांचे जीवनसाथी झाले... अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी...
Mahesh Pathade
Sports Journalist

Follow us...

Read more...

मेरी कोमविषयी हे वाचलंय का?

साधारणपणे दिल्लीतला तो २००० चा काळ असेल. मेरी कोम अर्थातच मेंगटे चुंगनेइजंग मेरी कोम Mangte Chungneijang Mary Kom | दोन वर्षांपासून घरापासून दूर होती. दिल्लीतलं ते एकटेपण अस्वस्थ करणारं होतं. तिथं ती प्रचंड शिस्तीत बॉक्सिंग प्रशिक्षण घेत होती. तिला ना नीट हिंदी येत होती ना इंग्रजी. त्यामुळे ती काहीशी अबोलच होती. दिल्लीत ती मणिपूरच्या कोम भागात राहत होती. तिथं कोम भाषाच जास्त बोलली जाते. तिला हे एकटेपण नकोसं झालं होतं. तिला अनेकदा असं वाटायचं, की कुणीतरी असा असावा, जो आपली काळजी घेईल, मार्गदर्शन करील.

एक दिवस ट्रेनिंग घेत असताना तिला कुणी तरी सांगितलं, तिला कोणी भेटायला आलंय. ती चकित झाली. विश्वासच बसत नव्हता, की कुणी तिला भेटायलाही येऊ शकतं. दिल्ली शहरात पाऊल ठेवल्यानंतर हा पहिलाच प्रसंग होता, की तिला कुणी भेटायला आलंय. दोन तरुण होते. एक ऑनलेर Onler | होता, तर दुसरा त्याचा मित्र. मेरी कोम दोघांनाही ओळखत नव्हती. तणावाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले होते.

त्यांना काय माहीत, की ही अनामिक ओळख पुढील काही वर्षांत त्यांचं आयुष्य बदलणारी ठरेल. ऑनलेर दिल्लीत कॉमरेम स्टुडंट युनियनचा komrem student union | अध्यक्ष होता. ही युनियन दिल्लीत शिक्षणसाठी आलेल्या उत्तरपूर्वेतील विद्यार्थ्यांची काळजी घेत होती, त्यांना मदत करीत होती. ऑनलेर याच उद्देशाने मेरीला भेटण्यासाठी आला होता. कोम भागातील या मुलीला मदतीची गरज लागल्यास तिला युनियनचा आधार आहे, हेच सांगण्यासाठी तो आला होता.

मेरी कोमला त्या वेळी ऑनलेर आपल्यापेक्षा जास्त वयाचा तरुण वाटत होता. तिला तो मोठ्या भावासारखा वाटला, जो तिच्याबाबत काळजी करणारा होता. जाता जाता तो मेरीला म्हणाला, जेव्हाही तुला गरज वाटली तर नि:संकोचपणे फोनवर संपर्क करू शकतेस. मेरीला छान वाटलं, की चला दिल्लीत कोणी तरी आहे, जो आपल्या भागातला आहे, ज्याची मदत घेतली जाऊ शकते. त्यानंतर दोघांमध्ये कधी कधी बोलणंचालणं होऊ लागलं.

एकदा मेरी कोमचा पासपोर्ट रेल्वे प्रवासात हरवलं. हीच एक गोष्ट होती, ज्यामुळे मेरी आणि ऑनलेरमध्ये मैत्रीचं नातं आणखी दृढ झालं. काही महिन्यांनी तिला एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी पहिल्यांदा परदेश दौरा करावा लागणार होता. ती प्रचंड अस्वस्थ झाली. समजत नव्हतं, की आता काय करायचं? अशा प्रसंगात ऑनलेरने तिला खूप मदत केली.

मणिपूरमध्ये पासपोर्ट पुन्हा बनवण्यापासून दिल्लीत मेरीपर्यंत तो पोहोचवण्यापर्यंत त्याने खूप धावपळ केली. पासपोर्ट हाती पडल्यानंतर मेरीच्या मनावरचं मोठं ओझं कमी झालं होतं. तिला जाणवलं, की या जगात कुणी आहे, जो आपली खूप काळजी घेतोय. त्याच्याशी आपण आपलं सुख-दु:ख वाटू शकतो. दोघांमध्ये आता गप्पा छान रंगू लागल्या.

