• Latest
  • Trending
winter olympics and china

शीतकालीन ऑलिम्पिक आणि चीन | Winter Olympics and China

February 14, 2021
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Friday, June 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

शीतकालीन ऑलिम्पिक आणि चीन | Winter Olympics and China

बीजिंगमध्ये शीतकालीन ऑलिम्पिक आयोजित करण्यामागे चीनचा हेतू काय? करोना महामारीनंतर जगभरात चीनविरोध कमालीचा वाढला आहे...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
February 14, 2021
in All Sports, Sports Review
1
winter olympics and china
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

शीतकालीन ऑलिम्पिक आणि चीन

कॅनडामध्ये 1976 ची माँट्रियल ऑलिम्पिक आयोजित करण्यापूर्वी माँट्रियलचे महापौर ज्यां द्रापू म्हणाले होते, की “जसे कधी पुरुषाला मुलं होत नाहीत, तसे ऑलिम्पिक आयोजित केल्याने पैसा येत नाही.” अर्थात, ते खरंही होतं. माँट्रियल ऑलिम्पिकचं बजट इतकं वाढलं, की त्यापेक्षा जास्त ते फेडण्यातच गेलं. जवळपास तीस वर्षे लागली हे कर्ज फेडायला.

चीनने China | बीजिंगमध्ये 2022 च्या शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चे यजमानपद मिळविल्यानंतर एकूणच या सगळ्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. चीन अवाढव्य देश आहे. साधनसुविधा प्रचंड आहे. मात्र, तरीही ऑलिम्पिकसारख्या प्रमुख स्पर्धा आयोजित करताना अनेक श्रीमंत देशांना हा खर्च पेलवताना नाकी नऊ आले आहेत.

चीनला शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | सोपी असेल असे अजिबात नाही. नाही म्हंटलं, तरी या 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या पायाभूत सुविधा असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. कारण शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मध्ये बर्फावरचे खेळ आहेत हे विसरून चालणार नाही.

चीनने China शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चा विडा उचलला असला तरी अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी फारसे कोणी रस घेत नाही. अमेरिकेत बोस्टन, तर जर्मनीत हॅम्बुर्ग शहरातील नागरिक ऑलिम्पिकला स्पष्टपणे विरोध करीत आले आहेत. चीनने 2022 च्या शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चे यजमानपद मिळवले असले तरी 2024 च्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकसाठी नव्या शहरांनी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही.

यजमानपदाच्या शर्यतीत शहरांची संख्या घटणे ही चिंता वाढविणारी बाब आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, करोना महामारीमुळे अनेक शहरांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे.

एकूणच जगातली अर्थव्यवस्था थंड आहे. राजकारण, अर्थव्यवस्था आणि करोनानंतर आलेला झिका वायरस या ट्रिपल संकटामुळे कोणताही देश आगामी ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्यास तयार नाही.

बीजिंगची लोकसंख्या 20 मिलियनपेक्षा अधिक आहे. ही ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे. हाय-स्पीड रेल्वे ही बीजिंगची जमेची बाजू आहे. बीजिंग ऑलिम्पिकमुळे चीन क्रीडा महासत्ता बनली हे नाकारता येणार नाही. आजही बीजिंगचे स्टेडियम उत्तम स्थितीत असल्याचा दावा केला जात आहे. याउलट रिओच्या स्टेडियमची अवस्था कमालीची खालावली आहे. फुटबॉलसारखा खेळ लोकप्रिय असूनही तेथील फुटबॉल स्टेडियमची हालत वाईट आहे.

बीजिंगमध्ये राजसी बर्डस नेस्ट ही एक प्रमुख ऐतिहासिक इमारत आहे. अर्थात, या बर्डस नेस्टमध्ये मँचेस्टर डर्बीचे सामने होणार होते. मात्र, हे स्टेडियम खराब असल्याने सामने रद्द करण्याची नामुष्की चीनवर ओढवली होती. हा अपवाद वगळला तर बीजिंगची क्रीडा केंद्रे उत्तम आहेत.

शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मागे चीनचा हेतू काय?

ज्या देशामुळे संपूर्ण विश्व आजारी झालं, त्या देशाला 2022 च्या शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चे यजमानपद मिळाले आहे. प्रश्न हा आहे, की बीजिंगमध्ये शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | आयोजित करण्यामागे चीनचा हेतू काय? करोना महामारीनंतर जगभरात चीनविरोध कमालीचा वाढला आहे. 180 देशांच्या समूहानेही या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नुकतेच केले आहे. असे असले तरी बीजिंगमध्ये शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | भरविण्याचा विडा चीनने उचलला आहे.

