Cricket

Jos Buttler cricketer | ‘जोस’चा जोश!

‘जोस’चा जोश!

कितीही तणाव असला तरी आतून येणारा जो उत्स्फूर्त जोश आहे तो गमावता कामा नये. जोस बटलरनेही Jos Buttler cricketer | तेच केलं. यशाने हुलकावणी दिली तरी त्याने आतला जोश कायम ठेवला आणि डळमळीत कारकिर्दीला उभारी दिली.

Mahesh Pathade
Sports writer

करोनाला हरवणं एक वेळ सोपं आहे, पण आत्मविश्वास गमावला, की त्यातून सावरणं अतिशय कठीण. जोस बटलरच्याही Jos Buttler cricketer | आयुष्यातही असाच प्रसंग आला. त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करता येणार नाही…

करोना महामारीच्या संकटकाळात ठप्प पडलेलं क्रिकेट जरा कुठं लयीत आलं असेल तर ते इंग्लंडमध्ये. जुलै २०२० मध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंड दौरा करण्याचं धाडस दाखवलं आणि इंग्लंडमध्ये पहिल्यांदा क्रिकेटचं मैदान गजबजलं… असं असलं तरी इंग्लंडचा यष्टिरक्षक, फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याच्यासमोर मात्र वेगळंच संकट उभं ठाकलं. लय गमावल्याने त्याची कारकीर्दच पणाला लागली…

युरोपात करोनाने थैमान घातले होते. इंग्लंडही या महामारीत संकटात सापडला. तरीही इंग्लंडने कसोटी क्रिकेटला मंजुरी दिली हे विशेष.. अनेक खेळाडूंचं भवितव्य या खेळावर अवलंबून आहे. त्यापैकीच एक जोस बटलर Jos Buttler cricketer |. या गुणवान खेळाडूची संघातील निवड किती चुकीची आहे, या चर्चेला उधाण आलं, ते विंडीज मालिकेपासून.

विंडीज मालिकेपूर्वीही तो दोन डझन सामने खेळला, पण एकाही सामन्यात त्याला अर्धशतकही झळकावता आले नाही. तो बॅडपॅच असेलही, पण करोनावर्षातल्या पहिल्या कसोटी सामन्यातही हा बॅडपॅच सुरूच राहिला.

जोसवर टीका झाली असली तरी त्याच्या मागे उभी राहिली असेल तर ती त्याची पत्नी लुइस वेबर (Louise Webber).  नैराश्याच्या क्षणी तिनेच त्याला धीर दिला.

पहिली चूक

वेस्ट इंडीजचा कसोटी मालिकेत बटलरला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी होती. मात्र, पहिल्याच कसोटी सामन्यात एका मोक्याच्या क्षणी बटलरकडून जर्मन ब्लॅकवूडचा झेल सुटला.
बटलरची ही चूक इंग्लंडला चांगलीच भोवली. ब्लॅकवूडने या जीवदानाचा फायदा उचलत ९५ धावांची खेळी साकारली. याच खेळीच्या जोरावर विंडीजने इंग्लंडविरुद्ध चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ही एक चूक बटलरच्या कामगिरीवर शंका घेण्यास पुरेशी ठरली.

Jos Buttler cricketer

दुसरी चूक

विंडीज मालिकेतील अपयशानंतर पाकिस्तान मालिकेतही बटलरने पुन्हा चुका केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून दोन झेल सुटले, तर एक स्टम्पिंगची संधीही दवडली.

पाकिस्तानचा शान मसूद 45 धावांवर खेळत होता, तेव्हा यष्ट्यांमागे झेल टिपण्याची महत्त्वाची संधी बटलरने गमावली. याची इंग्लंडला मोठी किंमत चुकवावी लागली. कारण याच मसूदने नंतर 156 धावांची दीडशतकी खेळी साकारली.

इथं बटलरवर दुहेरी तणाव होता. एकीकडे त्याच्या एका चुकीने इंग्लंडवर पुन्हा पराभवाचे ढग जमा झाले, तर दुसरीकडे त्याचे वडील जॉनी यांचीही तब्येत खालावली होती. त्यांना त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

विंडीजविरुद्धच्या अपयशानंतर…

विंडीजविरुद्धच्या पहिल्याच इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर बटलरवर चर्चा होणार नाही तरच नवल. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉघने (Darren Gough) बटलरच्या भवितव्यावर बोट ठेवले. बटलरला जर लयीत यायचं असेल तर त्याला पुढच्या दोन सामन्यांत कामगिरी उंचवावी लागेल, अन्यथा त्याची गच्छंती निश्चित.