तो माझ्यासाठी ट्रबलशूटर

Mary Kom love story | २००१ मध्ये मेरी कोम जेव्हा पेनिसिल्वानियाकडे पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली, तेव्हा ऑनलेरने तिला खूप मदत केली. जेव्हा ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून परतली तेव्हा ती प्रचंड खूश होती. दोघे आणखी जवळ आले. भावनिकदृष्ट्याही. मेरी म्हणते, “मी त्याला पसंत करू लागले होते. माझं आयुष्य प्रवास आणि प्रशिक्षणातच जात होतं. महिला बॉक्सिंग जेवढं लोकप्रिय होत होतं, तेवढीच मी व्यस्तही होऊ लागले. जेव्हा रविवारी सुटी मिळायची, तेव्हा मी ऑनलेरला भेटायला जायचे. तो असा प्रसंग होता, जेव्हा मी एकदम तणावमुक्त होत होते. ते खूपच आनंददायी वाटायचं.”

“आम्हा दोघांची पार्श्वभूमी एकसारखीच होती. भाषाही एक होती. तो खरंच असा होता, ज्याला माझं यशस्वी होणं आवडायचं. तेव्हा ऑनलेरचं दीर्घ काळ कुणाशी तरी असलेलं घनिष्ठ नातं तुटलं होतं. त्याने ते सगळं मला सांगितलं होतं. कारण आम्ही दोघे एकमेकांशी अधिक मोकळेपणे बोलत होतो. त्याच काळात त्याच्या आईचं निधन झालं होतं. तो खूप दु:खी होता. पुन्हा गावाकडे आपल्या कुटुंबाकडे परतण्याचा विचार करीत होता. मी आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, की त्याने आधी एलएल. बी.चं शिक्षण पूर्ण करायला हवं.”

लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले…

“२००३ मध्ये मला अर्जुन पुरस्कार मिळाला. त्यानंतर घरात माझ्या लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. अनेक प्रशंसकांना मला भेटावंसं वाटायचं. मी विचित्र स्थितीत फसले होते. मी ऑनलेरला याबाबत विचारलं. त्याने लगेच विचारलं, ‘मेरी तू खरंच लग्न करणार आहेस?’ मी कोणतंही उत्तर देऊ शकले नाही. लग्न माझ्या अजेंड्यावर अजिबातच नव्हतं.”

त्याला काय सांगायचं होतं?

Mary Kom love story | माझ्यासाठी येणाऱ्या लग्नाच्या प्रस्तावांची ऑनलेरला माहिती होती आणि काही माहिती त्याला दुसरीकडून मिळत होती. तो मला चिंताग्रस्तच वाटला नाही, तर अस्वस्थही जाणवला. मला जाणवलं, की तो माझ्याबाबतीत खूप भावनिक आहे. त्याला वाटत होतं, की माझे पालक माझ्या मर्जीशिवाय कोणताही प्रस्ताव निश्चित करतील. एक दिवस त्याने मला फोन केला. असं वाटलं, की तो माझ्याशी फोनवर मनातलं काही तरी सांगेल; पण तो काही बोलू शकला नाही. पण मला समजलं, की त्याला काय सांगायचंय ते.

“आता त्याच्या या भावनांना समजून मी विचित्र स्थितीत अडकले होते. समजत नव्हतं, की काय करू? मी त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागले. खूप दिवस मी त्याला भेटलेच नाही. जेव्हा एकमेकांसमोर आलो, तेव्हा ऑनलेरने तिला सरळ सांगून टाकलं, की मी तुझ्यावर प्रेम करतो.”

