All SportsBoxingscience

माईक टायसन- बॉक्सिंग आणि जोखीम

माईक टायसन- बॉक्सिंग आणि जोखीम

जर वयाच्या 58 व्या वर्षी एखादा व्यक्ती त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या व्यक्तीविरुद्ध बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यास राजी झाला तर ती खरोखर चिंतेची बाब ठरेल. त्याची मुलगी किंवा मुलगा तर रडायलाच लागेल. त्याचे मित्र त्याला बरंवाईट बोलतील. त्याच्या विद्यार्थ्यांना वाटेल, की हा वेडा झालाय. अर्थात, तो काही ‘आयर्न माईक’ नाही. होय, माईक टायसन काहीही करू शकतो. कारण 20 जुलै रोजी माजी हेविवेट बॉक्सिंग विश्वविजेता माईक टायसन (Mike Tyson) आता 27 वर्षीय बॉक्सरविरुद्ध लढणार आहे. त्याचं नाव आहे जेक पॉल (Jake Paul). टेक्सासमधील अर्लिंग्टन येथील एटी अँड टी स्टेडियमच्या रिंगमध्ये ही लढत होणार आहे. यूट्यूबर ते बॉक्सर असा प्रवास करणारा जेक पॉल अवघा 27 वर्षांचा, तर माईक टायसन 58 वर्षांचा आहे.

माईक टायसन बॉक्सिंग आणि जोखीम
माईक टायसन- बॉक्सिंग आणि जोखीम

‘आयर्न माईक’ (Iron Mike)मध्ये जैविकदृष्ट्या काय चाललंय आहे ते पाहूया.

शरीरावर वारंवार प्रहार केल्याने एक मुष्टियोद्धा थकू शकतो. आणि यकृतावर (लिव्हर) जोराने केलेला प्रहार ‘टेक्निकल नॉकआउट’चंही कारण बनू शकतं. मात्र, बॉक्सिंगमध्ये डोकं प्रमुख लक्ष्य असतं. बॉक्सर नेहमीच नॉकआउटचा ठोसा देण्याच्या तयारीत असतो. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करता, तेव्हाच हे शक्य होऊ शकेल.

अर्थात, नॉकआउटसाठी तुम्हाला अनेक जोरदार प्रहार करावे लागतील. अनेक बॉक्सर ‘उशिरापर्यंत रिंगवर टिकतात.’ दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर अखेरपर्यंत लढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे चार ते 12 फेऱ्यापर्यंत लढण्याचा प्रयत्न असू शकतो. प्रत्येक फेरी तीन मिनिटांपर्यंत सुरू असते.

बॉक्सिंगमध्ये डोक्यावर आघातामुळे काय परिणाम होऊ शकतात?

तत्काळ परिणाम कमी असू शकतात. बॉक्सर सहज ठणठणीत होऊ शकतो. मात्र, काही वेळा परिणाम परिणाम विनाशकारीही होऊ शकतात. कदाचित सबड्यूरल हेमेटोमा (Subdural Hematoma) होऊ शकतो. अशा स्थितीत डोक्याला मार लागल्याने मेंदू आणि मेंदूच्या आवरणातील रक्तवाहिन्या किंवा मेनिन्जेस (Meninges) यांच्यामध्ये जोडणाऱ्या नसा फुटू शकतात.

या फुटलेल्या नसांमधून होणाऱ्या रक्तस्रावामुळे रक्त एका ठिकाणी साचतं, ज्यामुळे मेंदूवर दबाव येतो. यामुळे भ्रम, चेतना नष्ट होणे, न्यूरोलॉजिकल अपंगत्व आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होतो.
वृद्धांमध्ये मेंदूचा आकार (Brain Volume) कमी होतो. यात एकमेकांना जोडलेल्या नसा लाबं होतात आणि त्या फुटण्याचा धोका अधिक होतो. अल्कोहोलचे व्यसन हे मेंदूच्या संकुचिततेला गती देण्यासाठी ओळखले जाते. आणि बॉक्सिंग जगज्जेता माईक टायसन (Mike Tyson) याच्याकडे हा एक जुनाट जोखीम घटक असल्याचे दिसून येते.

मला एक रुग्ण आठवतो. तो बॉक्सर होता. तो पूर्वी सबड्युरल हेमॅटोमाने (Subdural Hematoma)ग्रस्त होता आणि शारीरिक अपंगत्व आणि भयंकर नैराश्याने ग्रस्त होता.

मेंदूवर तीव्र प्रहार मेंदूच्या पेशींना (Neurons) इजा पोहोचवतात.

मज्जातंतू फाटू शकतात आणि त्याचे असे परिणाम होतात, जे एक तर सूक्ष्म असतात किंवा लक्षणीय तरी असतात. यामुळे संज्ञानात्मक कार्याचे जलद नुकसान होऊ शकते. त्याला डिमेन्शिया पगिलिस्टिका (Dementia Pugilistica) किंवा क्रोनिक ट्रॉमेटिक एन्सेफॅलोपथी (Chronic Traumatic Encephalopathy- सीटीई) नावाने ओळखले जाते.

