• Latest
  • Trending
19 वर्षांच्या मुलाची आई टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात!

19 वर्षांच्या मुलाची आई टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात!

December 25, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Wednesday, March 22, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

19 वर्षांच्या मुलाची आई टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात!

ही अशी सुपरमॉम आहे, जी टोकियो ऑलिम्पिक खेळली. त्या वेळी तिचं वय होतं 44,. जिम्नास्टिक ऑलिम्पिक गाजविणारी ही सुपरमॉम आहे ओक्साना चुसोविटिना.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 25, 2021
in gymnastics, Inspirational Sport story, Women Power
1
19 वर्षांच्या मुलाची आई टोकियो ऑलिम्पिकच्या मैदानात!

ओक्साना चुसोविटिना

Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

ही अशी सुपरमॉम आहे, जी 2020 ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळली. ज्या वेळी ती ही स्पर्धा खेळली त्या वेळी तिचं वय होतं 44, तर तिच्या मुलाचं वय होतं 19! थक्क करणारी बाब म्हणजे ही सुपरमॉम कारकिर्दीतली विक्रमी आठवी ऑलिम्पिक स्पर्धा (टोकियो 2020) खेळली! ज्या खेळात ती सहभागी झाली, तो काही साधासुधा खेळ नाही, तर तो आहे आर्टिस्टिक जिम्नास्टिक. जिम्नास्टिक खेळात ऑलिम्पिक गाजविणारी ही सुपरमॉम आहे ओक्साना चुसोविटिना…

ओक्साना चुसोविटिना ऑलिम्पिक जिम्नास्टिक

ओक्साना चुसोविटिना | Oksana Chusovitina | हे नाव माहीत नाही असा जिम्नास्टिक्समध्ये अभावानेच आढळेल. या मुलीने चार संघ समृद्ध करीत जगाला जिंकले! तुम्ही म्हणाल, चार संघ समृद्ध केले म्हणजे नेमके काय केले? ओक्साना ही अशी जिम्नास्टिक खेळाडू आहे, की तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चार संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे चार संघ म्हणजे जर्मनी, उझबेकिस्तान, एकिकृत संघ आणि सीआयएस संघ.

आता एकिकृत आणि सीआयएस संघ म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल तर तेही स्पष्ट करतो. सोव्हिएत रशियातील अल्बर्टविले प्रांतात १९९२ मध्ये शीतकालीन ऑलिम्पिक व बार्सिलोनातील १९९२ च्याच ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेत सोव्हिएत संघाचा (बाल्टिक राज्ये वगळून) रशियन संघ होता. थोडक्यात म्हणजे विघटनापूर्वीचा रशिया. त्याला ‘युनिफाइड टीम’ म्हणजे ‘एकिकृत संघ’ असे म्हणतात. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे तर अखंड रशियाचा संघ.

‘सीआयएस’ | Commonwealth of Independent states | (स्वतंत्र राज्यांचे राष्ट्रमंडल) म्हणजे विघटनानंतर जे देश अस्तित्वात आले त्यांना ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’ असे म्हंटले जायचे. म्हणजेच काय, तर या देशांना स्वतंत्र अस्तित्व येईपर्यंत ते ‘सीआयएस’ म्हणूनच कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत.

तर ही ओक्साना जन्मली सोव्हिएत संघात. म्हणजे आताच्या उझबेकिस्तानातील बुखारा या शहरात १९ जून १९७५ मध्ये तिचा जन्म झाला. बुखारा हे तसे ऐतिहासिक शहर. उझबेकिस्तानातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर. या ऐतिहासिक शहरातील ओक्सानाने ऐतिहासिक कामगिरी करून आपल्या शहराचे नाव एक प्रकारे सार्थ ठरवले. रशियन नावं थोडीशी विचित्र असतात. ती नावं उच्चारताना आपल्याला त्रास होतो. विशेषत:  आडनावे वाचताना तर बोबडीच वळते. असो.. ‘ओक्साना’ | Oksana | हे तसे रशियन स्त्रीलिंगी नाव. युक्रेनी भाषेत ‘ओक्साना’ | Oksana | म्हणजे देवाची स्तुती.

