• Latest
  • Trending
गोल्फ म्हणजे काय

गोल्फ म्हणजे काय रे भाऊ (भाग १)

January 2, 2022
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Wednesday, March 22, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

गोल्फ म्हणजे काय रे भाऊ (भाग १)

गोल्फ म्हणजे काय, याची माहिती अनेकांना नाही. क्रिकेटवेड्या भारतात तर अजिबातच माहीत नसेल. गोल्फरना खेळताना पाहिले, की कुतूहल वाटायचं.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 2, 2022
in Golf, Other sports
2
गोल्फ म्हणजे काय
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

गोल्फ म्हणजे काय, तो कसा खेळतात, याची माहिती अनेकांना नाही. क्रिकेटवेड्या भारतात तर अजिबातच माहीत नसेल. लहानपणी विटीदांडू, क्रिकेट, आराधरी, लगोरी (आम्ही त्याला ‘लिंगोर्चा’ म्हणायचो), लपाछपी, डब्बा स्टॉप असे अनेक खेळ ‘भयंकर’ खेळलो. भयंकर या अर्थाने, की अभ्यासही या खेळांपुढे गौण ठरायचा. खेळकरपणा असा अंगात भिणलेला असायचा, की सहज चालता चालता एखादी काठी सापडली तरी त्या काठीने दगड उडवत चालायचो. आमचा गोल्फशी Golf | आलेला एवढाच काय तो संबंध!

तसाही गोल्फ (Golf) हा खेळ मी हौसेने कधीच पाहिलेला नाही. ना टीव्हीवर, ना मैदानावर. अर्थात, शहरातही कुणी फारसं खेळत नाही. त्यातल्या त्यात नाशिकमध्ये गोल्फचा Golf | संबंध केवळ एका मैदानाला असलेल्या नावापुरता उरलेला आहे. नाशिकचे गोल्फ क्लब मैदान मुळी गोल्फसाठी आता राहिलेले नाही. पूर्वी कधी तरी होते, ज्या वेळी इंग्रजांचे भारतावर राज्य होते. आता केवळ गोल्फ क्लब मैदान या नावानेच या खेळाचं नाशिकमध्ये अस्तित्व उरलेलं आहे. भलेही या मैदानाचं नाव बदललं असलं तरी… या मैदानाचं नाव ‘हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान’ असं करण्यात आलं आहे. नाशिककरांच्या ओठांवर हे नाव फारसं रुळलेलं नाही. त्यासाठी गोल्फ क्लब मैदान हा संदर्भ द्यावाच लागतो. असो…

गोल्फ नाशिकमध्ये अन्यत्र कुठे खेळत असतील तर तो त्यांचा उंची शौक. तो त्यांच्यापुरता मर्यादित असू शकेल. जसा क्रिकेट साहेबांचा खेळ म्हणून ओळखला जातो (आता तो गल्लोगल्लीत खेळला जात असला तरी…), तसाच हा खेळही. मात्र, गोल्फ हा शब्दशः साहेबांचा खेळ आहे. थोडक्यात काय, तर हा खेळ पैसेवाल्यांचा किंवा रिटायर्ड लोकांचाच खेळ मानला जायचा. क्रिकेटसारखा तो सामान्य कधी झालाच नाही. जसं सोनं कधी जत्रेत विकलं जाऊ शकत नाही, तसा हा खेळ कधी गल्लोगल्लीत खेळला जात नाही. मात्र, गोल्फचे फोटो जेव्हा बघायचो, तेव्हा त्या खेळापेक्षा ते नयनरम्य हिरवळीचं मैदान पाहूनच छान वाटायचं. जणू नंदनवनच! इतक्या सुरेख मैदानावर गोल्फरना खेळताना पाहिले, की कुतूहल वाटायचं. कारण हा खेळ सामान्यांना फारसा कळत नाही आणि खेळही इतका नीरस आणि कंटाळवाणा वाटतो, की खेळणाऱ्यासोबत जे चेंडू घेऊन येणारे बॉलबॉय असतात तेही तल्लीनतेने पाहताना जाणवत नाही. थ्रिलिंग असं नाहीच. असेल तर ते खेळणाराच जाणो. पण हा खेळ नेमका काय आहे, हे जाणून घेताना फार मजा वाटली.

