wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू
क्रिकेट म्हंटलं, की बख्खळ पैसा! विशेषत: भारतीय क्रिकेट संघ म्हंटला, की प्रत्येक खेळाडू मालामाल होतो, असं म्हणतात. पण हे सर्वच क्रिकेटपटूंबाबत अजिबात खरं नाही. विशेषत: दिव्यांग क्रिकेटपटूंबाबत wheelchair cricket | तर अजिबातच नाही.
Mahesh Pathade
Sports Journalist, Blogger
कोण होते वीक्स? एका महान फलंदाजाची कहाणी…
हा एकमेव भारतीय फलंदाज होता जो वीक्स यांच्या विक्रमाजवळ पोहोचला
दिव्यांग क्रिकेटपटूंमध्ये ज्यांना पाय नाही अशा खेळाडूंची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ‘व्हीलचेअर क्रिकेट’ Wheelchair cricket | खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार आता तरी बीसीसीआयने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना साकडे घातले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या खेळाडूंना wheelchair cricket | आपल्या छत्रछायेत घ्यावे, अशी मागणी होत आहे.
wheelchair cricket | भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज निर्मल सिंग ढिल्लन सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. पंजाबचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोगा गावात दूध विकून आपला चरितार्थ चालवत आहे.
संतोष रंजागणे याचीही अवस्था वेगळी नाही. कोल्हापूरचा रहिवासी असलेला संतोष दुचाकी गाड्यांची दुरुस्ती करीत आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी धावाधाव
wheelchair cricket | रायपूरचा पोशन ध्रुव एका गावात वेल्डिंगच्या दुकानावर काम करीत होता. करोना महामारीमुळे लॉकडाउन झालं आणि हे हातचं कामही गेलं. आता तो शेतावर दीडशे रुपये रोजावर काम करीत आहे.
हे सर्व भारतीय संघाचे क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी देशाचा लौकिक वाढवला त्या क्रिकेटपटूंच्या नशिबी ही बिकट अवस्था आली आहे. मैदानावर एकेका धावेसाठी आपलं पूर्ण कौशल्य पणास लावणारे हे खेळाडू आता अन्नाच्या एकेका कणासाठी झुंजत आहेत.
बीसीसीआयची अनास्था
wheelchair cricket | क्रिकेटपटू असले तरी त्यांना मदतीचा हात मिळू शकलेला नाही. कारण व्हीलचेअर संघटना बीसीसीआयच्या छत्राखाली येत नाही.
लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयला दिव्यांग क्रिकेटपटूंच्या विकासासाठी एक समिती स्थापन करण्यास सुचवले होते. अद्याप ही समिती नियुक्त करण्यात आलेली नाही. बीसीसीआयला कधी या क्रिकेटपटूंविषयी आस्थाच वाटली नसल्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
भारतीय व्हीलचेयर क्रिकेट Wheelchair cricket | संघाचा कर्णधार सोमजित सिंह आहे. त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघटनेबाबत चर्चाही केली होती.
व्हीलचेअर क्रिकेट गांगुलींना माहितीच नव्हतं..!
wheelchair cricket | सोमजित सिंह म्हणाला, ‘‘दिव्यांग क्रिकेटपटूंबाबतच्या धोरणाबाबत कोणतीही चर्चा होत नाही. त्यावर सौरव गांगुली यांनी मदतीचे आश्वासनही दिले होते. त्यांना भारताच्या व्हीलचेअर क्रिकेटबाबत फारशी माहितीच नव्हती. आमची कामगिरी ऐकून ते थक्कच झाले.’’
सोमजितने सुरुवातीला उत्तर प्रदेश व्हीलचेयर क्रिकेट संघटना आणि नंतर स्क्वाड्रन लीडर अभयप्रताप सिंह या दोघांनी मिळून राष्ट्रीय संघटना तयार करण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
wheelchair cricket | अभयप्रताप सिंह वायुसेनेत निवृत्त फायटर पायलट आहेत, जे सध्या व्हीलचेअरवर आहेत. क्रिकेटपटूंना अपेक्षा आहे, की बीसीसीआयने ज्याप्रमाणे महिला क्रिकेटचा विकास केला आहे, त्याप्रमाणे दिव्यांग क्रिकेटपटूंचाही करावा,
बीसीसीआयची मान्यता न मिळाल्याने राज्य स्तरावर अनेक संघटना आता फोफावल्या आहेत. व्हीलचेअर क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे टाकावे लागत आहेत.
संतोष म्हणाला, ‘‘जेव्हा आम्ही नेपाळ दौऱ्यावर गेलो होतो, त्या वेळी एका संघटनेने आम्हाला प्रत्येकाला १५ हजार रुपये भरायला लावले होते. त्या वेळी माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. त्यानंतर मी भारतीय व्हीलचेअर संघटनेशी जोडलो गेल्यानंतर या संघटनेने माझी खूप काळजी घेतली.’’
संतोषला राज्य सरकारकडून एक हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्याचे वडील व भाऊ त्याला धान्य देतात.
बांग्लादेश आणि नेपाळविरुद्ध खेळलेला निर्मलसिंह म्हणाला, ‘‘मला फेसबुकवरून व्हीलचेयर क्रिकेटविषयी माहिती मिळाली. मी चाचणी दिली. पंजाब, तसेच भारतीय संघासाठी माझी निवड झाली. या खेळामुळे आम्हाला आमचं कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली.’’
कधी दूध विक्री, तर कधी फर्निचरचे पॉलिश
म्हशीचं दूध विकून महिन्याला चार हजार रुपये कमावणारा निर्मल कधी कधी फर्निचर पॉलिश करण्याचंही काम करतो.
ते म्हणाला, ‘‘मी दुसरं काय करणार? माझ्या आईची जबाबदारी आहे माझ्यावर. माझा लहान भाऊ मजुरीसाठी बहारिनला गेला आहे. मात्र, आता तेही काम गेलं आहे. करोना महामारीमुळे आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे.’’
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की, ‘‘सध्या बीसीसीआयमध्ये कोणतीही उपसमिती नाही. दिव्यांग क्रिकेट बीसीसीआयच्या एका उपसमितीत राहू शकेल, पण त्यासाठी काही काळ जावा लागेल. बीसीसीआयने संविधानिक सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे आधी मंडळाची चौकट स्पष्ट होणे गरजेचे आहे.’’
हेही वाचा…
edit post
BCCI-SOP | बीसीसीआय पुन्हा सुरू करणार क्रिकेट प्रशिक्षण
edit post
4 Comments