All SportsOther sports

most beautiful women in sports | सौंदर्य आणि क्रीडाकौशल्य यांचा सुंदर मिलाफ

सौंदर्य आणि क्रीडाकौशल्याची जादू

top 10 most beautiful women in sports | जगातील सर्वोत्तम १० सौंदर्यवती महिला खेळाडूंची ही यादी खास खेळियाडने निवडलेली आहे. या सर्व खेळाडू निवृत्त झाल्या आहेत. त्यापैकी अनेकींनी चाळिशी ओलांडली आहे. मात्र, सौंदर्य आणि क्रीडाकौशल्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या महिला खेळाडूंची जादू अद्याप ओसरलेली नाही. पाहूया या दहा सौंदर्यवती (most-beautiful-women-in-sports) महिला खेळाडू कोण?

 

10. मारिया शारापोवा…

most beautiful women in sports |
मारिया शारापोवा 2005 आणि 2008 मध्ये सर्वाधिक सर्च केलेली क्रीडापटू आहे.

टाइमने 2011 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ३० सर्वोत्तम सौंदर्यवती महिला खेळाडूंमध्ये (most beautiful women in sports) टेनिसपटू मारिया शारापोवाचा समावेश करण्यात आला होता. 2012 मध्येही तिचा १०० खेळाडूंमध्ये उत्तम टेनिसपटू म्हणून समावेश करण्यात आला होता.

मारिया शारापोवाने 2003 ते 2015 दरम्यान कमीत कमी एक तरी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम फक्त स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट यांच्या नावावर आहे.

वयाच्या 15 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपन ज्युनिअर टूर्नामेंटमध्ये तिने अंतिम फेरी गाठली होती. अशी कामगिरी करणारी ती जगातली सर्वांत लहान खेळाडू ठरली.

ऑगस्ट 2005 मध्ये जागतिक क्रमवारीत मारियाने अव्वल स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच रशियन टेनिसपटू ठरली.

मारिया शारापोवाच्या नावावर 35 विजेतेपद, 5 ग्रँड स्लॅम आहेत.


9. अॅलेक्स मॉर्गन (Alex Morgan)

महिला क्रीडापटूंमध्ये (most beautiful women in sports) सर्वांत सुंदर अॅलेक्स मॉर्गन उत्तम फुटबॉलपटू आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळविणाऱ्या अॅलेक्सचा जन्म कॅलिफोर्नियातील डायमंड बार येथे २ जुलै १९८९ रोजी झाला.

अॅलेक्स अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात, तसेच पोर्टलँड थॉर्न्स या व्यावसायिक फुटबॉल संघाची स्ट्रायकर खेळाडू म्हणून ओळखली जाते.

अमेरिकेतील महिला फुटबॉलपटूंमध्ये वर्षातील सर्वोत्तम, तसेच विश्वातील फिफा फुटबॉलपटूंच्या निवडप्रक्रियेत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

अॅलेक्स मॉर्गन अवघ्या २२ वर्षांची असताना अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले व २०११ च्या फिफा वर्ल्डकपमध्ये खेळली. अशी कामगिरी करणारी ती संघातील सर्वांत लहान खेळाडू ठरली. या स्पर्धेत अमेरिकेच्या संघाने रौप्यपदक मिळविले होते.

2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत कॅनडाविरुद्ध खेळताना अॅलेक्सने 123 व्या मिनिटाला निर्णयाक गोल केला होता. या गोलमुळेच अमेरिका संघ अंतिम फेरी गाठू शकला.

व्यावसायिक फुटबॉलमध्ये मॉर्गन जगातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली. टाइम मॅगेझिनने 2015 मध्ये जगातील सर्वांत महागड्या खेळाडूंच्या यादीत मॉर्गनचा समावेश केला होता.


8. अॅलिसिया सॅक्रामोन (Alicia Sacramone)

अॅलिसिया सॅक्रामोन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक खेळाडू आहे. तिचं पूर्ण नाव अॅलिसिया मारी सॅक्रामोन क्विन (Alicia Marie Sacramone Quinn). अॅलिसियाने 23 जून 2013 मध्ये निवृत्ती घेतली. मात्र, जगातील सर्वांत सुंदर (most beautiful women in sports) आणि उत्तम जिम्नॅस्टिक खेळाडू म्हणून आजही तिची चर्चा होते.

सॅक्रामोनचा जन्म अमेरिकेतील बोस्टन येथे ३ डिसेंबर १९८७ रोजी झाला. तिचे वडील फ्रेड दंतरोगतज्ज्ञ, तर आई हेयरस्टायलिस्ट आहे.

