All Sportswrestling

Sakshi claims Arjuna awards | साक्षीचा अर्जुन पुरस्कारावर दावा!

 

Team kheliyad |


भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांसाठी सध्या खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अनेक क्रीडा महासंघांनी आपापल्या खेळाडूंची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. कुस्ती महासंघाने अद्याप कोणत्याही खेळाडूचे नाव पाठविलेले नाही. मात्र, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या साक्षी मलिकने (Sakshi Malik) अर्जुन पुरस्कारावर Arjuna award दावा (claims) केला आहे.

तिला यापूर्वीच ‘खेलरत्न’ Khel Ratna |  या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असे असताना आता अर्जुन पुरस्कारावर दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Sakshi claims Arjuna awards |

अद्याप कुस्ती महासंघाने यावर कोणतीही टिप्पणी केली नसली, तरी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या विनेश फोगटची ‘खेलरत्न’ Khel Ratna | साठी शिफारस केली जाणार असल्याचे कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे.

मात्र, साक्षीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार नसल्याचे कुस्ती महासंघाच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे साक्षीचा कुस्ती महासंघाशी चकमक होण्याची शक्यता आहे.

कुस्ती महासंघ विनेश फोगटची सलग दुसऱ्यांदा ‘खेलरत्न’ Khel Ratna | साठी शिफारस करणार आहे. टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीगीर आहे. मात्र, करोना महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.

Sakshi claims Arjuna awards | गेल्या वर्षी तिचे नाव ‘खेलरत्न’ Khel Ratna | साठी सुचविण्यात आले होते. मात्र, तिला हा पुरस्कार मिळू शकला नाही. त्याऐवजी पहिलवान बजरंग पुनियाला या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

विनेशने गेल्या तीन वर्षांपासून उत्तम कामगिरी करीत आहे. जाकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. 2019 मध्ये तिने नूर सुल्तानमध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत टोकियो ऑलिम्पिकची पात्रताही सिद्ध केली होती.

Sakshi claims Arjuna awards | 2020 च्या सुरुवातीलाच तिने दिल्लीत झालेल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. ही कामगिरी पाहता कुस्ती महासंघ विनेश सध्या ‘खेलरत्न’ Khel Ratna | ची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

साक्षीला रोखणार?

साक्षीला अर्जुन पुरस्कार मिळण्याचे कोणतेही संकेत कुस्ती महासंघाने दिलेले नाहीत. त्यामुळे तिला अर्जुन पुरस्कार मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.

जिला ‘खेलरत्न’ Khel Ratna | सारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे, तिने अर्जुन पुरस्कारासाठी दावा करणेच चुकीचे आहे, असे स्पष्ट मत कुस्ती महासंघाच्या सूत्रांकडून व्यक्त होत आहे. यावर भारतीय कुस्ती महासंघाचे WFI | सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.

तोमर यांनी सांगितले, ‘‘आम्ही विनेशचे नाव ‘खेलरत्न’ Khel Ratna | साठी पाठवणार आहोत. या पुरस्कारासाठी तीच प्रबळ दावेदार आहे. मात्र, अर्जुन पुरस्काराबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. कारण आमच्याकडे फारसे अर्ज आलेले नाहीत.

Sakshi claims Arjuna awards | डब्लूएफआयचे WFI | अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर नावांची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे पाठविली जातील. आमच्याकडे तीन जूनपर्यंत वेळ आहे.’’

डब्लूएफआयच्या WFI | सूत्रांनी सांगितले, की गेल्या काही काळापासून साक्षीची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. तरीही तिने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज पाठवला आहे. तिला 2016 मध्ये जिम्नॅस्ट दीपा कर्माकार आणि नेमबाज जितू राय यांच्यासोबत ‘खेलरत्न’ Khel Ratna |  मिळाला आहे.

युवा पहिलवान सोनम मलिककडून नुकतीच ती दोन वेळा पराभूत झाली होती. सोनमने साक्षीचे आशियाई ऑलिम्पिक पात्रतेचे मनसुबेही धुळीस मिळवले होते. अशा परिस्थितीत डब्लूएफआय WFI | कोणाच्या नावाची शिफारस करते याची उत्सुकता कुस्तीप्रेमींना लागली आहे.

कारण २०१९ मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा दीपक पुनिया (86 किलो) आणि प्रतिभावान मल्ल राहुल आवारे (61 किलो) यांनीही अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज पाठवले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘‘रिओ ऑलिम्पिकपूर्वी त्याने फारशी चांगली कामगिरी केलेली नव्हती. त्यामुळे साक्षीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलेले नव्हते. मात्र, तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याने तिला थेट ‘खेलरत्न’ Khel Ratna |  मिळाला होता. आता तिला अर्जुन पुरस्कारही हवा आहे.’’

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”73″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!