ओक्सानाचे क्रीडाकौशल्य हीच एक देवाची स्तुती आहे की काय, पण तिने आर्टिस्टिक जिम्नास्टिक प्रकारात जी असाधारण कामगिरी करून ठेवलीय तिला तोड नाही. विशेष म्हणजे वयाच्या ४२ व्या वर्षीही ओक्साना चुसोविटिना जेव्हा ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धा खेळते तेव्हा मात्र तिला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. आताची चाळिशी ओलांडलेली अवाढव्य माणसं पाहिली, की खरंच ओक्सानाला सलाम केल्याशिवाय तुम्हीही थांबणार नाही. लवचिकता आणि तंदुरुस्ती या दोन्ही गोष्टी चाळिशीनंतरही सांभाळणे सोपे नाहीच. ओक्सानाने मात्र ते लीलया सांभाळले. किंबहुना ती तरुण झाली नि देवाने तिचं वयाचं मीटरच बंद करून ठेवलं की काय काही माहीत नाही; पण चाळिशीनंतरही ओक्साना उच्च प्रतीचं आर्टिस्टिक जिम्नास्टिक करीत होती. ओक्साना जेव्हा करिअरमधील पहिली १९९२ ची बार्सिलोना ऑलिम्पिक खेळत होती, तेव्हा त्याच्या पाच वर्षांनी 1997 मध्ये विश्वविक्रमी जिम्नास्टिक खेळाडू सिमोन बाइल्सचा | Simone Biles | जन्म झाला. एकीकडे सिमोनचा जन्म झाला, तर दुसरीकडे ओक्साना विवाहबद्ध झाली होती. हीच अमेरिकेची सिमोन बाइल्स जिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले, त्या वेळी ओक्साना कारकिर्दीतली सातवी ऑलिम्पिक स्पर्धा खेळत होती!

वयाच्या तेराव्या वर्षी रशियाची चॅम्पियन

ओक्सानाने वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे १९८२ मध्ये जिम्नास्टिकमध्ये पाऊल ठेवले. सहा वर्षांच्या सरावानंतर १९८८ मध्ये तिने वयाच्या तेराव्या वर्षी ज्युनिअर गटात सोव्हिएत रशियाची चॅम्पियनशिप जिंकली. ही छोटी कामगिरी नव्हतीच. कारण रशिया ८० च्या दशकात ऑलिम्पिकमध्ये पहिल्या तीन क्रमांकांतच राहिलेला आहे. त्यामुळे या देशातला सर्वोत्तम खेळाडू हा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा मानकरी मानला जायचा. ज्युनिअर गटात ओक्सानाची ही कामगिरी पाहिल्यानंतर तिचं क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्य त्याच वेळी लिहिलं गेलं होतं. जपानमध्ये १९९० मध्ये झालेल्या जागतिक स्पोर्टस फेअरही ओक्सानाने जिंकली. या स्पर्धेत ओक्सानाने जिम्नास्टिकचा एकही इव्हेंट शिल्लक ठेवला नाही, ज्यात तिला बक्षीस नाही. अनइव्हन बार्समध्येही | uneven bars | तिला बक्षीस होतं. यालाच ‘असिमेट्रिक बार्स’ | Asymmetric Bars | असंही म्हंटलं जातं. १९९१ मधील जागतिक आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स | Artistic Gymnastics | स्पर्धेत फ्लोअर एक्झरसाइजमध्ये | Exercise | तिने विजेतेपद मिळविले, तर व्हॉल्ट प्रकारात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १९९२ मध्ये ओक्साना चुसोविटिना पहिल्यांदा ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धेत उतरली, त्या वेळी रशियाचे विघटन झाले होते. आता ती रशियाची खेळाडू राहिली नव्हती. रशियाचे जे तुकडे झाले होते, त्यातला एक तुकडा म्हणजे उझबेकिस्तान. ती आता रशियाची राहिली नव्हती. मात्र, उझबेकिस्तानला जागतिक स्तरावर अधिकृत मान्यता नव्हती. ऑलिम्पिकमध्ये तिने पाऊल ठेवले, तेव्हा अशा देशांना ‘युनिफाइड संघ’ | Unified Team | असे संबोधले गेले. या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये तिने सांघिक सुवर्णपदक जिंकले आणि फ्लोअर प्रकारात ती सातव्या स्थानावर राहिली. त्याच्या पुढच्याच ऑलिम्पिक स्पर्धेत तिने व्हॉल्ट प्रकारात कांस्य पदक जिंकले.