वारंवार दुखापतींमुळे मेंदूमध्ये असामान्य प्रथिने जमा होतात. परिणामी, मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि मेंदू संकुचित होत जातो. रुग्णाची वागणूक, मनोवस्था आणि विचारक्षमतेत बदल जाणवतो. काही घटनांमध्ये, पार्किन्सन्स रोगासारख्या परिस्थितीचा परिणाम मेंदूच्या एका भागातील न्यूरॉन्सच्या (Neurons) नुकसानीमुळे होऊ शकतो ज्याला सब्सटॅनिया निग्रा (Substantia Nigra) म्हणतात.

कदाचित मुहम्मद अलीसुद्धा याचमुळे ग्रस्त होते. मात्र, त्याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

हृदयाच्या समस्या

माईक टायसन- बॉक्सिंग

अतालता (अनियमित हृदयाचा ठोका), एन्झाइना (Enzina- हृदयाच्या मांसपेशींमध्ये रक्तप्रवाह कमी होणे) आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन (Myocardial infarction- हृदयविकाराचा झटका) यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांची शक्यता मध्यम वयात वाढते.

तंदुरुस्त राहिल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होते आणि टायसनला व्यायामाचा खूप फायदा होईल. मात्र, जिममध्ये अतिरेकी व्यायामाचा मोह नेहमीच असतो.

अतिरेकी व्यायामामुळे कार्डियाक फायब्रोसिस (Cardiac Fibrosis- हृदयाच्या मांसपेशियांमध्ये जखम) होऊ शकतो. यामुळे कालांतराने हृदयवैफल्य किंवा कधी कधी अचानक मृत्यू होऊ शकतो.

कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिस (Coronary Atherosclerosis- संकुचित हृदयधमन्या) मध्यम वयात सामान्य आहेत. इतके, कि निरोगी दिसणाऱ्या लोकांमध्येही ही समस्या आढळते. मात्र, व्यायामादरम्यान अचानक मृत्यूही होऊ शकतो.

जर नियमित व्यायामामुळे हा धोका कमी होत असला, तरी कोकेनच्या व्यसनामुळे तो बराच वाढूही शकतो. आणि भूतकाळात बॉक्सिंग रिंगचा बादशाह माईक टायसन हे औषध घेत होता. छातीवर झटका बसणेही त्रासदायक ठरू शकते.

कोमोटियो कॉर्डिस (Commotio Cordis) एक अशी स्थिती आहे, ज्यात अशा प्रकारच्या झटक्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. यात हृयाची स्पंदने अनियमित होतात, हृदयाचे स्नायू संकुंचित होण्याची क्षमता कमी होत जाते आणि मृत्यू होऊ शकतो. अगदी असामान्य, परंतु कोरोनरी धमनी रोगस्थिती आणखी वाईट करू शकते.

वयाचा अडथळा नसावा

आतापर्यंत आपण ‘आयर्न माईक’ (Iron Mike) अर्थात माईक टायसनवरच लक्ष केंद्रित केलं आहे. पण त्याचा प्रतिस्पर्धी जेक पॉल याच्याविषयी काय सांगाल? तो फारच कमी वयाचा आहे आणि तो हृदयरोग आणि मेंदूच्या विकारापासून मुक्त असू शकतो. त्यामुळे काही मर्यादेपर्यंत त्याचं रक्षण होऊ शकतं. मात्र, त्याच्याकडे बॉक्सिंगचा अनुभव कमी आहे आणि त्याने उशिरा बॉक्सिंग करणे सुरू केले आहे.

अशीही अनेक उदाहरणं आहेत, जिथे पन्नाशी आणि साठीतले बॉक्सर अजूनही चांगले खेळतात आणि तरुण प्रतिस्पर्ध्यांवर मात करतात. जर माईक टायसन बॉक्सिंग रिंगमध्ये आपला वेग, शक्ती आणि क्षमता कायम राखू शकला तर तो पॉलवर विजयही मिळवू शकतो.

शेवटी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक वयात व्यायाम आरोग्यासाठी उत्तम आहे. आणि त्याचे चांगले पुरावेही आहेत, की मर्यादित प्रमाणात बॉक्सिंग केल्याने अनेक आरोग्यलाभ मिळतात.

माइक टायसन (Mike Tyson)

माईक टायसन बॉक्सिंग आणि जोखीम

  • जन्म : 30 जून 1966
  • वय : 57 वर्षे (लढतीच्या वेळी 58 वर्षे)
  • फोर्ट ग्रीन, न्यूयॉर्क, अमेरिका
  • विभाग : हेविवेट
  • वजन : 100 kg
  • उंची : 5 फूट 10 इंच (178 सेंमी)

जेक पॉल (Jake Paul)

  • जन्म : 17 जानेवारी 1997
  • वय : 27 वर्षे
  • क्लीव्हलँड, ओहियो, अमेरिका
  • विभाग : क्रुजरवेट (Cruiserweight)
  • वजन (s) : 83 Kg
  • उंची : 6 फूट 1 इंच (1.85 मी.)

|माईक टायसन- बॉक्सिंग आणि जोखीम

#miketyson #miketysonvsjakepaul #tysonvspaul #jakepaulboxing #miketysonboxing #miketysonfighting #माइकटायसन #माइकटायसनबॉक्सिंग #boxing #बॉक्सिंग

चेस बॉक्सिंग : चाली रचा, नाही तर ठोसे द्या…! (भाग 1)

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More At :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”2123″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!