सॅक्रामोन पाच वर्षांची असताना नृत्यकला शिकत होती. त्याच्या तीनच वर्षांनी म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी (१९९६) मध्ये तिने जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेतले.

सॅक्रामोनने स्पर्धात्मक जिम्नॅस्टिकमध्ये २००२ मध्ये पाऊल ठेवले आणि २००३ मध्ये तिने अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

सॅक्रामोनने चार वेळा (२००५, २००७, २०१०, २०११) वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. पॅन अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये तिने २००४ मध्ये व्हॉल्ट प्रकारात, फ्लोअर एक्सरसाइज, २००५ मध्ये दोन सांघिक, तर फ्लोअर एक्सरसाइजमध्ये सुवर्णपदके जिंकली. मात्र, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


7. अलाना ब्लंचार्ड (Alana Rene Blanchard)

most beautiful women in sports | अलाना ब्लंचार्डचा जन्म ५ मार्च १९९० रोजी अमेरिकेतील हवाई प्रांतात झाला. ती उत्तम सर्फर आहे. एएसपी वर्ल्ड टूरमध्ये (ASP World Tour) तिने सहभाग घेतला आहे. सर्फिंगच्या अनेक स्पर्धा ती जिंकली आहे.

अलानाचं टोपणनाव लाना आहे.

अलानाने कर्ल स्विमवेअर, वेटसूट्सचे डिझाइन केले आहे, जे खास सर्फिंगसाठी वापरले जातात. तसेच या स्विमसूटसाठी तिने मॉडेलिंगही केले आहे.

अलानाची विजेतीपदे

  • वुमेन्स पाइपलाइन चॅम्पियनशिप, हवाई
  • रिप कर्ल गर्ल्स फेस्टिव्हल ज्युनिअर प्रो, स्पेन
  • रॉक्सी प्रो ट्रायल्स, हवाई, हालिवा
  • बिलाबोंग प्रो प्री ट्रायल्स, हुकिपा, माउइ
  • व्होल्कोम पफरफिश सर्फ सीरिज, काउइ

6. अॅना रॉसन (Anna Rawson)

अॅना रॉसन (Anna Rawson) ही ऑस्ट्रेलियातील व्यावसायिक गोल्फर आणि मॉडेल most beautiful women in sports | आहे. ऑस्ट्रेलियातील अडीलेडमध्ये 5 ऑगस्ट 1981 रोजी तिचा जन्म झाला. डॉली मासिकाच्या स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

वयाच्या 16 व्या वर्षी तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले, जेव्हा तिची निवड डॉली या ऑस्ट्रेलियन मासिकाच्या कव्हरपेजसाठी झाली.

1999 मध्ये तिने गोल्फ खेळाची निवड केली.

1999 आणि 2000 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन अमॅच्युअर चॅम्पियनशिपची पात्रताफेरी जिंकली. 1999 मध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या संघातही स्थान मिळवले होते.

महिला गटातील युरोपियन टूर आणि एलपीजीए या प्रतिष्ठित स्पर्धा ती खेळली आहे. युरोपियन टूर स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

साउथर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या गोल्फ स्पर्धा ती खेळली आहे.


5. अॅना इव्हानोविच (Ana Ivanovic)

अॅना इव्हानोविच (Ana Ivanovic) सर्बियाची टेनिसपटू आहे. 2003 पासून तिने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये जगातील सर्वोत्तम 30 खेळाडूंमध्ये अॅनाची निवड करण्यात आली होती. most beautiful women in sports |

अॅनाने एक ग्रँड स्लॅमसह 14 डब्लूटीए स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने कारकिर्दीत 16 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

2017 मध्ये अॅनाने टेनिसमधून निवृत्ती घेतली. सर्वांत सुंदर महिला क्रीडापटू म्हणून तिची अनेक मासिके, सर्व्हेतून निवड झाली आहे.

2007 मध्ये फ्रेंच ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागलेल्या अॅनाने त्याच्या पुढच्याच वर्षी 2008 मध्ये रशियाच्या दिनारा साफिनाचा पराभव करीत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले

मोनिका सेलेसा खेळ पाहून अॅनाने पहिल्यांदा रॅकेट घेतले तेव्हा ती अवघ्या पाच वर्षांची होती. युगोस्लाव्हियात टेनिसच्या प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने ती स्विमिंग शिक्षणासाठी दाखल झाली. मात्र वयाच्या 13 वर्षी तिला स्वित्झर्लंडला टेनिस शिकण्यासाठी पाठविण्यात आले.

