बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
बिबळ्या नावाने ओळखला जाणारा प्राणी म्हणजेच बिबट्या (Leopard). त्याला पँथेरा पार्ड्स (Panthera pardus) या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. भारतात बिबट अर्थात बिबट्याला ‘गुलदार’ नावानेही ओळखले जाते. हा प्राणी उष्ण प्रदेशापासून हिम प्रदेशातही बिबट्याचा वावर आढळतो. बिबट्याचे जगातील सर्वांत प्राचीन अवशेष युरोपमध्ये आढळले. एका खोदकामात हे अवशेष आढळले. हे अवशेष सुमारे सहा लाख वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बिबट्याचं अस्तित्व किती प्राचीन आहे, याची कल्पना येईल. बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या अशाच काही गोष्टी…
जग्वारशी बराच मिळताजुळता
बिबट अर्थात बिबट्या (Leopard) मार्जार प्रजातीतला प्राणी आहे. हा प्राणी आपल्याच वंशातील चित्ता आणि जग्वार या दोन प्राण्यांशी बराच मिळताजुळता आहे. या प्राण्यांमध्ये बिबट्या कोणता, याबाबत अनेकांचा संभ्रम होतो. मात्र, त्याच्या पिवळ्या कायेवरील काळे ठिपके आणि त्याची शरीररचना यावरून त्याची ओळख जाणकारांना लगेच होते.
कातडीवरील ठिपके वैशिष्ट्यपूर्ण
हलक्या नरम पिवळ्या रंगाची जाड अशी बिबट्याची कातडी असते. त्याच्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. हे ठिपके बिबव्यासारखे काळे असल्याने ग्रामीण भागात याला बिबट्या किंवा बिबळ्या असे म्हंटले जाते. बिबट्याच्या पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. त्याची शेपटी मात्र त्याच्या लांबीपेक्षा छोटी असते. साधारण तीन फुटांपर्यंत.
झाडांवर सहज चढू शकतो
बिबट्याचे पाय मध्यम आकाराचे असतात. त्यामुळे तो झाडांवर सहजपणे चढू शकतो. विशेषत: त्याचे डोके त्याच्या शरीराच्या कोणत्याही अवयवापेक्षा मोठे असते.
36 ते 72 किलो वजन
बिबट्याचे तोंड जग्वारच्या तोंडापेक्षा छोटे असते. बिबट्याचे वजन 36 ते 72 किलोपर्यंत असू शकते. नराचा आकार मादीपेक्षा सुमारे 30 टक्के मोठा असतो.
जितका क्रूर तितकाच संवेदनशीलही…
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर आय ऑफ दि लेपर्ड (Eye of the Leopard on Big Cat Month) कार्यक्रम चित्रित करताना एक विचित्र घटना पाहायला मिळाली. एका जंगली बिबट्याने मादी बबूनची शिकार केली. त्या वेळी मादी बबूनला तिचे पिलू घट्ट धरून होते. बिबट्याने त्या पिलाला झाडावर नेऊन इतर प्राण्यांपासून त्याचे संरक्षण केल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण रात्र त्या बिबट्याने त्या पिलाची काळजी घेतली. त्याला छातीशी घट्ट असे धरले, जणू ते त्याचेच पिलू आहे.
बिबट्याची वैशिष्ट्ये |
नर बिबट्या | मादी बिबट्या |
तरुण बिबट्याची उंची 40 ते 80 सेंटिमीटर असते. | नर बिबट्या (बिबट) मादी बिबट्यापेक्षा मोठा असतो. |
एका नर बिबट्याचे वजन 30-70 किलो, तर मादी बिबट्याचे वजन 28-60 किलो असते. | बिबट्याचे पंजे रुंद, मजबूत आणि लवचिक असतात. त्यामुळे त्याला शिकार अचूकपणे पकडणे सोपे जाते. |
डोक्यापासून शरीराची लांबी 100-196 सेंटिमीटर असते. यात 70-95 सेंटिमीटर शेपटीचाही समावेश आहे. | कोणत्याही वातावरणात बिबट्या राहू शकतो. वर्षावन, जंगल, पर्वत आदी ठिकाणी बिबटे आढळतात. |
बिबटे आपल्या अधिवासासाठी मोठे स्थान निश्चित करतात. मात्र, वाघाच्या क्षेत्रापासून ते लांब राहणेच पसंत करतात. | आशियात हाँगकाँग, लीबिया, ट्युनिशिया, सिंगापूर, मोरोक्कोसारख्या ठिकाणी बिबट्याच्या दुर्मिळ प्रजाती नामशेष. |
बिबट्या रात्री शिकार करतो. तो त्याच्या अधिवासातील छोटे व शाकाहारी प्राण्यांची शिकार करणे पसंत करतो. ससा, रानडुक्कर, माकड, बबून या प्राण्यांची प्रामुख्याने शिकार करतो. बिबट्या मानवी वस्तीतील पाळीव प्राण्यांचीही शिकार करतो. | बिबट्यांच्या आतापर्यंत ९ प्रजाती आढळल्या आहेत. या प्रजाती अशा : आफ्रिकन बिबट्या (बिबट), अमूर बिबट्या (Leopard), अरबी बिबट्या, भारतीय बिबट्या, हिंदचिनी बिबट्या, जावन बिबट्या, उत्तर चिनी बिबट्या, फारसी बिबट्या, श्रीलंकन बिबट्या. |
