• Latest
  • Trending

मला श्वास घेता येत नाही…!

January 29, 2023

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

मला श्वास घेता येत नाही…!

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 29, 2023
in All Sports, Basketball, Football
6
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

मला श्वास घेता येत नाही…!

Mahesh Pathade | +91 80875 64549 |


 

करोना विषाणूने संपूर्ण विश्वाला विळखा घातला तेव्हा असं म्हंटलं गेलं, की आता माणसामाणसातला भेद नव्याने उभा ठाकला आहे. दलित-सवर्ण, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा हे भेद राहिलेच नाहीत. आता ज्याला कोरोना, तो विटाळ समजला जाईल. मग तो उच्चवर्णीय असो वा गर्भश्रीमंत. पण छे… अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात कोरोनापेक्षाही मनातला विटाळ अजूनही कायम आहे, याचंच वैषम्य वाटतं. आजही तिथे वर्णभेद तितकाच टोकदार आहे. एकवेळ कोरोनाचा विषाणू परवडला; पण या वर्णभेदाच्या विषाणूने तर माणुसकीलाच काळिमा फासला. जिथे माणुसकी नाही तिथे असतात फक्त हिंस्र श्वापदं.
हा मनातला उद्वेग व्यक्त करण्याचं कारण म्हणजे वर्णभेदाचा बळी ठरलेला निष्पाप जॉर्ज फ्लॉयड (George Floyed). हे अमेरिकेत घडावं, याचं आश्चर्य वाटतं. ज्या अमेरिकेत अब्राहम लिंकन, बराक ओबामासारखे राष्ट्राध्यक्ष झाले, तेथे वर्णभेद इतका पराकोटीचा असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. अधूनमधून कधी तरी डोकावत होता, मात्र तो लाव्हा रसासारखा असा बाहेर येईल असं कधीही वाटलं नव्हतं. ज्या अब्राहम लिंकन यांनी दासप्रथा नष्ट केली, त्याच लिंकन यांच्या देशात गोऱ्यांच्या मनातला कृष्णवर्णीय अजूनही गुलामच आहे…
ही घटना घडली मंगळवारी, 25 मे 2020 रोजी अमेरिकेतल्या मिनियापोलिस शहरात. एका क्षुल्लक कारणावरून, कोणतीही शहानिशा न करता जॉर्ज फ्लॉयडला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याला इतकी अमानवी वागणूक दिली, छळ केला, की माणुसकीही ओशाळली. हा अत्याचाराचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा वणवा पेटावा तशी अमेरिका संतापाने धुमसली. लोकं रस्त्यावर उतरली. ज्या कोरोना महामारीने अमेरिका बेजार झाली, त्यात हिंसक आंदोलनाने संपूर्ण अमेरिका धगधगत आहे.
व्हिडीओमध्ये जॉर्जला (George Floyed) पोलिस वाहनाच्या चाकाजवळ आडवं पाडल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. त्याचे हात मागे हातकडीने जखडले होते, तर एका पोलिस अधिकाऱ्याचा गुडघा त्याच्या मानेवर होता. इतर तिघांनी त्याचं संपूर्ण शरीर गुडघ्यांखाली दाबलं होतं. व्हिडीओत चारही अधिकारी स्पष्टपणे दिसत आहेत. यात डेरेक शौविन Derek Chauvin | नावाचा एक क्रूर पोलिस अधिकारी आहे, ज्याचा गुडघा जॉर्जच्या मानेवर होता, जे. अलेक्झांडर क्वेंगने J. Alexander Kueng | दोन्ही गुडघे त्याच्या कंबरेवर टेकवले होते, तर थॉमस लेन Thomas Lane | याने गुडघ्यावर बसून त्याचे पाय जखडले होते. चौथा अधिकारी टोउ थाओ Tou Thao | या सगळ्या प्रकारावर लक्ष ठेवून होता. हे इतकं भयानक दृश्य होतं, की पाहतानाही अंगाचा थरकाप उडतो. हा सगळा थरार ३० मिनिटे सुरू होता. हीच तीस मिनिटे जॉर्जच्या आयुष्यातली अखेरची ठरली.

कोण होता जॉर्ज?