डॅरेन गॉघची ही प्रतिक्रिया बटलरला पुढच्या धोक्याचे संकेत देणारी होती. कारण ज्या वेळी माजी क्रिकेटपटू प्रतिक्रिया नोंदवतात, तेव्हा त्याचा अंशतः परिणाम निवड समितीच्या निर्णयातून डोकावतोच.

बटलरच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह

बटलर फक्त यष्टिरक्षक नाही, तर उत्तम फलंदाजही आहे. त्याच्या या अपयशाला भूतकाळही कारणीभूत होता. कारण यापूर्वीच्या १२ डावांत तो अर्धशतकही झळकावू शकलेला नाही. अशा परिस्थितीत बटलरला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जर्मन ब्लॅकवूडचा झेलही टिपता आला नाही.

ही चूक इंग्लंडला चांगलीच महागात पडली. त्यामुळे क्रिकेटविश्वात बटलरच्या भवितव्यावरच चर्चा झडू लागल्या. अशा वेळी बटलरच्या मनात काय चालले असेल, याची कल्पना न केलेली बरी.. इंग्लंडमधील माजी क्रिकेटपटूंनी त्याला काही सल्लेही दिले. ऐकावे जनाचे की करावे मनाचे अशा द्विधा मन:स्थितीत बटलर सापडला.

इंग्लंडसाठी ५८ कसोटी सामन्यांत २२९ गडी टिपणारे डॅरेन गॉघ (Darren Gough) म्हणाले, ‘‘बटलरसमोर आता पुढचे दोन सामनेच आहेत. तिथे प्रभाव पाडू शकला नाही तर त्याची कारकीर्द धोक्यात असेल.’’

अर्थात, गॉघ यांनी बटलरचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘‘तो प्रतिभावान खेळाडू आहे. नवी पिढी त्याच्याकडून प्रेरणा घेते. त्याच्याकडे फलंदाजीतले नवनवे अस्र आहेत. कसोटी सामना असेल तर झटपट बाद होऊन चालत नाही. नेमकं हेच सूत्र बटलर विसरला आहे.’’

‘मला दबाव जाणवतोय…!’

बटलर या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ झाला. बटलरची मनोवस्था कशी असेल, याचा विचार बटलरशिवाय कोणीही जाणू शकणार नाही. बटलरवर एक प्रकारचा दबाव नक्कीच आला असेल. मला दबाव जाणवतोय, असं तो म्हणालाही.

बटलरने २५ जुलै २०२० रोजी सांगितले, की गेल्या काही कसोटी सामन्यांत धावा जमवण्यात अपयशी ठरल्यानंतर संघातील स्थान दोलायमान झाले आहे. त्याचा तणाव मला जाणवतोय…

हा तणाव जाणवणारच होता. कारण बटलरची ढासळती कामगिरी हेच त्याचं प्रमुख कारण होतं. गेल्या सात कसोटी सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता येऊ शकलेलं नाही. वयही फार नाही.

अवघ्या २९ वर्षीय बटलरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात सुरुवातीला ६७ धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. ही खेळी महत्त्वपूर्ण होती. या खेळीमुळेच इंग्लंड चार बाद १२२ धावसंख्येवरून दोनशेपल्याड गेला होता.

त्या वेळी बटलर आणि ओली पोप यांनी १४० धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे इंग्लंडचा संघ २५० चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला.

अर्थात, या कामगिरीमुळे बटलर लगेच ‘पावन’ होणार नाही. सातत्यपूर्ण कामगिरी हेच संघातील अढळ स्थान मिळविण्याचा निकष असतो.

तरीही बटलरला उभारी मिळण्यासाठी ही खेळी महत्त्वाची होती. जेथे संघाला गरज होती, तेथे बटलर धावून आला. विंडीजविरुद्ध बटलरला दमदार पुनरागमनासाठी यशाचे दार नाही म्हंटले तरी थोडेसे किलकिले झाले होते.