घरच्यांचा विरोध झुगारून ओक्साना विवाह

ओक्सानाचा विवाहही चर्चेत आला तो तिच्या घरच्यांच्या विरोधामुळे. ओक्सानाचा जन्म कर्मठ विचारांच्या ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. त्यामुळे ओक्सानाने स्वधर्माच्याच मुलाशी विवाह करावा, असा तिच्या कुटुंबाचा हट्ट होता. ओक्सानाने मात्र हा विरोध झुगारला आणि मुस्लिम कुटुंबातील बाखोदीर कुर्बानोव | Bakhodir Kurbanov | याच्याशी विवाह केला. बाखोदिर हा उत्तम पहिलवान. | Wrestler |  दोघेही उझबेकिस्तानकडून खेळत होते. जपानमध्ये 1994 मध्ये आशियाई स्पर्धेत या दोघांची ओळख झाली. बाखोदिर ग्रीको रोमन प्रकारातील मल्ल, तर ओक्साना आर्टिस्टिक जिम्नास्टिक | Artistic Gymnastics | खेळाडू. दोघेही खेळाडू असल्याने त्यांचे सूर जुळले. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, ओक्सानाच्या कुटुंबातून या विवाहाला कडवा विरोध होता. त्याचे कारण म्हणजे बाखोदिर हा मुस्लिम होता. मात्र, या विरोधाचा परिणाम ओक्सानावर झाला नाही. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत दोघेही सहभागी झाले होते. ही स्पर्धा खेळून आल्यानंतर 1997 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. 1999 मध्ये ओक्सानाने अ‍ॅलिशरला जन्म दिला. अ‍ॅलिशर | Alisher Chusovitina | एक वर्षाचा असतानाच हे दोघेही 2000 मधील सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत जोडीने सहभागी झाले. दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळून बाखोदिर खेळातून निवृत्त झाला, पण ओक्सानाला त्याने मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळेच ती आजही खेळत आहे.

ओक्साना चुसोविटिना हिने कारकिर्दीतल्या पहिल्याच ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धेत (१९९२, बार्सिलोना ऑलिम्पिक) सुवर्णपदक जिंकले. त्या वेळी ती सोव्हिएत युनियनचे प्रतिनिधित्व करीत होती. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर उझबेकिस्तान नावाचा देश अस्तित्वात आला. या देशाकडून तिने १९९६, २००० आणि २००४ असे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. नंतर जर्मनीकडून २००८ व २०१२ मध्ये खेळली.

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही ओक्सानाची कामगिरी उंचावतच गेली. 2008 मध्ये तिने व्हॉल्ट प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्या वेळी तिचे वय होते 33. या कामगिरीच्या जोरावरच ओक्साना चुसोविटिना पुन्हा एकदा ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धेसाठी पात्र ठरली. उझबेकिस्तानकडून 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये | Rio Olympic | ती सहभागी झाली. अवघ्या पाच फूट उंचीची ओक्साना स्पर्धेतील सर्वांत अनुभवी ऑलिम्पिक वीरांगणा ठरली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्या वेळी ओक्साना चुसोविटिना हिची ही सातवी ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धा होती आणि वय होतं 41. सर्वांच्या नजरा ओक्सानावर खिळल्या होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव- खरंच ही 40 ची की 16 ची! ही वस्तुस्थिती आहे. तिची गती आणि चापल्य पाहिलं, की कोणीही अचंबित होई. याला म्हणतात तारुण्य, जे कामगिरीच्या कसोटीवर आजही खरेपणा जपतं. अनेक महिलांना वाटतं, की लक्स साबणामुळेच तारुण्य निखरतं. ते नाही का, बाथ टबमध्ये पहुडल्या पहुडल्या, ‘लक्स सौंदर्य साबून से मेरी त्वचा का पता ही नहीं चलता..’ अशातली कृत्रिमता ओक्सानाकडे नव्हतीच.

ओक्साना वयाच्या 41 व्या वर्षी रिओ ऑलिम्पिक खेळतेय हा धक्का पचवला असेल, तर आणखी एक धक्का सहन करा. ती जेव्हा मैदानात उतरली त्या वेळी तिच्या मुलाचं वय होतं 16! म्हणजे ती एका तरुण मुलाची आई होती. आता ओक्साना चुसोविटिना हिचा मुलगा 19 वर्षांचा आहे आणि  2020 च्या ऑलिम्पिक जिम्नास्टिक स्पर्धेसाठी पुन्हा ती सज्ज झाली. मात्र, तिला व्हॉल्ट प्रकारात 14 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वयाची 44 वर्षे पूर्ण केलेली ओक्साना म्हणते, “मला एकही व्याधी नाही. कुठेही दुखत नाही.” ही ऊर्जा, क्षमता, तंदुरुस्ती कुठून येते, यावर ओक्साना हसत हसत म्हणते, “मला माहीत नाही, की मी अजूनही कशी काय तंदुरुस्त आहे? मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही माझ्या आईलाच विचारला तर बरं होईल.”