चीनमध्ये अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालावरूनच जगातील 180 देशांच्या समूहाने चीनच्या China | शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |वर बहिष्काराची घोषणा केल्यानंतर बीजिंगमधील शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चा विषय अधिक चर्चेला आला आहे.

विशेष म्हणजे करोना महामारीच्या गर्तेत सापडलेल्या वैश्विक समस्येनंतरही ही स्पर्धा आयोजित करण्याची चीनची China | योजना भुवया उंचावणारी आहे. या स्पर्धेला विरोध करणाऱ्या देशांमध्ये तिबेट, उइगर, मंगोलिया आणि हाँगकाँगशी संबंधित समूहांचा समावेश आहे.

करोना महामारीचा उगम ज्या देशात झाला, तो देश जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा क्रीडामहोत्सव आयोजित करीत आहे हेच मुळी भुवया उंचावणारं आहे. कारण अद्याप जगातून करोना गेलेला नाही. अनेक क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत.

टोकियो ऑलिम्पिकचं भवितव्य अधांतरी असताना चीनने शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | आयोजित करण्यासाठी उत्सुकता दाखविणे अनेकांना कोड्यात टाकणारं आहे. करोना महामारीमुळेच टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये स्थगित करण्यात आली. आता 2021 मध्येही ही स्पर्धा होईल की नाही अशी साशंकता आहे.

ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकला जितकं महत्त्व आहे तितकचं शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |लाही आहे. ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकमध्ये जे क्रीडा प्रकार खेळविले जातात, ते साधारणपणे जगातील सर्वच देशांत खेळले जातात. मात्र, शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मधील खेळांचे तसे नाही. या ऑलिम्पिकमध्ये सर्व खेळ बर्फावरचे आहेत. बर्फाळ प्रदेशातील खेळाडूंसाठी ही पर्वणी असते. मात्र, या बर्फावरील खेळांकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही एवढंच. कारण ते सर्वदूर फारसे खेळले जात नाहीत.

शीतकालीन ऑलिम्पिकसाठी बीजिंग शहराचीच निवड का?

पहिला प्रश्न हा आहे, की चीनने बीजिंगमध्ये शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | घेण्याचे नियोजन का केले? चीनची राजधानी बीजिंगने 2008 मध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले आहे. आता शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |ही याच शहरात होत असल्याने दोन ऑलिम्पिक एकाच शहरात होणारं बीजिंग जगातील एकमेव शहर असेल.

जगातील एकाही शहराला असा मान मिळालेला नाही. ‘जगातील एकमेव’ असं जेव्हा काही करायचं असेल तर ते करण्यासाठी चीन सतत पुढे असतो. जगात आम्हीच भव्यदिव्य करू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी चीनचा नेहमीच खटाटोप असतो.

मात्र, यामुळेच बीजिंगमध्ये शीतकालीन स्पर्धा व्हायला हवी हे कारण तितकंसं समाधानकारक नाही. मुळात चीनने बीजिंग हेच शहर का निवडले? बीजिंगपेक्षाही चीनने हार्बिन शहराची निवड केली असती तर कोणाचाही आक्षेप नसता. कारण बीजिंगपेक्षा जास्त बर्फ हार्बिनमध्ये पडतो. याच हार्बिनमध्ये ‘आइस फेस्टिव्हल’ मोठ्या प्रमाणावर होत असतो.

बीजिंगमध्ये फारसा बर्फ पडत नाही. हे शहर कधी कधी धुक्यात हरवतं आणि हिवाळ्यात फारसा बर्फही पडत नाही. अशा शहरात ऑलिम्पिकसाठी चीनने बोली लावणे हास्यास्पदच आहे. किंबहुना चिनी नागरिकांतही आश्चर्य व्यक्त होत आहे हे विशेष. काहीही असो, आता या शहराला शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चा बहुमान मिळाला आहे. युरोपीय समुदायाला चपराक देण्याची संधी या निमित्ताने चीनने साधली आहे.

बीजिंग शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | लिलाव समितीचे उपमहासचिव आणि प्रसिद्धी-प्रचार विभागाचे मंत्री वांग हुई यांनी जगाला पटवून सांगितले, की आम्हीच का योग्य? ते म्हणाले, “बीजिंगने यशस्वीपणे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविले आहे. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | चीनच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी अनुकूल आहे.”

चीन जे भासवतो तसं असतंच असं अजिबात नाही. जगावर आपला दबदबा राखण्यासाठी चीन काहीही करू शकतो. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चं यजमानपद निश्चितच केवळ खेळ म्हणून अजिबात नाही. त्यामागे आणखीही बरंच काही आहे, असं बीजिंगचे प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ता हू जिया यांनी म्हंटले आहे.