‘गोल्फचं नंदनवन’


सामान्य भारतीयांना जाणवणारी गोल्फविषयीची ही स्वाभाविक भावना आहे. तसं पाहिलं, तर काही देशांमध्ये (भारत वगळता) हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. उदाहरणार्थ, न्यूझीलंड या देशाला ‘गोल्फचं नंदनवन’ म्हणतात. या देशाने गोल्फ टुरिझमही Golf Tourism | सुरू केलं आहे. कारण जगातील सर्वाधिक गोल्फची मैदानं याच देशात आहेत. म्हणजे तब्बल ४०० पेक्षा अधिक! एवढी मैदानं असतानाही ती सुस्थितीत ठेवली आहेत. प्रशिक्षण वर्गही नियमित सुरू असतात. विशेष म्हणजे, या देशात गोल्फ खेळणे फारसे खर्चिक नसल्याचे ऐकले आहे. खेळाला राजाश्रय असला, की तो किती पुढे जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूझीलंडची देखणी गोल्फ मैदाने. या देशाला ‘गोल्फचं नंदनवन’ का म्हणतात, हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

गोल्फ हा क्लब खेळ किंवा त्याला ‘बॉल स्पोर्ट’ही म्हणतात. हा ऑलिम्पिक खेळ आहे. एका स्टीकने (एक प्रकारची छडी, जी काहीशी हॉकी स्टीकसारखी असते. त्याला क्लब असेही म्हणतात.) चेंडू जोराने तडकवायचा आणि दूर कुठे तरी जमिनीला खळगे पाडलेले असतात, त्यात तो लोटायचा. गोल्फच्या चेंडूची रचनाही अन्य चेंडूंपेक्षा वेगळी आहे. किमान ४६ ग्रॅम वजनाचा चेंडू असतो. त्यावर खोलगट कप्प्यांची गोलव्यांची आस आहे. या खेळाची सुरुवातीला खूपच गंमत वाटली. कारण आम्ही गोट्या खेळायचो, तेव्हा गल्लीत गोटी गेली तर ती जिंकल्यात जमा व्हायची किंवा ‘गच्चा’ तरी व्हायचा. ‘गच्चा’ हा ‘गोटीपटूं’चा (क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू, तसं गोट्या खेळणाऱ्याला ‘गोटीपटू’च म्हणायला काय हरकत आहे?) परवलीचा शब्द. फुटबॉलमध्ये फाऊल होतो तसा गोट्यांमध्ये ‘गच्चा’ होतो! तसं गोल्फमध्ये खळग्यात चेंडू गेला तर चेंडू जिंकतात की गच्चा होतो, असा खुळचट प्रश्न उगाच मनाला चाटून गेला. पण इथं तसं काहीही नसतं. इथं खड्डे म्हणजे खळगे जिंकायचे असतात.

९ किंवा १८ खळग्यांचा खेळ


गोल्फमध्ये ९ किंवा १८ खळगे असतात. या सर्व खळग्यांमध्ये चेंडू ढकलायचा. दोन खळग्यांमध्ये किमान दोन ते चार मैलांचं अंतर असतं. त्यामुळे अशा बेतानेच चेंडू क्लबने तडकवायचा, की तो त्या खळग्याच्या जवळपास पडेल. थेट खळग्यात गेला तर सोन्याहून पिवळं. असं सगळ्या खळग्यांमध्ये चेंडू गेला, की तो विजेता. बस एवढंच. यात काही तांत्रिक नियम आहेत, जे समजून घेतले, की हा खेळ नेमका काय आहे ते समजतं. 

‘टी शॉट’ म्हणजे काय?