पहिल्यांदा लग्नावर चर्चा

मेरी म्हणते, “एक दिवस तो एकटाच आला आणि म्हणाला, मला तुझ्या पालकांना भेटायचंय. का ते मला पसंत करतील? जर मी तुझा हात मागितला तर ते राजी होतील? निश्चितच ऑनलेरने एक प्रकारे लग्नाची इच्छा जाहीर केली होती. मी स्तब्ध झाले. मी विशी ओलांडलेली होती. एक दीर्घ आणि उत्तम करिअर माझ्या समोर होतं. का मी लग्नासाठी तयार होते? पण मी हेही जाणून होते, की मला आयुष्यात ऑनलेरसारखा जीवनसाथी मिळणं शक्य नाही. मला त्याला उत्तर द्यायचं होतं, तरच तो पुढची बोलणी माझ्या आईवडिलांशी करू शकेल.”

लग्नाच्या वाटेत कुटुंबाची अडचण

अर्थात, ना ऑनलेरचे वडील या नात्याबाबत तयार होते आणि ना मेरी कोमचे वडील. मेरी म्हणते, “मी माझ्या वडिलांचा संताप जाणून होते. घाबरत होते, की कसं त्यांना सांगावं? त्यांना ऑनलेरशी माझं नातं अजिबात मंजूर नव्हतं. अखेरीस २००४ मध्ये मी आणि ऑनलेर मणिपूरला आलो.”

ती सांगते, “मी माझ्या घरी आले आणि तो त्याच्या घरी. एक निश्चित होतं, की ऑनलेर माझ्या वडिलांना भेटायला येणार. माझ्या वडिलांशी त्याची चर्चा फारशी चांगली झाली नाही. वडील त्याच्याशी अतिशय रागीटपणे सामोरे गेले. वडिलांनी तर त्याला धमकीच दिली, की मेरीच्या आयुष्यातून दूर राहा; अन्यथा माझ्याशी गाठ आहे. ऑनलेरने त्यांना शांतपणे समजावून सांगितलं, की “यातून काहीह फायदा होणार नाही.”

वडिलांनी केले अपमानित

मेरी कोमच्या वडिलांनी त्याला अपमानितही केले. घरातून हाकललेच. घरातही सर्वांना ताकीद दिली, की ऑनलेरच्या कुटुंबातील कुणालाही घरात पाय ठेवू द्यायचा नाही. वडिलांचं वागणं मेरीला पटलं नाही. तिने सरळ सामान पॅक केलं आणि इम्पाळला थेट ऑनलेरकडे गेली आणि सांगितले, “मला माझ्या आईवडिलांची पर्वा नाही. चल, आपण लग्न करू.”

चहा पिऊन मंजुरी

ऑनलेरला इच्छा होती, की लग्न दोन परिवारांच्या मंजुरीतूनच व्हावे. मुलीचं घर सोडून जाण्याने संतापदग्ध वडील खचू लागले. पहिल्यांदा मेरीने वडिलांशी थेट चर्चा केली. अखेरीस त्यांनी लग्नाला संमती दिली. आता ऑनलेरच्या परिवाराने त्यांच्या घरी येऊन परंपरेनुसार लग्नाच्या प्रस्तावासाठी उकळता चहा मेरीच्या वडिलांना दिला, तेव्हा तो त्यांनी पिला. म्हणजे लग्नास मंजुरी. यापूर्वी त्यांनी नकार दिला होता. ही प्रथा तीन वेळा होते आणि तिन्ही वेळा मुलीकडच्या कुटुंबाला चहा प्यावा लागतो.

परंपरेप्रमाणे लग्न

Mary Kom love story | तिन्ही वेळा मेरी कोमच्या परिवाराकडून मंजुरी मिळाल्यानंतर पारंपरिकपणे दोघांचं लग्न झालं. आता दोघांच्या प्रेममय वैवाहिक आयुष्यात आनंदच आनंद आहे. सोबत तीन गोड मुलंही.
( लग्नानंतर दोनच वर्षांत 2007 मध्ये त्यांना जुळी मुलं झाली. त्यानंतर 2013 मध्ये मेरी पुन्हा एका मुलाची आई झाली.)

(मेरी कोमची आत्मकथा ‘अनब्रेकेबल’वरून साभार)

Popular Post..

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

Coronavirus : आयपीएल क्रिकेटलाही बाधा!

Comments 2

  1. Pingback: Mumtaz Khan struggle | संघर्षकन्या मुमताज खान - kheliyad
  2. Pingback: सुपर डॅनची निवृत्ती... - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!