Cricket

Mitchell Starc settlement | स्टार्कची विमा कंपनीशी तडजोड

Follow us….

 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क Mitchell Starc | जखमी असल्याने २०१८ च्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये (IPL) मध्ये खेळू शकला नव्हता. त्याला कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने करारबद्ध केले होते. त्या वेळी स्टार्कने विमा काढला होता.

जर खेळाडू जखमी झाल्याने आयपीएल खेळू शकला नाही तर विमा कंपनीकडून त्याला १५ लाख ३० हजार डॉलर विमा मिळतो. याच रकमेवर स्टार्कने दावा केला होता.

‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार ‘‘व्हिक्टोरिया काउंटी कोर्टात सुनावणीच्या दोन दिवसआधी सोमवारी, १० ऑगस्ट २०२० रोजी स्टार्क आणि विमा कंपनीत तडजोड झाली.’’

या वृत्ता नमूद केले आहे, की ‘‘तडजोडीच्या अटी अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. यात आर्थिक तडजोडीचाही समावेश आहे. मात्र, काही दिवसांत याची माहिती कोर्टाला दिली जाईल.’’

स्टार्कला २०१८ च्या आयपीएलपूर्वी केकेआरने (KKR) १८ लाख डॉलर (९ कोटी ४० लाख रुपये) एवढ्या घसघशीत रकमेत करारबद्ध केले होते. मात्र, उजव्या पायाला दुखापत झाल्याने तो एकही सामना खेळू शकला नव्हता.

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या स्टार्कने १० मार्च २०१८ रोजी दावा केला होता, की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी खडबडीत होती. त्यामुळे गोलंदाजी करताना उजव्या पायाला दुखापत झाली.

आणखी काही सत्र गोलंदाजी केल्याने दुखापत गंभीर झाली. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान उजवा पाय फ्रॅक्चर झाला.

स्टार्कने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विमा कंपनीविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला होता. विमा कंपनीने पोर्ट एलिझाबेथमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुखापतीला अयोग्य ठरवले होते.

स्टार्क आणि विमा कंपनी दोघांनी कोर्टात आपली बाजू मांडली होती.

Read more…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!