संघातील स्थानाबाबत तू खरंच अस्वस्थ होता का, असा प्रश्न विचारल्यानंतर बटलर म्हणाला, ‘‘होय, नक्कीच. मला वाटतं, खेळपट्टीवर टिकून राहिल्याने आत्मविश्वास वाढतो. मी नेमकी यातच कमी पडत होतो.’’

बटलरने ‘स्काय स्पोर्ट्स’ला सांगितले, ‘‘मला प्रचंड तणाव जाणवत होता. मी खूप वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे, की तुम्ही केव्हा तणावात असता. हा तणाव दूर सारण्यासाठी तुम्ही कसे सामोरे जाता, यावर सगळं अवलंबून आहे’’

पुन्हा तणावात

विंडीजविरुद्ध बटलरसाठी दरवाजे किलकिले झाले, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते बंद होताहेत की काय, असा प्रसंग आला. विंडीजविरुद्धच्या सामन्यात यष्ट्यांमागे त्याने झेल सोडल्याने इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला, तसाच प्रसंग पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही आला. इथंही त्याने दोन झेल सोडले. यष्टिचीत करण्याचीही एक नामी संधीही गमावली.

माजी यष्टिरक्षकांकडून दिलासा

संघातील स्थान डळमळीत असेल तर खेळाडूची अवस्था दोलायमान होते. हा तणाव खेळावरही जाणवतो. त्यामुळे इंग्लंडमधील माजी यष्टिरक्षकांना वाटतं, की इंग्लंड संघाने बटलरवरील हा तणाव दूर करायला हवा.

आता पाकिस्तानविरुद्ध चुका केल्यानंतर इंग्लंड पुन्हा पराभवाच्या छायेत आला. केवळ बटलरमुळेच संघाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागणार होते.

माजी यष्टिरक्षक मॅट प्रायरने सांगितले, ‘‘बटलरची कामगिरी ढासळतेय. अशा वेळी संघाने त्याला धीर द्यायला हवा. त्याची मदत करायला हवी.’’

प्रायर असेही म्हणाला, ‘‘मी जोसला जवळून पाहिलं आहे. आता तो अशा स्थितीत आहे, जेथे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकदा तो हातांकडे पाहतो, ग्लव्हजला पाहतो. जर यष्ट्यांमागे तुम्ही पुन्हा लयीमध्ये येण्यासाठी संघर्ष करता, तेव्हा ती भयंकर अवस्था असते. कारण तुम्हाला माहीत असतं, की चेंडू तुमच्याच जवळ येणार आहे. अशा वेळी सात तास एकाग्रता राखणे आवश्यक आहे.’’

माजी यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक स्टीवर्टलाही बटलरची अवस्था जाणवतेय. तो म्हणतो, ‘‘इतर दहा खेळाडूंना समजायला हवं, की जोसची वेळ चांगली नाही. अशा वेळी त्याला तणावापासून वाचवायला हवं.’’

पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दोन झेल सोडणं, स्टम्पिंगचीही स्थिती दवडणं हे बटलरसाठी भयंकर तणावपूर्ण होतं. मात्र, याच सामन्यात त्याला चुकीची भरपाई करण्याची एक संधी चालून आली. यष्ट्यांमागे तो अपयशी ठरलाच होता, पण फलंदाजीत त्याला ही कसूर भरून काढायची एक संधी आली.

निर्णायक सामन्यात बटलर लयीत

पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडची फलंदाजी डळमळीत झाली होती. एक क्षण असा होता, की 117 धावांवर इंग्लंडने पाच गडी गमावले होते. कसोटी सामन्यात खेळपट्टीवर टिकून खेळणे आवश्यक असताना इंग्लंडने खंदे पाच फलंदाज गमावले होते.

खेळपट्टीवर जोस बटलर Jos Buttler cricketer | आणि ख्रिस वोक्स होता. बटलरने ही संधी गमावली नाही. इथे तो त्वेषाने लढला आणि वोक्ससोबत 139 धावांची महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी रचली.