आफ्रिकी-अमेरिकी समुदायातला ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉयड (George Floyed) एक उमदा तरुण. त्याचा जन्म उत्तर कॅरोलिनातला. तो टेक्सासमधील ह्युस्टन शहरात राहत होता. कामाच्या शोधात तो अनेक वर्षांपूर्वी तो मिनियापोलिस शहरात आला होता. तेथे तो एका रेस्टॉरंटमध्ये सुरक्षा गार्डचं काम करायचा. रेस्टॉरंटच्याच मालकाच्या घरी तो गेल्या पाच वर्षांपासून भाडेकरू होता.
जॉर्जला सहा वर्षांची मुलगी आहे. ती आई रॉक्सी वॉशिंग्टनसोबत ह्युस्टनमध्ये राहत होती. जॉर्जला ‘बिग फ्लॉयड’ नावानेही ओळखले जात होते. मिनियापोलिस हे त्याचं अतिशय आवडीचं शहर. फ्लॉयड उत्तम खेळाडूही होता. शालेय स्तरावर फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये त्याने विशेष प्रावीण्य मिळवले होते. कदाचित याच खेळात त्याने करिअर केलं असतं, तर तो उत्तम बास्केटबॉलपटू म्हणून नक्कीच नावाजला गेला असता. फ्लॉयड अतिशय शांत स्वभावाचा होता, असं त्याचा शाळकरी मित्र डोननेल कूपरने सांगतो.
जॉर्जला शिक्षणात फारशी रुची नव्हती. त्याने शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडलं आणि एका हिप-हॉप समूहात संगीत देण्यास सुरुवात केली. त्याला स्क्रूडअप क्लिक असे म्हंटले जाते. याच समूहात त्याला बिग फ्लॉयड म्हणून ओळख मिळाली होती. ह्यूस्टनमध्ये हाताला काम मात्र नव्हतं. अखेर तो मिनियापोलिस शहरात आला. या शहरात त्याला काम मिळालं. सुरुलातीला ट्रकचालक म्हणूनही काम केलं. नंतर कांगा लॅटिन बिस्त्रो या लॅटिन अमेरिकी रेस्टॉरंटमध्ये त्या सुरक्षा गार्डचं काम केलं. कोरोना महामारीमुळे त्याच्या हातून हे कामही गेलं. अमेरिकेत लाखो बेरोजगार झाले. त्यातील एक जॉर्ज फ्लॉयड होता.

जॉर्जची अखेरची ती 30 मिनिटे

 

Currently Playing
जॉर्जने 25 मे रोजी सायंकाळी कप फूड्स या रेस्टॉरंटमधून सिगारेटचं एक पाकीट खरेदी केलं. त्याने त्यासाठी 20 डॉलरची नोट दिली. मात्र, स्टोअरच्या एका कर्मचाऱ्याला वाटलं, ही नोट बनावट आहे. त्याने लगेच पोलिसांना फोन केला.
फ्लॉयड तसा ‘कप फूड्स’चा नियमित ग्राहक होता. स्टोअरचा मालक माइक अबुमयालेह त्याला व्यक्तिशः ओळखायचे. अतिशय मनमिळावू आणि आनंदी ग्राहक होता. त्याच्याकडून कधीही कोणताही त्रास नव्हता, असं अबुमयालेह सांगतात.
मात्र, 25 मे रोजी अबुमयालेह स्टोअरवर नव्हते. बनावट नोटेची शंका आल्यानंतर पोलिसांनाच आधी कल्पना दिली जाते. त्या कर्मचाऱ्यानेही तेच केलं. रात्री आठ वाजून एक मिनिटाने स्टोअरवरून त्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना कॉल केला. त्यात त्याने म्हंटले, की ग्राहकाला आम्ही सिगारेट परत करायला सांगितली तर त्याने नकार दिला. रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी चार पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हे चार अधिकारी होते डेरेक शौविन Derek Chauvin |, जे. अलेक्झांडर क्वेंग J. Alexander Kueng |, थॉमस लेन Thomas Lane |, टोउ थाओ Tou Thao |
स्टोअरच्या बाजूला उभ्या असलेल्या कारजवळ आधी थॉमस लेन आणि जे. अलेक्झांडर क्वेंग गेले. कारमध्ये फ्लॉयडसह त्याचे दोन मित्र बसलेले होते.
कारजवळ पोहोचल्यानंतर थॉमस लेनने लगेच बंदूक बाहेर काढत फ्लॉयडवर ताणली. हँड्सअप म्हणत त्याने फ्लॉयडला कारबाहेर ओढले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. मात्र, कारजवळ गेल्यासरशी थॉमस लेन याला असं काय जाणवलं, की थेट बंदूक फ्लॉयडवर ताणली?
फ्लॉयडला बाहेर काढल्याबरोबर त्याला हातकड्या बांधण्यास सुरुवात केली. फ्लॉयडने त्याला विरोध केला. मात्र, बळाचा वापर करीत त्याचे दोन्ही हात मागे नेत त्याला हातकडी बांधली. इथे फ्लॉयडने विरोध करणे थांबवले. तुला आम्ही बनावट नोट वापरण्याच्या गुन्ह्यात अटक केल्याचे कारण लेनने त्याला सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला अटक करून पोलिस कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. यात जॉर्जने कोणताही प्रतिकार केल्याचं फूटेजमध्ये दिसत नाही.
यातील डेरेक शौविन या पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वीच तब्बल १७ तक्रारी, तर टोउ थाओ याच्याविरुद्ध ६ तक्रारी दाखल आहेत. या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची कारकीर्द तशीही डागाळलेलीच होती. कारण डेरेकने यापूर्वी तीन वेळा बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. त्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर टोउविरुद्ध २०१७ मध्ये निर्दयतेचा खटला दाखल होता. या चारही पोलिस अधिकाऱ्यांनी जॉर्जला अशा पद्धतीने जमिनीवर दाबले होते, की त्याला कोणतीही हालचाल करता येत नव्हती.
हेही वाचा…