केवळ खळग्यात चेंडू ढकलण्यापर्यंतची प्रक्रिया पाहिली तर तुम्हाला विशेष काहीच वाटणार नाही. बहतांश लोकांना तो कदाचित पोरखेळ वाटेल; पण या खेळातही काही तरी गंमत आहे. तो खेळल्यावरच कळेल. एरव्ही प्रत्येक खेळाच्या मैदानांचं आकारमान निश्चित असतं. गोल्फ एकमेव खेळ असेल, ज्याला निश्चित असं आकारमान नाही. या खेळात ९ किंवा १८ खळग्यांची शृंखला असते. जेथून चेंडू हिट केला जातो, त्या जागेला ‘टी बॉक्स’ म्हणतात. हा ‘टी बॉक्स’ आयताकृती असतो. टी म्हणजे चहा नाही बरं! टी या इंग्रजी शब्दाचा अर्थ भूभाग असा आहे. याच टी बॉक्समधून मारलेला फटका ‘टी शॉट’ म्हणून ओळखला जातो.

गोल्फचा इतिहास


या खेळाचा इतिहास काहीसा जटिल आहे. आधुनिक गोल्फचा खेळ स्कॉटलंडमध्ये १५ व्या शतकात झाला. असं असलं तरी गोल्फचं मूळ अद्याप कुणालाही शोधता आलेलं नाही. त्यावरून अनेक वाद-प्रतिवाद आहेत. म्हणूनच या खेळाचा इतिहास जटिल आहे. काही इतिहासकारांच्या मते, ‘पॅगानिका’ या रोमन खेळापासून गोल्फचा जन्म झाल्याचं मानतात. ‘पॅगानिका’ खेळातही एका टोकाला वक्र असलेली स्टीक (क्लब) वापरून लेदरचा चेंडू टोलवायचे. हाच ‘पॅगानिका’ खेळ पुढे युरोपमध्ये गेला आणि त्यातूनच पहिल्या शतकात गोल्फ नावाने हा खेळ विकसित झाल्याचं म्हंटलं जातं. ‘पॅगानिका’त वापरला जाणारा चेंडू आणि आताचा गोल्फमध्ये वापरला जाणारा चेंडू यात साधर्म्य असल्याचाही काही इतिहासकारांचा दावा आहे. 

गोल्फचं मूळ चीनमध्ये?


काहींच्या मते, हा चिनी खेळ आहे. म्हणजे चीनमध्ये इसवीसन सुमारे आठ ते चौदाव्या शतकादरम्यान हा खेळ ‘चुइवान’ या नावाने खेळला जात होता. ‘चुइ’ म्हणजे हल्ला करणे आणि ‘वान’ म्हणजे लहान चेंडू. त्यामुळे या खेळाचं मूळ ‘चुइवान’मध्ये असल्याचाही एक मतप्रवाह आहे. इ.स. १३६८ मध्ये मिंग राजवंशाची सत्ता होती. या मिंग राजवंशाच्या पुस्तकात या खेळाचा सचित्र उल्लेख आहे. चीनमधूनच मध्ययुगात हा खेळ युरोपमध्ये गेल्याचं म्हटलं जातं.

गोल्फवर पर्शियनांचाही दावा


इंग्लंडमध्ये हा खेळ ‘कंबुका’ (cambuca) या नावाने खेळला जायचा. फ्रान्समध्ये याच खेळाचं नाव ‘चॅम्बोट’ (chambot) असं होतं. पर्शियनांनाही वाटतं, की हा मूळ खेळ पर्शियातलाच आहे. ‘चौगान’ (chaugan) या नावाने पर्शियन हा खेळ खेळत. त्यामुळे या खेळाचं मूळ पर्शियातलं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केवळ इथेच या खेळाचे उगम थांबत नाहीत. नेदरलँडमधील (हॉलंड) लोएननमध्ये इ.स. १२९७ मध्ये हा खेळ कोल्वेन (kolven) या नावाने दरवर्षी खेळला जायचा. एकूणच या खेळाचं मूळ शोधायचं म्हणजे, रोमन काळ, मिंग राजवंश, पर्शिया, हॉलंड असं सगळं खंगाळून काढलं तरी हाती फारसं काही लागणार नाही.