बिबट्याच्या डोळ्यांतील पडदे अशा प्रकारचे असतात, की ते रात्री मानवाच्या तुलनेत सात पटींंनी अधिक स्पष्ट पाहू शकतात. बिबट्याचे कान तीक्ष्ण असतात. ते सामान्य मानवाच्या तुलनेत पाच पटींनी अधिक स्पष्ट ऐकू शकतात. बिबट्या रात्री शिकार करतो, तर दिवसा झाडावर आराम करणे पसंत करतात. बिबट्य्या पट्टीचा पोहणारा आहे. नदीत पोहताना अनेकदा आढळला आहे. | बिबट्यांचे आकार क्षेत्रनिहाय वेगवेगळे आढळतात. भारतीय बिबट्यांमध्ये नर 4.2 ते 4.8 फुटांपर्यंत असतो. त्याची शेपटी 2.6 ते 3 फुटांपर्यंत लाब असते. वजन 55 ते 77 किलोदरम्यान असते. काही बिबट्यांचे वजन 90 किलोपर्यंत आढळले आहे. भारतात मादीचा आकार 3.5 – 3.10 फुटांच्या दरम्यान असते. शेपटी 2.6-2.10 फुटांपर्यंत लांब, तर वजन 29 ते 34 किलोपर्यंत असते. |
बिबट्याचा वेग 58 किलोमीटर प्रतितास या गतीने धावू शकतो. तो 6 मीटरपर्यंत लांब उडी घेऊ शकतो, तर 3 मीटरपर्यंत उंच उडी मारू शकतो. बिबट्या चतुर प्राणी आहे. जंगलात तो रहस्यमय पद्धतीने लपून बसतो. अशा वेळी त्याला शोधणे अशक्य होते. | बिबट्याला ताजे मांस आवडते. दक्षिण आफ्रिकेत ससे अधिक आहेत. त्यामुळे बिबट्याचा ते प्रमुख आहार बनतात. कालाहारी वाळवंटातील बिबटे कोल्ह्यांची शिकार करताना आढळतात. याशिवाय मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, सायाळ, बबून, माकडांचीही शिकार करतात. |
बिबट्या झाडावर सहजपणे चढू शकतो. ते वजनदार शिकारही झाडावर घेऊन जातो. बहुतांश वेळा तो झाडावरच शिकारीवर ताव मारतो. | बिबट्या वाघासारखाच एकान्तप्रिय प्राणी आहे. झाडांवर पंजांचे निशाण करून तो आपला एरिया निश्चित करतो. इतर बिबट्यांना त्याच्या एरियात घुसू देत नाही. |
बिबट्याला कोणतेही असे भौगोलिक क्षेत्र नसते. तो कोणत्याही प्रदेशात आढळतो. अनुकूलनशीलता हे बिबट्याचे वैशिष्ट्य आहे. जंगल, पर्वत, वाळवंटात त्याचा वावर असतो. हिमालयातील दुर्गम भागातही हिमबिबटे पाहायला मिळतात. बिबट्याला चित्त्याप्रमाणेच जास्त पाणी पिण्याची गरज भासत नाही. आपल्या शिकारीतूनच मिळालेला ओलावा त्याला पुरेसा असतो. |
एक मादी बिबट एका वेळी 2 ते 6 बछड्यांना जन्म देते. जन्मानंतर बछड्यांचे 8 आठवड्यांपर्यंत संगोपन करते. इतर प्राण्यांकडून शिकार होऊ नये म्हणून ती पिलांना दडवून ठेवते. मादी बिबट बछड्यांना गर्द जंगलात, दाट गल्ल्यांमध्ये, वाळवीच्या ढिगाऱ्यांत किंवा खोल दरीतील भागात सुरक्षित ठेवते. याशिवाय ती प्रत्येक वेळी स्थान बदलत राहते. |
चित्ता आणि बिबट्यात काय आहे फरक? |
चित्ता | बिबट्या |
![]() चित्त्याच्या शरीरावर गोलाकार काळ्या रंगाच्या खुणा असतात. |
![]() बिबट्याच्या शरीरावर काळ्या, भुरकट ठिपक्यांचा गुंतागुंतीचा समूह. |
चित्त्याच्या डोळ्यांच्या कडांपासून तोंडापर्यंत काळी रेघ असते, ज्याला काळे अश्रू म्हंटले जाते. | बिबट्याच्या डोळ्यांत अशा प्रकारची कोणतीही खूण नाही. हेच या दोघांमधील वेगळेपण आहे. |
चित्त्याचा वेग बिबट्यापेक्षा अधिक असतो. त्यामुळे चित्ता पाठलाग करून शिकार मिळवतो. | बिबट्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो घात लावून शिकार करतो. |
चित्ता डरकाळी फोडत नाही. त्याचा मांजरीसारखा आवाज आहे. | बिबट्याची मात्र डरकाळी असते. चित्ता आणि बिबट्यात हा मोठा फरक आहे. |
चित्ता बिबट्याच्या तुलनेत दुबळे आणि बारीक असतात. | बिबट्या चित्त्यापेक्षा जास्त वजनाचा आणि जाड असतो. |
चित्त्याची शेपूट खालच्या बाजूला सरळ असते. | बिबट्याची शेपूट वरच्या बाजूला थोडी वळलेली असते. |
भारतात बिबट्यांची संख्या किती?
60 टक्के भारतात बिबट्यांची संख्या 2014 च्या तुलनेत 2018 मध्ये 60 टक्क्यांनी वाढली आहे.
12,852 भारतात 2018 मध्ये बिबट्यांची संख्या 12,852 पर्यंत आढळली आहे.
7,910 देशात 2014 मध्ये झालेल्या वन्यजीव गणनेत 7,910 बिबटे आढळले होते.
मध्य प्रदेशात सर्वाधिक मध्य प्रदेश : 3,421, कर्नाटक : 1,783, महाराष्ट्र : 1,690
सोर्स : केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केलेला 2018 चा अहवाल.