मी का गप्प बसावं?


फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर


justice for george floyd
जॉर्ज फ्लॉयडला मारताना क्रूर पोलिस अधिकारी डेरेक शौविन. घटनेचा निषेध करताना नागरिक
या पोलिस अधिकाऱ्यांनी फ्लॉयडवर आठ वाजून १४ मिनिटांनी जमिनीवर दाबले. संपूर्ण फूटेजमध्ये जॉर्ज कुठेही प्रतिकार करताना दिसत नाही. मात्र, चारही निर्दयी पोलिस अधिकारी त्याच्यावर गुडघे रोवून होते. डेरेकचा गुडघा जॉर्जच्या मानेवरच असल्याने त्याला श्वासही घेता येत नव्हता. हे फूटेज रात्री आठ वाजून २० मिनिटांचे आहे. त्यात जॉर्ज विव्हळत होता. तो कळवळून सांगत होता, I can’t breathe, man. (मला श्वास घेता येत नाही..)
तेथील एका नागरिकाने जॉर्जची अवस्था पाहून विचारले, ‘‘तुला काय हवंय?’’
जॉर्ज कळवळून म्हणाला, मला श्वास घेता येत नाही. ‘‘गुडघा माझ्या मानेवर आहे…’’(I can’t breathe. Please, the knee in my neck.)
निर्दय पोलिस अधिकारी जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून म्हणाला, ‘‘कारमध्ये बस.’’ (Well, get up, get in the car, man)
जॉर्ज म्हणायचा, ‘‘मला हलताही येत नाही.’’
फ्लॉयड कसा हलणार, त्या नराधम पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ताकदीने गुडघे जे टेकवले होते आणि म्हणायचे, ‘‘कारमध्ये बस.’’
डेरेक त्याच्या मानेवर गुडघे आणखी घट्ट रोवून म्हणायचा, ‘‘कारमध्ये बस…’’ (get in the car)
जॉर्ज कळवळत होता. त्याला हालचालही करता येत नव्हती. तो म्हणायचा, ‘‘मला हलता येत नाही.’’
डेरेक त्याची मान गुडघ्याने इतक्या जोराने दाबायचा, की आता जॉर्जला वेदना असह्य झाल्या. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, ‘‘ममा.’’ (mama).
डेरेक त्याच्या मानेवर पुन्हा जोर देऊन म्हणायचा, ‘‘कारमध्ये बस.’’ (get in the car)
डेरेकच्या तोंडातून शब्द निघाला, ‘‘आय काण्ट.’’ (I can’t)
जॉर्जने पाच मिनिटांच्या कालावधीत तब्बल 16 वेळा सांगितलं, ‘‘I can’t breathe.’’
डेरेक त्याच्या मानेवरून पाय काढत नव्हता.
काही जणांना पोलिसांची ही निर्दयता असह्य झाली. ते डेरेकला म्हणायचे, ‘‘सोडा त्याला..’’ (Get off of him now!)
फूटेजमध्ये एका महिलेचा आवाज आहे. ती सांगत होती, ‘‘तुम्ही सगळे चुकीचं करताय.’’ (What is wrong with you all?)
या सगळ्या प्रकारात जॉर्जचा कळवळणारा आवाज थांबला होता. हालचालही थांबली. हे तेथे जमललेल्या प्रत्येकाला लक्षात आलं. ते म्हणाले, ‘‘भाऊ, त्याची हालचाल थांबली..’’ (Bro, he’s not (explative) moving)
‘‘तुम्ही त्याला ठार मारले..’’
पोलिस अधिकारी म्हणायचे, ‘‘त्याची नाडी चालू आहे.’’
एक महिला मोबाइलवर व्हिडीओ काढत म्हणाली, ‘‘आम्हाला बघूद्या.’’
तर पोलिस अधिकारी सांगायचा, ‘‘आम्ही तपासली आहे.’’
एक जण म्हणाला, ‘‘आम्ही तपासतो.’’
मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी कोणालाही जवळ येऊ दिलं नाही. कोणी तरी म्हणालं, ‘‘त्याची नाडी तपासा.’’
निर्दय डेरेकने फ्लॉयडच्या मानेवरून गुडघा तसाच ठेवलेला होता आणि दुसरा अधिकारी त्याची नाडी तपासत होता. ही क्रूरतेची परिसीमा होती. काही वेळाने रुग्णवाहिका आली. त्यातून डॉक्टर उतरला. तोपर्यंत शौविनने जॉर्जच्या मानेवरून गुडघा काढलेला नव्हता. अखेर त्या डॉक्टरने त्याला मागे होण्यास सांगितलं, तेव्हा तो निर्दय शौविन बाजूला झाला. तब्बल 8 मिनिटे आणि 46 सेकंद शौविनचा गुडघा त्याच्या मानेवर होता. या दरम्यान जॉर्ज बेशुद्ध झाला होता. जॉर्जचा निश्चेष्ट देह रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेला. मात्र, तत्पूर्वीच जॉर्जने प्राण सोडले होते. निर्दयी पोलिसांनी हेतुपुरस्सर जॉर्जचा बळी घेतला होता. जॉर्ज गेला तेव्हा मानवतेनेही मान टाकली होती…
हा संपूर्ण व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला, तेव्हा अमेरिकेत हाहाकार माजला. संतापाची लाट पसरली. हिंसक आंदोलनाने मिनियापोलिस शहराचे पोलिस ठाणे फोडले. अमेरिकेतील 140 पेक्षा अधिक शहरांमध्ये आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मायकेल जॉर्डनसह अनेक दिग्गज खेळाडूंनी या घटनेचा निषेध नोंदवला.
अस्वस्थ करणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी झोपू शकलो नाही. अशीच अवस्था जगातल्या प्रत्येकाची झाली आहे. अशा वेळी जॉर्जच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल या कल्पनेनेच अंग शहारतं. त्याची सहा वर्षांची चिमुकली चिमुकली, कसं समजावतील तिला… तिचा बाबा दिसला नाही तर तिला काय सांगतील… जॉर्जच्या तोंडातून अखेरचा ‘ममा’ शब्द हृदयाला घरे पाडून गेला. आता तिची चिमुकली जेव्हा ‘बाबा’ शब्द उच्चारेल तेव्हा तो शब्द ऐकण्याची शक्ती कुटुंबाला मिळो…!!!

