राष्ट्रीय खेळाडूचं कुटुंब रस्त्यावर!
करोना महामारीमुळे क्रीडाविश्वावर भयंकर संकट ओढवले आहे. अनेक खेळाडूंना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष (Swastika Ghosh) हिलाही आर्थिक विवंचनेने ग्रासले आहे. जागतिक मानांकनात ती पाचव्या, देशात अव्वल स्थानावर आहे.
स्वस्तिकाचे Swastika Ghosh | कुटुंब मुंबईत भाड्याच्या घरात राहत आहे. लॉकडाउनमुळे ती भाडंही देऊ शकलेली नाही. त्यामुळे ती बंगालमध्ये परतण्याचा विचार करीत आहे.
स्वस्तिकाचे वडील संदीप प्रशिक्षक आहेत. स्वस्तिकासोबत ते सराव करायचे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ते बेरोजगार असून, नवी मुंबईतील खोलीचं भाडं देऊ शकलेले नाहीत.
वडील संदीप नेरूळच्या डीएचव्ही पब्लिक स्कूलमध्ये टेबल टेनिस प्रशिक्षक होते. मात्र, लॉकडाउनमुळे काम आणि वेतन मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यांना अखेर भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम काढावी लागली.
ते म्हणाले, ‘‘स्वस्तिकाला Swastika Ghosh | रोज सुमारे १२०० रुपयांचं फूड सप्लीमेंट द्यावे लागते. कारण सहा तास ती सराव करते. आता हे सर्व बंद झाले आहे. लॉकडाउन असाच सुरू राहिला तर बंगालमध्ये परतण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.’’
मुंबईत १९९२ पासून लेव्हल दोनचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे संदीप यांनी सांगितले, ‘‘माझ्याकडे भविष्यनिर्वाह निधीत ६० हजार रुपये होते. लॉकडाउनमध्ये आता ते सगळे खर्च झाले आहेत. मला सासूरवाडीकडून काही पैसे उधार घ्यावे लागले. आता आमच्याजवळ काहीच पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. ’’
ते म्हणाले, ‘‘मला आशा आहे, की शाळा सुरू होतील आणि सरावास परवानगी मिळेल. अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होईल.’’
स्वस्तिकाने Swastika Ghosh | वयाच्या नवव्या वर्षी २०१३ मध्ये कॅडेट गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. स्वस्तिकाने टेबल टेनिसमध्ये जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पदच म्हणावी लागेल. २०१८ मध्ये जागतिक ज्युनिअर रँकिंगमध्ये २७८ क्रमांकावर होती. मात्र, दोन वर्षांत तिने कामगिरी उंचावली आणि आता एप्रिल २०२० च्या जागतिक ज्युनिअर रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे. सध्या भारतातील अव्वल ज्युनिअर खेळाडू आहे.
टे.टे. संघटना, सरकार ढिम्म
संदीप म्हणाले, ‘‘मी केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेलाही पत्र लिहिले. मात्र, कोणतेही उत्तर मिळाले नाही. क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि राज्याच्या क्रीडा विभागालाही पत्र लिहिले. त्यांच्याकडूनही उत्तर मिळू शकलेले नाही.’’
सरकार, मंत्र्यांचे रोज ट्विट किंवा एखादे विधान तरी कानी पडते, की आम्ही इथे मदत केली, अमुक ठिकाणी मदत केली वगैरे वगैरे. मात्र ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचलेले नाही. स्वस्तिकाच्या प्रकरणावरून हे स्पष्ट झाले आहे.
क्रीडामंत्र्यांपासून क्रीडा संघटनेपर्यंत कोणीही या कुटुंबाची दखल घेऊ नये, हे दुर्दैवी आहे. ही अनास्था अशीच राहिली तर ऑलिम्पिकमध्ये पदक भारत कसे काय जिंकू शकेल? ज्यांच्या जोरावर ही स्वप्ने पाहिली जातात, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जाते.
हेही वाचा
दिव्यांग क्रिकेटपटू आर्थिक विवंचनेत
Comments 2