अॅनाने ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, केटरयाना बोंडारेंको हिच्याकडून तिला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ती सातत्याने कामगिरी उंचावत गेली.


4. बेकी हॅमन (Becky Hammon)

व्यावसायिक बास्केटबॉलमधून निवृत्त झालेली बेकी हॅमन (Becky Hammon) सध्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. हॅमनचा जन्म अमेरिकेतील साउथ डाकोटा येथील रॅपिड सिटी 11 मार्च 1977 रोजी झाला. most beautiful women in sports

हॅमनचा जन्म अमेरिकेतला असला तरी तिने 2008 मध्ये रशियाचे नागरिकत्व स्वीकारले. तिने रशियन संघाकडून 2008 व 2012 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळली आहे.

ज्युनिअर गटात खेळताना तिला साउथ डाकोटा मिस बास्केटबॉल म्हणून ओळखले जायचे. जेव्हा ती वरिष्ठ गटात खेळू लागली तेव्हा ती साउथ डाकोटाची सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

एनबीएतील व्यावसायिक बास्केटबॉल क्लब असलेल्या सॅन अंटोनियो स्पर्सने 5 ऑगस्ट 2014 रोजी हॅमनला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. एनबीएच्या इतिहासातील ती दुसरीच महिला प्रशिक्षक, तर पूर्णवेळ सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्त झालेली ती पहिलीच महिला आहे.

स्पर्स क्लबने ३ जुलै २०१५ रोजी हॅमनला सांघिक लीग स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून बढती दिली. या पदावर पोहोचलेली ती पहिली महिला प्रशिक्षक ठरली.


3. मिशेल वी (Michelle Wie)

most beautiful women in sports | हवाईतल्या होनोलुलूत जन्मलेल्या मिशेल वी (Michelle Wie) हिने अमेरिकेत गोल्फर म्हणून लौकिक मिळवला आहे. अमेरिकेतील वुमेन्स अमॅच्युअर पब्लिक लिंक्स स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळविले आहे.

मिशेल वी एलपीजीए टूरमधील अमेरिकेची व्यावसायिक गोल्फर आहे. तिने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी यूएसजीए अमॅच्युअर चॅम्पियनशिपची पात्रताफेरी गाठली होती. अशी कामगिरी करणारी ती सर्वांत लहान खेळाडू ठरली.

वी अमेरिकी खेळाडू असली तरी ती मूळची दक्षिण कोरियाची आहे. तिचे आईवडील 1980 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले.


2. अनास्तासिया लुपोवा (Anastasia Luppova)

अनास्तासिया लुपोवा (Anastasia Luppova) ही रशियान बिलियर्ड्सची खेळाडू. रशियातील युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा तिने दोन वेळा जिंकली आहे.

2009 मध्ये तिने मिस बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली.

रशियातील कझानमध्ये जन्मलेल्या लुपोवा बिलियर्ड्सच्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यानंतर तिने या खेळातून निवृत्ती घेतली. मात्र, प्रशिक्षकाच्या रूपाने आजही तिचे या खेळाशी घट्ट नाते कायम आहे.


1. कॅरोलिन वोझ्नियाकी (Caroline Wozniacki)

कॅरोलिन वोझ्नियाकी (Caroline Wozniacki) डेन्मार्कमधील व्यावसायिक टेनिसपटू आहे. तिचा जन्म डेन्मार्कमध्ये ११ जुलै १९९० रोजी झाला. सध्या ती मोनॅकोतील माँटे कार्लो येथे राहते. most beautiful women in sports |

कॅरोलिनाने ३० डब्लूटीएच्या एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. यातील सहा स्पर्धांचे विजेतेपद तिने २०१० ते २०११ या एका वर्षात जिंकल्या आहेत. २००८ ते २०११ दरम्यान ही तिची उत्तम कामगिरीची वर्षे मानली जातात.

२००६ मध्ये तिने विम्बल्डनचे एकेरीतील विजेतेपद पटकावले.

बचावात्मक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरोलिनचं बॅकहँड शॉटवर प्रभुत्व होतं. मात्र, फोरहँड शॉट तिला फारसा चांगला खेळता आलेला नाही.

कॅरोलिनचे वडील तिचे पहिले गुरू. ती १४ वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनीच तिला टेनिसचे धडे दिले.

कारकिर्दीत कॅरोलिनाने ६३५ विजय मिळवले, तर २६४ सामने गमावले आहेत. तिच्या विजयाची टक्केवारी ७०.६ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!