Tennis TW3 | वयचोरी रोखणारी टीडब्लूथ्री चाचणी किती विश्वासार्ह?
वयाची सत्यता तपासणाऱ्या ‘टीडब्लूथ्री’वरच आता प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली
वयचोरीची प्रकरणे सध्या प्रत्येक खेळात पाहायला मिळतात. टेनिसविश्वही यातून सुटलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस महासंघाने (AITA) वयचोरी रोखण्यासाठी ‘टीडब्लूथ्री’ Tennis-TW3 | चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, तज्ज्ञांनी ‘टीडब्लूथ्री’वर शंका उपस्थित केली आहे. या चाचणीपेक्षा ‘एफईएलएस पद्धत’ FELS | किंवा ‘एपिजेनेटिक क्लॉक’ epigenetic clock | अधिक विश्वसनीय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
‘टीडब्लू ३’ Tennis-TW3 | म्हणजे टॅनर व्हाइटहाउस ३ (Tanner Whitehouse 3). या चाचणीवरून तज्झांचे दोन गट पडले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाही (IOC) वाटते, की ‘टीडब्लू ३’ बऱ्याचअंशी अनिर्णायक आहे. अर्थात, या चाचणीचा व्यापक स्वरूपात उपयोग केला जातो.
Tennis-TW3 |देशातील प्रमुख क्रीडा संघटना टीडब्लूथ्री चाचणीचा उपयोग करतात. यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) खेळाडूंची ‘टीडब्लू ३’ चाचणी करतात.
काय आहे टीडब्लू ३ चाचणी?
हाडांच्या परिपक्वतेचे निष्कर्ष टॅनर-व्हाइटहाउस (TW3) किंवा एफईएलएस (FELS) द्वारे काढली जातात. रक्ताचे नमुने, अल्ट्रासाउंड आणि एमआरआय बिगरविकिरण पद्धतीने केले जाते. मात्र, आयओसीच्या मतानुसार, तेही फारसे अचूक नाहीत.
हेही वाचा… भारतीय टेनिसची एके47
‘टीडब्लूथ्री’मध्ये व्यक्तीच्या हाडांची परिपक्वता तपासण्यासाठी डावा हात आणि मनगटाचा एक्स-रे काढला जातो. यातून व्यक्तीच्या वयाची निश्चिती केली जाते. मनगटाच्या स्कॅनमध्ये वयाचा अंदाज २० हाडांच्या तपासणीतून काढला जातो. ही हाडे सुरुवातीला वेगवेगळी असतात. मात्र, वाढत्या वयानंतर ती एकत्र होतात.
रेडिओग्राफसाठी डावा हात आणि मनगटाचा उपयोग केला जातो. त्यामागे हे कारण आहे, की बहुतांश लोकांचा उजवा हात अधिक सक्रिय असतो. अशा वेळी डाव्या हाताच्या तुलनेत उजवा हात जखमी होण्याची शक्यता अधिक असते.
डॉ. सुनीता कल्याणपूर आणि त्यांचे रेडिओलॉजिस्ट पती अर्जुन कल्याणपूर यांनी एआयएफएफ (AIFF)साठी सुमारे तीन हजार फुटबॉलपटूंची टीडब्लू ३ (TW3) चाचणी केली आहे. त्यांनीही मान्य केलं, की ही चाचणी शंभर टक्के योग्य नाही. मात्र, या चाचणीचा वयनिश्चितीचा अंदाज बऱ्यापैकी चांगला आहे.
अर्जुन कल्याणपूर यांनी सांगितले, ‘‘गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात खूप बदल झाले आहेत. आम्ही डेन्मार्कमधील एका सॉफ्टवेअरचा उपयोग करतो. प्रक्रिया बऱ्यापैकी चांगली आहे. यात एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. विशेषत: मुलांनाही फारशी जोखीम नसते. सुरुवातीला वयाचा फरक किमान चार वर्षांपर्यंत असायचा. आता फार तर सहा ते नऊ महिन्यांचा असतो.’’
Tennis-TW3 |तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग करताना त्यातून आलेला वयाचा निष्कर्ष आणि आणि मूळ वयात दोन-तीन वर्षांचा फरक असू शकतो.
मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे फिजिओ अमांडा जॉन्सन म्हणाले, ‘‘ज्या मुलाचा वेगाने विकास होतो, तो वयाच्या १३ व्या वर्षीच १६ वर्षांचा दिसू शकतो. संशोधनांती असे समजले आहे, की एखाद्या सांघिक खेळात जी मुलं मोठी आणि मजबूत असतात, त्यांची निवड होण्याची शक्यता अधिक असते. अशी मुले चाचणीदरम्यान जैविक वयापेक्षा अधिक परिपक्व असतात.’’
अमांडा यांनी हेही सांगितले, की ‘एमयूएफसी’ने (MFUFC) हाडे आणि जैविक वय यातील तपासणीवर अभ्यासही केला होता.
ते म्हणाले, ‘‘या अभ्यासात असे समजले, की सुमारे ३० टक्के खेळाडूंची वाढ एक तर उशिरा होते किंवा लवकर होते. अशा वेळी वयनिश्चिती समूहात प्रशिक्षणातून गेलेल्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षणातील निश्चित आहाराचा लाभ घेता येत नाही.’’