साधारणपणे एका जिम्नॅस्टच्या आयुष्यात एक किंवा दोनच ऑलिम्पिक स्पर्धा येतात. म्हणजे त्यापेक्षा जास्त स्पर्धा खेळण्यासाठी त्याच्याकडे तेवढी क्षमता असायला हवी. क्षमता असूनही चालत नाही. कारण ऑलिम्पिकसाठी जी निर्धारित पात्रता असते तेवढी कामगिरीही सिद्ध करावी लागते. ओक्सानाने ती केलीच, शिवाय 1992 पासून ओळीने सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होत क्षमताही सिद्ध केली. एक वेळ नेमबाजी किंवा तिरंदाजी या खेळाचं आपण समजू शकतो. तेथे वयाचा अडसर येत नाही. कारण या दोन्ही खेळांमध्ये फारशा शारीरिक हालचाली नसतातच. या खेळांत तुम्ही तुमची पात्रता सिद्धही कराल, पण ओक्सानाचा खेळ तर जिम्नास्टिक्स आहे, जेथे शरीराची केवळ हालचालच नाही, तर संपूर्ण शरीर हवेतल्या हवेत 360 अंशांत फिरवायचे असते. 16 वर्षांच्या मुलींना हे कौशल्य सिद्ध करताना जेथे घाम फुटतो, तेथे ओक्साना तेच कौशल्य वयाच्या चाळिशीनंतरही लीलया सादर करते. हे सगळंच अविश्वसनीय आहे.

तुम्ही रोमानियाच्या नादिया कोमेन्सीचं | Nadia Comaneci | नाव ऐकलंय का? ही नादिया 70 च्या दशकातील उत्तम जिम्नॅस्ट. तिने 1976 च्या माँट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्या वेळी तिचं वय होतं अवघं 14 वर्षे. आणि ती या खेळातून निवृत्त झाली त्या वेळी तिच वय होतं अवघं 19. ही नादिया म्हणते, “आहे का कोणी ओक्सानाच्या वयाचं, जी एवढी कामगिरी करण्याची हिम्मत करू शकेल?” नादिया आता 58 वर्षांची आहे. उण्यापुऱ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीनंतर नादिया पुन्हा खेळण्याची हिम्मत करू शकली नाही, तेथे ओक्साना अजूनही खेळत आहे.

ओक्सानाने सात ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या असल्या तरी बार्सिलोना ऑलिम्पिकमधील एक सुवर्णपदक सोडले तर अन्य स्पर्धांमध्ये ती पदक जिंकू शकलेली नाही. म्हणून ओक्सानाचं यश झाकोळत नाही तर ते अधिक लकाकतं. त्यापैकी पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जन्मभूमी उझबेकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. दुर्दैवाने तिला तेथे कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सरावासाठी असलेला जिम्नास्टिक बार | Gymnastics Bar |  तर गंजलेला होता. केबल वाकलेल्या होत्या. अशा ठिकाणी डोंबल्याचा सराव होणार? पण तरीही ती या गलथान व्यवस्थेतही ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली हे विशेष. पण पदक मिळवू शकली नाही हे तिचं दुर्दैवं. अगदी तिच्या हुकमी व्हॉल्ट प्रकारातही ती अयशस्वी ठरली ते याच असुविधांमुळे.

तसं पाहिलं, तर एक खेळाडू म्हणून ओक्सानाने न भूतो न भविष्यति कामगिरी केली होती. त्यामुळे तिने दिशा बदलण्याचा विचार केला. म्हणजेच एक प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडविण्याच्या विचारात ती होती. पण नियतीने क्रूरपणे तिला पुन्हा खेळण्यास भाग पाडले. होय, क्रूरपणेच.

