आता महिला आयपीएलही आयोजित करणार!
महिला इंडियन प्रीमियर लीगची Womens-IPL-2020 | योजना तयार असून, आम्ही आता महिला आयपीएलही आयोजित करू, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारी, २ ऑगस्ट २०२० रोजी दिली. महिला आयपीएल ‘चॅलेंजर सीरिज’ या नावाने ओळखली जाते..
भारतात वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे पुरुषांची आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान (अद्याप तारीख निश्चित नाही) संयुक्त अरब अमिरातीत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांच्या माहितीनुसार महिला आयपीएललाही Womens-IPL-2020 | या कार्यक्रमात स्थान दिले जाणार आहे. आयपीएल संचालन परिषदेच्या २ ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत गांगुली यांनी सांगितले, ‘‘आमच्याकडे महिला आयपीएलची संपूर्ण योजना तयार आहे आणि राष्ट्रीय महिला संघासाठीही योजना आहे.’’
सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय दिलेला नाही. त्यांच्या निर्णयची बीसीसीआयला प्रतीक्षा आहे. गांगुली यांनी महिला आयपीएलची सविस्तर माहिती दिली नाही, मात्र या या योजनेची माहिती असलेले एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की महिला चॅलेंजरचे women’s Challenger series | आयोजन गेल्या वर्षीसारखेच आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात होईल.
हेही वाचा…. आयपीएलमध्ये 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?
सूत्रांनी सांगितले, ‘‘महिला चॅलेंजर सीरिज १ ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्याची योजना आहे. तत्पूर्वी शिबिर घेतले जाईल.’’ भारतीय संघाचा माजी कर्णधार गांगुलीने सांगितले, की राष्ट्रीय संघाशी करारबद्ध झालेल्या महिला खेळाडूंचे शिबिर आयोजित केले जाणार आहे. मात्र तूर्तास करोना महामारीमुळे हे शिबिर पुढे ढकलले आहे.
गांगुली म्हणाले, ‘‘आम्ही कोणतीही जोखीम घेणार नाही. मग तो पुरुष खेळाडू असो वा महिला खेळाडू. कोणतीही क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे सध्या धोकादायक ठरू शकते.’’ ते म्हणाले, ‘‘कोविड-१९ मुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीही बंद राहणार आहे. मात्र, आमच्याकडे योजना तयार आहे आणि महिला संघाच्या शिबिराचेही आयोजन केले जाईल.’’
बीसीसीआयची क्रिकेट संचालन टीम कार्यक्रम तयार करीत आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादित षटकांचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
मितालीसह महिला खेळाडूंकडून स्वागत
भारतीय महिला वन-डे संघाची कर्णधार मिताली राजसह इतर क्रिकेटपटूंनी सौरव सौरव गांगुली यांच्या घोषणेचे स्वागत केले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुरुष इंडियन प्रीमियर लीगदरम्यानन (आयपीएल) महिला आयपीएलचेही Womens-IPL-2020 | आयोजन केले जाणार असल्याची घोषणा गांगुली यांनी केली आहे.
‘‘ही खूप छान बातमी आहे. आमची एकदिवसीय विश्वकरंडक मोहीम अखेर सुरू होईल. सौरव गांगुली, बीसीसीआय, जय शहा यांना धन्यवाद।’’
– Mithali Raj
मार्च २०२० मध्ये झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय महिला संघ एकही सामना खेळलेला नाही. फक्त एकदिवसीय सामन्यात खेळलेली मिताली राष्ट्रीय संघाकडून नोव्हेंबरमध्येच खेळली होती.
इंग्लंडचा दौरा रद्द झाल्यानंतर महिला संघाला फेब्रुवारी-मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी फारसं क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र, गांगुली यांच्या घोषणेने काहीअंशी चिंता मिटली आहे.
मितालीने ट्वीट केले, ‘‘ही खूप छान बातमी आहे. आमची एकदिवसीय विश्वकरंडक मोहीम अखेर सुरू होईल. सौरव गांगुली, बीसीसीआय, जय शहा यांना धन्यवाद आणि महिला क्रिकेटला समर्थन केल्याबद्दल बोरिया मजूमदार यांनाही धन्यवाद।’’ संघाची वरिष्ठ फिरकी गोलंदाज पूनम यादवनेही बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना धन्यवाद दिले आहेत.
जेव्हा आयपीएलची तयारी जोरात सुरू होती, तेव्हा महिला संघाचा इंग्लंड दौरा रद्द करण्यात आला होता. यामुळे बीसीसीआयला टीकेचा सामना करावा लागला होता.
Read more...
ग्रेग चॅपेल विरुद्ध सौरव गांगुली
भारतीय संघाला पहिल्यांदाच सौरव गांगुलीसारखा उत्तम कर्णधार लाभला होता. भारतीय क्रिकेटमध्ये विजिगीषू वृत्ती त्यानेच रुजवली असं म्हंटलं तर वावगं ठरणार...
Comments 1