Tennis-TW3 | आयओसीने जून २०१० मध्ये या मुद्द्यावर सांगितले, ‘‘वेगवेगळ्या मुलांच्या वाढीचा वेग वेगवेगळा असतो. एक्स-रे स्कॅनिंगद्वारे हाडांच्या वयाचं आकलन मर्यादित आहे. यामुळे जैविक वयाचा अचूक मूल्यांकन होत नाही.
Tennis-TW3 | लखनौचे स्पोर्ट्स मेडिसिन अभ्यासक डॉ. सरनजित सिंह यांनी सांगितले, की यासाठी ‘एपिजेनेटिक क्लॉक’ (epigenetic clock) ही पद्धत अधिक अचूक आहे.
ते म्हणाले, ‘‘एपिजेनेटिक क्लॉक (epigenetic clock) मध्ये आपण मिथाइल समूहांच्या आण्विक मार्करला पाहतो. यातून डीएनएला जोडताही येतं आणि विलगही करता येतं. डीएनए मार्करच्या अभ्यासाला एपिजेनेटिक्स (epigenetics ) म्हंटले जाते. सध्याच्या काळात हे अभ्यासाचे वेगळे आणि सक्रिय क्षेत्र आहे.’’
front-foot no-balls | आता फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर
August 8, 2020
edit post
Cricket
wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू
August 6, 2020
edit post
Mount Everest series
Edmund Hillary : First on Everest
August 6, 2020
edit post
Hockey
Mumtaz Khan struggle | संघर्षकन्या मुमताज खान
August 4, 2020
edit post
Other sports
Mumtaz Khan Hockey | ‘ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेत पदक जिंकायचंय!’
August 3, 2020
Popular Post…
edit post
Edmund Hillary : First on Everest
by Mahesh Pathade August 6, 2020 0
Edmund Hillary : First on Everest पन्नासचं दशक युद्धज्वराने जर्जर झालेलं होतं. अमेरिका- रशियातील शीतयुद्धही याच काळातलं. दुसरं महायुद्ध शमलं…
edit post
Tennis TW3 | वयचोरी रोखणारी टीडब्लूथ्री चाचणी किती विश्वासार्ह?
by Mahesh Pathade August 9, 2020 0
वयाची सत्यता तपासणाऱ्या ‘टीडब्लूथ्री’वरच आता प्रश्नचिन्ह Facebook Twitter Youtube नवी दिल्लीवयचोरीची प्रकरणे सध्या प्रत्येक खेळात पाहायला मिळतात. टेनिसविश्वही यातून सुटलेले…
edit post
BCCI-SOP | बीसीसीआय पुन्हा सुरू करणार क्रिकेट प्रशिक्षण
by Mahesh Pathade August 4, 2020 0
प्रशिक्षणात ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रतिबंध ज्या सरकारने मिशन बिगीन अगेनअंतर्गत मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. त्यात ६० वर्षांवरील कलाकारांना…
edit post
front-foot no-balls | आता फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर
by Mahesh Pathade August 8, 2020 0
फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय घेतील टीव्ही अंपायर! दुबई ः क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच फ्रंटफूट नोबॉलचा निर्णय मैदानी अंपायर घेणार नाहीत. आता हा…
edit post
Mumtaz Khan struggle | संघर्षकन्या मुमताज खान
by Mahesh Pathade August 4, 2020 0
संघर्षकन्या मुमताज खान मुमताज खान mumtaz khan | कदाचित हॉकीपटू म्हणून लौकिक मिळवू शकली नसती. मात्र, २०११ मध्ये शालेय स्पर्धेत…
edit post
नदालही खेळणार नाही अमेरिकन ओपन!
by Mahesh Pathade August 8, 2020 0
गतविजेत्या नदालचे यूएस ओपन जिंकण्याचे स्वप्न भंगणार माद्रिदRafael Nadal won’t play in US Open | टेनिसविश्वातील प्रतिष्ठेच्या अमेरिकन ओपन या…
edit post
wheelchair cricket | आर्थिक विवंचनेत दिव्यांग क्रिकेटपटू
by Mahesh Pathade August 6, 2020 0
क्रिकेट म्हंटलं, की बख्खळ पैसा! विशेषत: भारतीय क्रिकेट संघ म्हंटला, की प्रत्येक खेळाडू मालामाल होतो, असं म्हणतात. पण हे सर्वच…
edit post
मला श्वास घेता येत नाही…!
by Mahesh Pathade July 28, 2020 0
Mahesh Pathade | +91 80875 64549 | करोना विषाणूने संपूर्ण विश्वाला विळखा घातला तेव्हा असं म्हंटलं गेलं, की आता माणसामाणसातला…
edit post
स्लेजिंग.. एक बोलंदाजी!
by Mahesh Pathade February 10, 2020 0
sledging in cricketsledging-in-cricket | स्लेजिंग आणि क्रिकेट हे समीकरण नवं नाही. विशेषत: समोर कांगारूंचा संघ असेल तर विचारूच नका! मानसिक…
edit post
संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट
by Mahesh Pathade January 1, 2020 0
Kieran Behan gymnastic कायरन बेहान (Kieran Behan) : जीवघेण्या अपघातातूनही बाहेर येत जिम्नॅस्टिक्समध्ये छाप उमटवणारा खेळाडूM. +91 80875 64549 Kieran…
3 Comments