2002 मध्ये तिचा मुलगा अ‍ॅलिशर याला ल्युकेमिया झाला. ओक्साना हादरलीच. कारण उझबेकिस्तानची वैद्यकीय सुविधा इतकी गलथान होती, की तिथे अ‍ॅलिशरवर उपचार होणेच कठीण. मित्रपरिवाराच्या सल्ल्यावरून तिने जर्मनीतील कोलोनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पैशांची चणचण. कारण एवढा मोठा खर्च पेलवणे शक्यच नव्हते. शिवाय स्थलांतर. तिथे तिला मदत झाली. कुटुंब तिच्या पाठीशी होतंच, पण देणग्या, मित्रपरिवाराकडून झालेली मदत आणि जिम्नास्टिकमधून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेवर अ‍ॅलिशरच्या अतिशय गुंतागुंतीच्या आजारावर उपचार झाले.

ओक्साना पुन्हा जिम्नास्टिक्समध्ये परतली. आता तिने जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारले होते. जर्मनीकडून खेळण्यामागे कृतज्ञतेचा भाव होता. मुलाच्या उपचारासाठी जर्मनीने जे सहकार्य केले ते तिच्यासाठी खूपच मोलाचे होते. हे ऋण फेडणे शक्यच नाही, पण जर्मनीप्रती आपण काही तरी देणे लागतो, या भावनेनेच तिने जर्मनीकडून खेळण्याचा निश्चय केला. सरावासाठीही उत्तम व्यवस्था होती. याच जोरावर तिने 2006 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आपलं कौशल्य पणास लावलं आणि ऑलिम्पिकमध्ये कारकिर्दीतलं दुसरं पदक जिंकलं, ते म्हणजे रौप्य (सिल्व्हर). जर्मनीत येऊन एक प्रकारे तिची ‘चांदी’च झाली होती. त्या वेळी ती 31 वर्षांची होती. घरी परतली तेव्हा तिच्या कानी शुभवार्ता पडली. ती म्हणजे अ‍ॅलिशरचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला.

जेथे तरुण जिम्नॅस्ट आपल्या मांसपेशींच्या मजबुतीसाठी, स्मृती तल्लख करण्यासाठी तासन् तास जिममध्ये घालवत होते, ते ओक्साना तर अनेक वर्षांपासून करीत होती. त्यामुळे तिला या गोष्टींसाठी फारसा वेळ द्यावा लागला नाही. ईएसपीएनला | ESPN | दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, “मी भक्कम मानसिकतेवर खूप सराव केला आहे. आता मी फक्त दोन तास सराव करते. एवढ्या वर्षांच्या सरावाअंती मला हे कळलंय, की मला नेमक्या कोणत्या कौशल्याची गरज आहे? मला हेही समजतं, की माझ्या शरीराला नेमकं काय हवं आहे?”

ओक्सानाचा हा प्रवास पाहता, ती आता उत्तम प्रशिक्षक म्हणूनही लौकिक मिळवू शकते. खेळाडू म्हणून तिला कुठे तरी थांबावं तर लागणार आहे. ती आता थांबेल, अशी अटकळही बांधली जात होती. कारण तिनेच एकदा जाहीर केले होते, की 2012 ची लंडन ऑलिम्पिक ही माझ्या कारकिर्दीतली अखेरची स्पर्धा असेल. मात्र, तसे काहीही झाले नाही. सकाळी उठल्यानंतर तिने विचार बदलला. मुळात तिच्या कामगिरीला पू्र्णविराम अजिबातच नाही. केवळ स्वल्पविराम आहेत. आता तिने पुन्हा जाहीर केले, की 2020 मध्ये टोकियो (जपान) येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मी पुन्हा परतणार आहे. त्या वेळी ओक्सानाचं वय असेल 45. प्रोदुनोवा व्हॉल्टसारख्या अतिशय अवघड मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात ती आपलं कौशल्य आजमावते, यातच तिची जिद्द, ऊर्जा लक्षात येते. कारण प्रोदुनोवा व्हॉल्टला क्रीडाभाषेत “मृत्यूचा व्हॉल्ट” असं म्हंटलं जातं. पण ओक्सानासाठी हा व्हॉल्ट तिच्यासाठी नेहमीच “संजीवन व्हॉल्ट” ठरला आहे. एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे युरशेंको स्टाइल व्हॉल्टचं कौशल्य आहे. या अव्वल जिम्नॅस्टपैकी एक ओक्साना आहे. यात ती फ्रंट हँडस्प्रिंगवर कौशल्य सिद्ध करणाऱ्या ओक्सानाचं सुकाहारा-फॅमिली | Tsukahara-family | व्हॉल्टवरील कौशल्यही थक्क करणारं आहे. ओक्सानाची ही ऊर्जा पाहिली, की तिला कोणीच म्हणत नाही, की बाई, तू कधी रिटायर्ड होते? कारण त्यांना माहिती आहे, अजून तिचं वयच सरलेलं नाही. आपण उगाच बुद्धिबळ, नेमबाजीसारख्या खेळांमध्ये वयाचं बंधन मानत नव्हतो, पण ओक्सानाने तर जिम्नास्टिकमध्येही वयाचं बंधन नसल्याचं सिद्ध केलं आहे.