आधुनिक गोल्फची सुरुवात स्कॉटलंडमध्ये


एक मात्र खरं आहे, ते म्हणजे स्कॉटलंडमध्ये आधुनिक गोल्फची सुरुवात झाली. सुरुवातीला या खेळाला राजाश्रय मिळाला नाही. इ. स. १४५७ मध्ये जेम्स द्वितीय हा स्कॉटलंडचा राजा होता. धनुर्विद्या शिकण्याच्या अतिव्याकुळतेमुळे जेम्स द्वितीय राजाने गोल्फवर बंदी घातली. ही बंदी त्याच्या मृत्यूनंतरच उठली. त्यानंतर जेम्स चतुर्थ हा राजा स्कॉटलंडच्या गादीवर विराजमान झाला. तो स्वतः गोल्फ खेळायचे शिकला. इ. स. १५०२ मध्ये जेम्स चतुर्थने गोल्फवरील बंदी उठवली आणि १५०३-०४ मध्ये पहिला गोल्फ क्लब अस्तित्वात आला. मात्र, तो फक्त त्याच्यापुरताच मर्यादित होता. आधुनिक गोल्फचा विकास मात्र स्कॉटलंडमध्ये झाला. मात्र, याच स्कॉटलंडमध्ये सुरुवातीला या खेळाला राजाश्रय मिळू शकला नाही. स्कॉटलंडचा राजा जेम्स द्वितीय याने १४५७ मध्ये बंदी घातली. कारण काय, तर राज्याच्या रक्षणासाठी आवश्यक असलेल्या धनुर्विद्येत हा खेळ प्रमुख अडसर ठरतोय. म्हणून राजाने दरबारात या खेळावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. १४७१ व १४९१ मध्येही असाच निर्णय घेण्यात आला. म्हणजे १५ व्या शतकापूर्वी गोल्फची लोकप्रियता काय असेल, याची कल्पना येते. त्यानंतर जेम्स चतुर्थ हा स्कॉटलंडच्या गादीवर बसला. त्याने १६०२ मध्ये म्हणजे तब्बल ४५ वर्षांनी गोल्फवरील बंदी उठवली, जेव्हा तो स्वतः गोल्फ खेळण्यास शिकला. १५०३-०४ मध्ये पहिला गोल्फ क्लब अस्तित्वात आला.

1672 मध्ये खेळला गेला पहिला गोल्फचा सामना


बरेच गोल्फर सेंट अँड्यूजमध्ये पारंपरिक पद्धतीने गोल्फ खेळायचे. १५७४ पूर्वी गोल्फची पारंपरिक शैली अस्तित्वात होती, जी ब्रिटनने विकसित केलेली होती. १७६४ मध्ये सेंट अँड्रयूजमध्ये २२ वरून १८ खळग्यांचा गोल्फ विकसित करण्यात आला. स्कॉटलंडच्या पूर्व लोथियानमधील मसलबर्ग लिंकवर २ मार्च १६७२ मध्ये खेळला गेलेला गोल्फचा सामना अधिकृत दस्तावेज ठरला. हा सर्वांत जुना गोल्फ कोर्स म्हणून त्याची गीनिज बुकात नोंद झाली आहे. १७४४ मध्ये गोल्फचे नियम तयार केले होते. नंतर या कंपनीचे नाव एडिनबर्ग गोल्फर असे झाले.

‘टी बॉक्स’ म्हणजे काय?


या खेळासाठी किती वेळ जातो, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. जर ९ खळग्यांची स्पर्धा असेल तर एका व्यक्तीला दोन ते तीन तास, तर १८ खळग्यांसाठी चार ते पाच तास लागतात. या एकूणच गोल्फ कोर्समध्ये सुरुवात होते ती टीइंग ग्राऊंडपासून. त्याला ‘टी बॉक्स’ असंही म्हणतात. आणखी सोप्या भाषेत फक्त ‘टी’ म्हंटलं तरी हरकत नाही. प्रत्येक खळग्यात चेंडू हिट करायचा असेल तर तो ‘टी बॉक्स’मधूनच करण्याची परवानगी आहे; अन्यत्र कुठूनही नाही.