Follow us

Sushil Kumar arrested Sushil Kumar arrested Sushil Kumar arrested Sushil Kumar arrested Sushil Kumar arrested Sushil Kumar arrested

हेही वाचा...

महिला क्रिकेट वर्ल्ड कप
All Sports

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण
All Sports

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
All Sports

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022
All Sports

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023

Tags: death of george floydgeorge floydgeorge floyd arrestgeorge floyd deathgeorge floyd familygeorge floyd footagegeorge floyd investigationgeorge floyd killedgeorge floyd killinggeorge floyd murdergeorge floyd newsgeorge floyd policegeorge floyd protestgeorge floyd protestsgeorge floyd riotsgeorge floyd videogeorge floyd what happenedhow did george floyd diejustice for george floydlatest news on george floyd deathminneapolis george floydpolice killingwho killed george floyd
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

फुटबॉलपटूंनी आळवले निषेधाचे सूर...

Comments 6

  1. Pingback: क्रिकेटवीरांनो, तुम्ही कधी बोलणार? - kheliyad
  2. Pingback: पेनल्टी चुकल्याने वर्णद्वेषी टिप्पणी! - kheliyad
  3. Pingback: मी का गप्प बसावं? - kheliyad
  4. Pingback: Tennis TW3 | वयचोरी रोखणारी टीडब्लूथ्री चाचणी किती विश्वासार्ह? - kheliyad
  5. Pingback: अवघ्या ३९ व्या वर्षी भारताचे माजी फुटबॉलपटू मनितोम्बी यांचे निधन - kheliyad
  6. Pingback: Naomi Osaka wins US Open 2020 | नाओमी ओसाकाचा वर्णद्वेषाविरुद्ध फोरहँड - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!