All SportsTennis

Naomi Osaka wins US Open 2020 | नाओमी ओसाकाचा वर्णद्वेषाविरुद्ध फोरहँड

 

नाओमी ओसाकाचा वर्णद्वेषाविरुद्ध फोरहँड


Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

न्यूयॉर्क : तिच्यासमोर बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाचं आव्हान नव्हतंच. तिचा खरा लढा वर्णद्वेषाविरुद्ध होता. त्याच इराद्याने ती मैदानात उतरली आणि जिंकलीही. Naomi Osaka wins US Open 2020 | अगदी पहिला सेट गमावल्यानंतरही! तिने अझारेंकावर नव्हे, तर वर्णद्वेषावरच मात केली आणि अमेरिकन ओपनवर आपले नाव कोरले.

Naomi Osaka wins US Open 2020

टेनिसप्रेमींच्या दृष्टीने ओसाकाचं विजेतेपद ग्रँडस्लॅमपुरतं मर्यादित असेलही, पण ओसाकाने ग्रँडस्लॅम नाही, तर अमेरिकेलाच जिंकलं. तिचा विजय ही जगभरातील वर्णद्वेषी मनोवृत्तीला दिलेली एक चपराकच म्हणायला हवी.

जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बेलारूसच्या अझारेंकाचे आव्हान 1-6, 6-3, 6-3 असे मोडीत काढले. तिचे हे अमेरिकन ओपनचे दुसरे विजेतेपद, तर कारकिर्दीतले तिसरे ग्रँडस्लॅम.

पहिला सेट गमावल्यानंतरही तिने कमबॅक कसे केले, याचा उलगडा स्पर्धेनंतर तिनेच केला. ती म्हणाली, ‘‘तासाभरात एक सेट गमावणे खूपच लाजिरवाणे होते. मग मी विचार केला, की जेवढे शक्य होईल तेवढा प्रतिकार करीत राहायचे आणि खेळ उंचावण्याचा प्रयत्न करायचा.’’

Naomi Osaka wins US Open 2020 | ओसाकाचा हा सकारात्मक विचार कामी आला आणि अमेरिकन ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले.

25 वर्षांनंतर हे प्रथमच घडले…

Naomi Osaka wins US Open 2020 | अमेरिकन ओपनचा 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर अंतिम फेरीत पहिला सेट गमावलेल्या महिला खेळाडूला कमबॅक करीत पुन्हा विजय मिळवता आलेला नाही.

मात्र, अमेरिकन ओपनमध्ये 25 वर्षांनंतर प्रथमच नाओमीने पहिला सेट गमावल्यानंतरही विजय मिळविला आहे. यापूर्वी 1994 मध्ये अरांझ्का सँचेझ व्हिकारियोने स्टेफी ग्राफविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

मी जिंकण्याचा विचार करीत नव्हते. मी फक्त लढा देत होते आणि मी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरले.
नाओमी ओसाका

बावीस वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला. नंतर तिचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. त्या वेळी अवघ्या तीन वर्षांची होती. ती कॅलिफोर्नियात राहते.

ओसाका केवळ अमेरिकन ओपन जिंकण्यासाठी आली नव्हती, तर वर्णभेदाविरुद्ध आवाज उठविण्याच्या निश्चयानेही आली होती.

मास्कने वेधले लक्ष

Naomi Osaka wins US Open 2020ओसाकाने 13 सप्टेंबर 2020 रोजी कोर्टवर उतरली तेव्हा तिच्या मास्कने सर्वांचं लक्ष वेधलं. तिच्या मास्कवर तामिर राइस असे लिहिलेले होते. हा मास्क परिधान करूनच ती खेळली.

तामिर राइस हा बारा वर्षीय कृष्णवर्णीय मुलगा होता. पोलिसांच्या मारहाणीत 2014 मध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने परिधान केलेला हा सातवा मास्क होता.

ज्या कृष्णवर्णीयांची अशा प्रकारे हत्या झाली, त्यांच्या सन्मानासाठी तिने मास्क परिधान केले आहेत. यापूर्वी तिने ब्रियोना टेलर, एलिजाह मॅकक्लेन, ट्रेवोन मार्टिन, अहमद आरबेरी, जॉर्ज फ्लॉयड आणि फिलांडो कास्टिल यांच्या नावाचे मास्क परिधान केले होते.

‘‘मला फक्त एवढंच वाटतं, की लोकांनी आता वर्णद्वेषाविरुद्ध बोलावं.’’ – नाओमी ओसाका

सलग 11 वा विजय

ओसाका आणि बेलारूसच्या अझारेंका या दोन्ही खेळाडू आपल्या तिसऱ्या ग्रँडस्लॅमसाठी लढत होत्या. करोना महामारीमुळे अनेक खेळ ठप्प झाले होते. करोना संकटकाळात जेव्हापासून टेनिस स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून ओसाकाचा हा सलग 11 वा विजय आहे.

ओसाकाने यापूर्वी 2018 मध्ये अमेरिकन ओपन, तर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद जिंकले आहे. अझारेंकाने 2012 आणि 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.

[jnews_slider_8 post_offset=”3″ include_category=”90″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!