मायभूमीसाठी तळमळ

उझबेकिस्तान ही ओक्सानाची मायभूमी. याच मायभूमीत ती लहानाची मोठी झाली. ताश्कंतच्या क्रीडा विद्यापीठातून तिने 2001 मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. मात्र, जिम्नास्टिकमध्ये सातत्य राखण्याची किमया थक्क करणारी आहे. 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने सोव्हिएत संघाचे (विघटनापूर्वीचा रशिया) प्रतिनिधित्व केले होते. मात्र, सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर उझबेकिस्तानाची निर्मिती झाली. ओक्साना आपल्या मायभूमीकडून अनेक स्पर्धा खेळली. उझबेकिस्तानमध्ये तिने स्वेतलाना कुझ्नेत्सोवा यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. हीच स्वेतलाना तिची खासगी प्रशिक्षकही होती. ताश्कंतमध्ये तिने सराव केला, पण जिम्नास्टिकची उपकरणे चांगल्या दर्जाची नव्हती. ती हानिकारकच अधिक होती. अशा स्थितीतही तिने जिम्नास्टिकमध्ये सातत्य ठेवले हे विशेष.1993 ते 2006 या काळात ती उझबेकिस्तानकडून सातत्याने स्पर्धांत सहभाग घेत राहिली. या कार्यकाळात 1996, 2000, 2004 या तीन ऑलिम्पिक स्पर्धांचा समावेश आहे. 1994 आणि 2006 मध्ये तिने आशियाई स्पर्धा गाजवली, तर 1994 आणि 2001 मध्ये ती गुडविल गेम्समध्ये सहभागी झाली होती. हा तिचा जिम्नास्टिक पट पाहिला तर एक उत्तम जिम्नॅस्ट म्हणून तिने जगाला आपली ओळख करून दिली. या एकूण स्पर्धांमध्ये तिने तब्बल 70 पदके मिळविली. तिच्या या कामगिरीची दखल घेत उझबेकिस्तानने तिला उझबेकिस्तानचा सर्वोच्च खेळाडू पुरस्काराने गौरविले. एवढं सगळं असलं तरी ओक्सानाकडून यापेक्षा अधिक उत्तम कामगिरीची अपेक्षा करता आली असती. मात्र, उझबेकिस्तानात तिला म्हणाव्या तशा सुविधा मिळाल्या नाहीत. एकवेळ तेही तिने सहन केलं, पण जेव्हा मुलगा अ‍ॅलिशरला ल्युकेमिया झाल्याचं कळलं, तेव्हा ती नखशिखांत हादरली. एकुलत्या मुलाला गंभीर आजाराने ग्रासणे हेच मुळी तिच्यासाठी वेदनादायी होतं. केवळ याच कारणामुळे तिला जन्मभूमी सोडावी लागली आणि तिने जर्मनीत आपलं बस्तान बसवलं. जर्मनीकडूनच खेळताना तिने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आणि विक्रमी सातवी ऑलिम्पिक स्पर्धाही खेळली. मात्र, जेव्हा ती निवृत्तीचा विचार करते तेव्हा तिला एक सल कायम सलते. ते म्हणजे ज्या देशाने मला लहानाचं मोठं केलं, त्या मायभूमीसाठी ती ऑलिम्पिकमध्ये एकही मेडल जिंकू शकलेली नाही. याच कारणामुळे तिने घरवापसी केली. आता ती टोकियोत 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 44 व्या वर्षी उझबेकिस्तानचं प्रतिनिधित्व करणार आहे, ते मेडल जिंकण्याच्या ईर्षेनेच. ती मेडल जिंकली तरच तिचा खेळाचं एक वर्तुळ पूर्ण होईल. मायदेशासाठी जिंकणे हेच तिचे आता अंतिम ध्येय आहे. जिंकली तर टोकियो ऑलिम्पिक ही तिची अखेरची स्पर्धा असेल, अन्यथा वयाच्या 48 व्या वर्षी तुम्हाला ती 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही दिसेल.