बटलरने 75 धावांची पाऊणशतकी खेळी साकारली. ही खेळी साकारली तेव्हा बटलरवर दुहेरी तणाव होता. एक तर कामगिरी खालावत होती, तर दुसरीकडे वडील जॉनी यांचीही तब्येत खालावली होती. त्यांना त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

कर्णधाराकडून कौतुकाची थाप

बटलरने या दुहेरी तणावावर मात केली आणि पाकिस्तानविरुद्ध धीरोदात्त खेळी साकारत इंग्लंडला नाट्यमय विजय मिळवून दिला. या विजयानंतर बटलरने सांगितलं, की माझे वडील रुग्णालयात होते, माझी कामगिरीही खालावत असल्याने मला भयंकर तणाव जाणवत होता.

हे ऐकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्याच्या लढाऊ वृत्तीचं कौतुक केलं आणि आपल्या डोक्यावरची कॅप उतरवत ती बटलरच्या डोक्यावर ठेवली.

अशा या कठीण प्रसंगात बटलरने ज्या पद्धतीने खेळ केला त्याचं संघातील सर्वांनाच कौतुक होतं. रूट म्हणाला, ‘‘एक माणूस म्हणून बटलरच्या आयुष्यात आलेले हे प्रसंग बरेच काही सांगून जातात. तो ज्या पद्धतीने खेळला ती एक असाधारण कामगिरी आहे. बाह्य तणाव असताना अशी कामगिरी करणे खरोखर अविश्वसनीय आहे. त्याच्या या कामगिरीने मी खूप आनंदी आहे.’’

फलंदाजीतील खराब कामगिरीचा सामना करणाऱ्या बटलरसाठी ही खेळी महत्त्वपूर्ण ठरली. टीकाकार तर त्याला संघाबाहेर ठेवण्याच्या गप्पा झोडत होते. पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व मिळविणाऱ्या तीन संधी त्याने गमावल्या होत्या. मात्र, याच बटलरने स्वतःला सावरत संघाला विजयही मिळवून दिला.

बटलरने ही कामगिरी केली नसती, तर कदाचित पाकिस्तानविरुद्धचा तो त्याचा अखेरचा कसोटी सामना असता. बटलरला हे कुठे तरी जाणवत होतं. कारण यापूर्वीच्या 13 डावांत त्याला फक्त एकदाच अर्धशतकी खेळी साकारता आली होती.

‘… तर तो अखेरचा सामना असता!’

अशा स्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यष्ट्यांमागे दोन झेल सोडणे वेदना देणारे होते. हे कमी की काय स्टम्पिंगचीही संधी गमावल्याने त्याला वाटलं, आता सगळं काही संपलं.

‘‘अनेकदा तुम्ही एकटे असता तेव्हा मनात भयंकर विचार येत असतात. आता एवढ्या चुका केल्यानंतर आता धावा करता आल्या नाही तर हा कारकिर्दीतला अखेरचा कसोटी सामना ठरेल.’’
– जोस बटलर, यष्टिरक्षक, इंग्लंड

यष्टिरक्षण सुधारण्याचे आव्हान

धावा केल्या असल्या तरी ते पुरेसं नाही, हेही बटलर जाणून आहे. कारण तो केवळ फलंदाज नाही, तर यष्टिरक्षकही आहे. यष्टिरक्षण हीदेखील त्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, याची त्याला जाणीव आहे. नेमकी हीच जबाबदारी त्याला पार पाडता आली नाही.

अर्थात, क्रिकेटमध्ये निकालाला महत्त्व आहे. आता तणाव खरं तर पाकिस्तानवर आला होता. कारण बटलर आणि वोक्स यांच्या शतकी भागीदारीमुळे त्यांनी हातचा सामना गमावला होता. पाकिस्तानचा प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक तर प्रचंड निराश झाला.

‘‘आम्ही खूप निराश झालो आहे. इंग्लंडचे पाच खंदे फलंदाज झटपट बाद करूनही इंग्लंडला विजय मिळविण्याची संधी मिळाली. बटलर आणि वोक्स यांनी आमची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. या दोघांनी आमचे मनसुबे उधळून लावले.’’
– मिसबाह-उल-हक, प्रशिक्षक, पाकिस्तान क्रिकेट संघ

जेव्हा कधी असे तणावाचे प्रसंग आले तर खेळाडूने खचू नये. बटलरनेही Jos Buttler cricketer | हेच केलं. उमेद कायम ठेवली. करोनोत्तर काळात याच उमेदीने क्रीडाविश्व उभारी घेईल अशी आशा करायला हरकत नाही.

Read more…

हेही वाचा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!