Tennis

Naomi Osaka leaves WTA | नाओमी ओसाकाचा वर्णद्वेषाविरुद्ध आवाज

 

Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

वेस्टर्न एंड सदर्न टेनिस स्पर्धेत western and southern tennis 2020 | उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर काही तासांतच जपानची चौथी मानांकित नाओमी ओसाका हिने अचानक माघार घेतली. Naomi Osaka leaves WTA | कृष्णवर्णीयांना न्याय मिळण्याचे आवाहन करीत तिने माघार घेतली आहे.

ओसाकाच्या या धक्कादायक निर्णयानंतर तिच्या सहकारी खेळाडूंनीही तिला समर्थन दिलं आहे. त्यामुळे ही स्पर्धाच एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

ओसाकाच्या निर्णयानंतर अमेरिकी टेनिस संघ (USTA), एटीपी टूर आणि डब्ल्यूटीएने (WTA) सांगितले, ‘‘खेळाच्या माध्यमातून टेनिस अमेरिका वर्णद्वेषापासून दूर आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध पाऊल उचलत आहे. यूएसटीए, एटीपी आणि डब्लूटीएने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वेस्टर्न एंड सदर्न टेनिस स्पर्धा 27 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’’

महिला गटात पहिल्या दहा मानांकितांमध्ये समावेश असलेल्या ओसाकाने Naomi Osaka हे पाऊल उचलण्यामागचे कारण म्हणजे, कृष्णवर्णीय जेकब ब्लॅक याची पोलिसांनी केलेली हत्या. या घटनेनंतर बास्केटबॉल, बेसबॉल आणि फुटबॉलमध्येही खेळाडू परिवर्तनाची मागणी करीत आहेत.

Naomi Osaka leaves WTA | ओसाकाने ट्वीट केले, की कृष्णवर्णीय महिला होण्याच्या नात्याने मला वाटते, की कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या पोलिसांच्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धेतून बाहेर पडले पाहिजे.

ओसाका म्हणाली, ‘‘मला नाही वाटत, की स्पर्धेतून बाहेर पडल्याने माझ्या कामगिरीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. जर मी गोऱ्यांच्या प्रभावक्षेत्राखाली असलेल्या खेळातून ही चर्चा छेडत असेल तर ते योग्य दिशेने टाकलेले पाऊल असेल. कृष्णवर्णीयांवर सातत्याने होणाऱ्या पोलिसांच्या अत्याचारामुळे मी दुखावले आहे.’’

Naomi Osaka leaves WTA | अमेरिकेची कृष्णवर्णीय खेळाडू सलोनी स्टीफन्सने ओसाकाच्या ट्वीटला रिट्वीट करीत म्हंटले, ‘‘मला तुझा अभिमान आहे.’’

मिलोस राओनिचनेही बुधवारी उपांत्य फेरीत दाखल झाल्यानंतर सांगितले, की यावर एटीपी आणि डब्लूटीएने संयुक्त कारवाईबाबत विचार करायला हवा.

खेळाडूंनी सामाजिक न्यायाची मागणी केल्यामुळे नॅशलब बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए), महिला एनबीए, मेजर लीग बेसबॉल आणि मेजर लीग सॉकरचे (फुटबॉल) सामनेही स्थगित करण्यात आले आहेत.

Naomi Osaka leaves WTA | टेनिस स्पर्धेत ओसाकाने बारावी मानांकित एनेट कोंटावीटचा 4-6, 6-2, 7-5 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत तिच्यासमोर एलिस मर्टन्सचे आव्हान होते.

महिला गटातील दुसरा उपांत्य सामना व्हिक्टोरिया अजारेंका आणि आठवी मानांकित योहाना कोंटा यांच्या दरम्यान होणार आहे. कोंटाने मारिया सक्कारीचा, तर अजारेंकाने ओंस जाबेरचा पराभव केला.

जोकोविच उपांत्य फेरीत

पुरुष गटात नोवाक जोकोविचला यान लेनार्ड स्ट्रफपर 6-3, 6-1 याचा पराभव करण्यास फारसे सायास पडले नाहीत. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर आता रॉबर्टो बातिस्ता आगुटचे आव्हान असेल. बातिस्ताने डेनिल मेदवेदेवसारख्या दिग्गज खेळाडूचा 1-6, 6-4, 6-3 असा पराभव केला.

दूसरा उपांत्य सामना स्टेफेनोस सिटसिपास आणि राओनिच यांच्यात होईल. रीली ओपलेकाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे सिटिसिपासला अंतिम चार जणांत स्थान मिळाले. राओनिचने फिलिप क्रॅजिनोविचचा 4-6, 7-6 (2), 7-5 असा पराभव केला.

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”68,69″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!