ओक्सानाविषयी हे वाचलंय का?

सात ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी ओक्साना जगातली एकमेव महिला खेळाडू. बार्सिलोना 1992, अटलांटा 1996, सिडनी 2000, अथेन्स 2004, बीजिंग 2008, लंडन 2012, रिओ ऑलिम्पिक (2016) या ओळीने सात स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली आहे.
मुलगा अ‍ॅलिशरला 2002 मध्ये ल्युकेमियाचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर जर्मनीत उपचार करण्यात आले. त्यामुळे जर्मनीचे आभार मानण्यासाठी ती 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तिने जर्मनीचे प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी तिची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा होती.
ओक्सानाने ऑलिम्पिकमध्ये तीन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. हे तीन देश म्हणजे रशिया, उझबेकिस्तान आणि जर्मनी.
ओक्सानाला शारीरिक व्याधी कधी माहीत नाहीत. मात्र, दहा वर्षांपूर्वी तिच्या पायाची टाच दुखावली होती, तर सतत स्पर्धा खेळल्यामुळे तिच्या दोन्ही खांद्यांवर शस्त्रक्रियाही झाली आहे.
ओक्सानाने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात रौप्य पदक जिंकले, तर 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये सांंघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
ओक्साना इतर खेळाडूंच्या तुलनेत खूपच कमी म्हणजे दोन ते अडीच तास सराव करते.
ओक्सानाने दोन वेळा निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही वेळा तिने अचानक निर्णय बदलत स्पर्धेत वापसी केली. 2009 मध्ये तिने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र 2010 मध्ये ती पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. त्यानंतर तिने पुन्हा निवृत्तीची घोषणा करीत 2012 ची ऑलिम्पिक स्पर्धा माझ्या कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले. मात्र, 2016 ची रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत उतरत तिने पुन्हा आपला निर्णय फिरवला.
ओक्सानाचा विवाह माजी ऑलिम्पिक कुस्तीपटू बाखोदीर कुर्बानोव यांच्याशी 1997 मध्ये झाला.
ओक्साना चाळिशीनंतरही ऑलिम्पिक स्पर्धा खेळत असताना ती आपल्या मुलाच्या वयाच्या खेळाडूंशी स्पर्धा करीत आहे.
ओक्सानाने 1989 पासून स्पर्धा खेळत आहे. आज ती ज्यांच्याशी प्रतिस्पर्धा करीत आहे, त्या खेळाडूंचा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासून ती पदके जिंकत आहेत.

ओक्सानाचा दैनंदिन कार्यक्रम

स. 7.00 : मुलगा अ‍ॅलिशरची तयारी. अ‍ॅलिशर शाळेत होता तेव्हा त्याच्यासाठी टिफिन करण्यापासून तयारी करावी लागायची. आता तो १९ वर्षांचा झाला आहे. कदाचित यात काही बदल झाला असू शकेल.
8.00 नाश्ता, मानसिक तयारी आणि दृष्टीचा सराव | Visualization practices |
9.00 जिममध्ये जाणे, स्ट्रेचिंग, शरीरस्वास्थ्यासाठी सराव
दु. 12 अ‍ॅलिशरसोबत जेवण
2.00 पुन्हा जिममध्ये व्हॉल्ट, बार्स आणि बीम या जिम्नास्टिक्स प्रकारांचा सराव
सायं. 5.00 फेरनियोजन
6.00 जेवण
7.00 पती व मुलगा अ‍ॅलिशरसोबत वेळ व्यतित करणे

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

Facebook page kheliyad

Read more at:

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

February 11, 2023
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

February 16, 2023
लता मंगेशकर क्रिकेटच्या तारणहार
All Sports

बीसीसीआयकडे पैसे नव्हते, तेव्हा लता मंगेशकर ठरल्या क्रिकेटच्या तारणहार

February 18, 2023
नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी
All Sports

भारतीय फुटबॉलचे जनक-नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी

January 30, 2022
Tags: ओक्साना चुसोविटिना ऑलिम्पिक जिम्नास्टिक
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
दारा टोरेस ऑलिम्पिक

दारा टोरेस- चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू

Comments 1

  1. Pingback: US-Open-coronavirus | आणखी दोन टेनिसपटूंची यूएस ओपनमधून माघार - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!