‘टी’ म्हणजे अतिशय छोटी खुंटी असते, जी जमिनीपासून काही सेंटिमीटर उंच असते. ‘टी’ सामान्यपणे लाकडाची असते; पण ती इतर मटेरियलपासूनही बनवलेली असू शकते. कदाचित ती प्लास्टिकचीही असू शकते. ही टी बॉक्समधील खुंटीची संकल्पना आधी नव्हती. ती नंतर आली. यापूर्वी पारंपरिकपणे गोल्फर टी ग्राऊंडवर टी खुंटीऐवजी वाळूला पसंती देत होते. त्यासाठी वाळूच्या खास कंटेनरचीही व्यवस्था केलेली असते. काही गोल्फ कोर्सवर टी खुंटीऐवजी वाळूची व्यवस्था आजही करतात. त्यामागचे कारण हेच, की जमिनीला कोणतेही नुकसान होत नाही आणि कचराही कमी होतो. याशिवाय गवताचाही व्यत्यय येत नाही. वाळूमुळे चेंडू हिट करणे सोपे जाते आणि खळग्याजवळ चेंडू येऊ शकतो.

चेंडू खळग्याजवळ विसावल्यास त्याला गोल्फच्या भाषेत ‘स्वीट स्पॉट’ म्हणतात. जेव्हा २२५ यार्डापेक्षा लांबून म्हणजे सुमारे २१० मीटरवरून चेंडू मारला जातो त्याला ड्राइव्ह म्हणतात. ज्या लांब डोक्याच्या क्लबने (त्याला इंग्रजीत ‘लार्ज हेडेड क्लब’ म्हणतात) हा चेंडू मारला जातो, त्याला ‘ड्रायव्हर’ म्हणतात. कमी अंतरावरील खळग्यासाठी काही वेळा वेगळा क्लब (स्टीक) वापरतात. बहुतांश क्लब लाकडी किंवा लोखंडाचे असतात. चेंडू काही अंतरावर विसावला तर गोल्फर तो पुन्हा खेळतात. अनेक वेळा तो चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला ‘ले-अप’, ‘अॅप्रोच’, ‘पिच’ किंवा ‘चिप’  (chip) असंही म्हणतात. जोपर्यंत चेंडू खळग्याजवळ जात नाही तोपर्यंत गोल्फर खेळतात. जेव्हा तो चेंडू स्वीट स्पॉटवर विसावतो, म्हणजेच खळग्याजवळ जातो, त्या वेळी गोल्फर तो खळग्यात ढकलतो. त्याला ‘पुट्स’ असं म्हणतात. सामान्यपणे त्याला ‘सिंकिंग दि पुट’ किंवा ‘होलिंग आऊट’ असं म्हणतात.

हेही वाचा… गोल्फ कसा खेळतात?

Follow on

Facebook Page kheliyad

Twitter @kheliyad

Read more at:

लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

February 11, 2023
दीपिका पल्लीकल स्क्वॅश
All Sports

दीपिका पल्लीकल पुन्हा स्क्वॅश खेळाकडे परतणार

February 10, 2022
नाशिक महापालिका क्रीडाधोरणाची अंमलबजावणी कधी करणार?
All Sports

नाशिक महापालिका क्रीडाधोरणाची अंमलबजावणी कधी करणार?

February 18, 2023
नेमबाजांच्या आत्महत्या
All Sports

क्रीडाविश्व हादरले… चार महिन्यांत तीन नेमबाजांच्या आत्महत्या

December 13, 2021
स्वप्ना बर्मन
All Sports

दुखापतींमुळे त्रस्त झालेली स्वप्ना बर्मन घेणार निवृत्ती

November 11, 2021
ऑलिम्पिक तिरंदाजी दीपिका
All Sports

तिरंदाजीची मदार दीपिका कुमारीवर

July 22, 2021

Tags: गोल्फगोल्फ म्हणजे काय
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
गोल्फ खेळ

गोल्फ हा खेळ कसा खेळतात? (भाग २)

Comments 2

  1. THE PRAKASH says:
    3 years ago

    Mahesh bhai very nice from @ssclasses

    Reply
  2. Mahesh Pathade says:
    3 years ago

    thank you so much 🙂

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!