All SportsOther sportssports news

दीपिका पल्लीकल पुन्हा स्क्वॅश खेळाकडे परतणार

भारताच्या सर्वोत्तम स्क्वॅश खेळाडूंपैकी एक असलेली दीपिका पल्लीकल हिने कौटुंबिक कारणामुळे 2018 मध्ये स्क्वॅशमधून ब्रेक घेतला होता. आता जुळी मुले झाल्याने दीपिका पल्लीकल पुन्हा स्क्वॅश खेळाकडे परतणार आहे.

गेल्या वर्षीच दीपिकाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यंदा राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत. स्क्वॅशपासून दूर राहिल्यानंतर 31 वर्षीय दीपिका ‘इंटेरिअर डिझायनिंग’कडे वळली होती.

दीपिका पल्लीकल बर्मिंघम स्पर्धेच्या दुहेरीत भाग घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती हळूहळू प्रमुख स्पर्धांकडे वळणार आहे. दीपिका पल्लीकल आणि भारताची सर्वोत्तम रँकिंग असलेली खेळाडू जोश्ना चिनप्पा या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले होते.

दीपिका पल्लीकल 2018 पासून स्क्वॅश खेळापासून दूर आहे. जेव्हा तिने या खेळातून ब्रेक घेतला तेव्हा ती पहिल्या 20 खेळाडूंमध्ये होती. जुळ्या मुलांची आई होणं म्हणजे दुहेरी मेहनत आहे. मात्र, क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी दीपिका पल्लीकल आपल्या या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

दीपिका पल्लीकल म्हणाली, ‘‘हे खरं आहे, की एक आई आणि व्यावसायिक खेळाडू होणे खूप कठीणण आहे. मात्र, मी यावर फार जोर देत नाही. निश्चितच मुले झोपी जाईपर्यंत खूप धावपळ होते. त्यातल्या त्यात जुळी मुले असेल तर मेहनत दुप्पट होते.’’

दीपिका पल्लीकल म्हणाली, ‘‘माझे पतीही खेळाडू आहे आणि सराव, खेळण्यासाठी ते नेहमी बाहेर असतात. त्यामुळे बऱ्याचशा जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागत आहेत. मात्र, मी नशीबवान आहे, की माझ्यामागे माझं कुटुंब आहे. त्यामुळेच मला सकाळी आणि सायंकाळी सराव करण्यास वेळ मिळत आहे.’’

गेल्या वर्षी दुखापत आणि महामारीमुळे दीपिका पल्लीकल हिला स्क्वॅश खेळाकडे परतण्यास विलंब झाला. दीपिका जोश्नासोबत एप्रिल 2022 मध्ये ग्लास्गो येथे होणाऱ्या महिला दुहेरी विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेनंतर पीएसए व्यावसायिक टूरमध्ये पुनरागमन करण्याची चेन्नईच्या दीपिकाची योजना आहे. दीपिकाला आशा आहे, की आणखी एक महिन्याच्या सरावानंतर पुनरामन करू शकेल.

पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने गौरविलेली दीपिका पल्लीकल दोन मोठ्या स्पर्धांत सहभागी होऊ शकेल. मात्र भारतीय संघाच्या निवड चाचणीतील कामगिरीवर सगळं काही अवलंबून असेल. भारतीय स्क्वॅश अर्थात रॅकेट महासंघाचे महासचिव सायरस यांनी यापूर्वीच ही माहिती दिली आहे.

Follow on Facebook page kheliyad

कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद का सोडले?

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!