ऑलिम्पिकचा वापर राजकारण करण्यासाठीच!

चीनने ऑलिम्पिक आणि मानवाधिकारांचा संबंध चुकीच्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य देशांवर नेहमीच टीका करणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने वस्तुतः ऑलिम्पिकचा वापर वरिष्ठ स्तरावर राजकारण करण्यासाठीच केला आहे.

कारण ऑलिम्पिकचं यजमानपद मिळविण्यामागे कम्युनिस्ट पक्षाला आपलं सरकार किती बुद्धिमान आहे हेच सिद्ध करण्याची अहमहमिका लागली आहे. बाहेरच्या जगाला आपली राष्ट्रीय ताकद आणि विकास दाखवण्याची खुमखुमी चीनला आहे. तसा प्रयत्न त्यांनी 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमधून दाखवलाही आहे.

अर्थात, शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चे यजमानपद मिळविताना चीनने नागरिकांचा अजिबात विचार केलेला नाही. या ऑलिम्पिकसाठी लागणारा खर्च आणि लोकांच्या उपजीविकेचा अजिबात विचार केलेला नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाला फक्त आपल्या चेहऱ्यावर सोने लावलेले पाहायचे आहे, अशी खरमरीत टीकाही हू जिया यांनी केली आहे.

2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकवर आधीच पाण्यासारखा पैसा खर्च झाला आहे. जे स्टेडियम, क्रीडासंकुलं उभारण्यात आली ते आता ऑलिम्पिकचे भग्नावशेष झाले आहेत. ही पैशांची उधळपट्टीच आहे, असे हु जिया यांनी म्हंटले आहे.

चिनी अधिकाऱ्यांनी मात्र याकडे सोयीस्करपणे (नेहमीप्रमाणे) दुर्लक्ष केलं आहे. ते सांगत आहेत, की शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | लोकांच्या विकासाशी संबंधितच आहे. यामुळे बीजिंगचं प्रदूषण कमी करता येईल.

बीजिंगच्या स्पर्धेत पोलंडमधील क्राको, नॉर्वेचे ओस्लो, कझाकिस्तानचे अल्माटी आणि युक्रेनचे लविवी ही शहरं होती. नंतर यातील काही शहरांनी माघार घेतली. अखेर अल्माटी या एकमेव शहराने बीजिंगला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीजिंगच्या तुलनेत अल्माटीचा जीव तोळामासाच. या शहराची बीजिंगशी बरोबरी होऊच शकत नाही. झालेही तसेच. बाजी बीजिंगनेच मारली.

हु जिया बीजिंगचेच रहिवासी आहेत. तरीही त्यांनी 2022 च्या शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |च्या यजमानपदाला विरोध केला आहे.

बीजिंग ऑलिम्पिकनंतर लोकांचे प्रश्न अधिक बिकट

हू जिंताओ सत्तेत असताना त्यांनी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवलं होतं. चिनी कम्युनिस्टांमध्ये जगात सर्वश्रेष्ठ काही तरी करण्याची लालसा नेहमी असते. तशी महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही; पण यामुळे किती प्रश्न उभे राहतात याचा कोणताही विचार चिनी कम्युनिस्टांमध्ये नाही. हू जिंताओ यांच्यानंतर शी जिनपिंगही त्याच वाटेने जात आहेत.

मुळात लोकांच्या उपजीविकेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | हे काही या समस्येचं उत्तर नाही. 2008 मध्ये ऑलिम्पिक आयोजित करून चीनला तसंही काही मिळालेलं नाही. जगाला वाटले, की चीनकडे प्रचंड पैसा आहे. ते काहीही करू शकतात; पण तसं अजिबात नाही. बीजिंग ऑलिम्पिकनंतर लोकांचे प्रश्न अधिक बिकट झाले आहेत. बेरोजगारीमुळे या देशातील अवस्था विचित्र झालेली आहे. हे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना आता शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | होऊ घातले आहे.

चिनी तज्ज्ञांच्या मते, शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | यजमानपदाला फारसं व्यावहारिक महत्त्व नाही. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकचा अनुभव गाठीशी आहेच. यात प्रचंड पैसा खर्च झाला आहे. आताही पैसे गमावणे जवळजवळ निश्चितच आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पाचव्या पिढीचा नेता म्हणून शी जिनपिंग नेहमीच इतिहासात आपली ओळख बनविण्यासाठी असंच काही तरी करीत राहतील.

माओ जेंडॉंग हा याच कम्युनिस्ट पक्षाचा पहिल्या पिढीचा नेता म्हणून पुढे आला आणि त्यांनी देशाची स्थापना केली. त्यांचा कार्यकाळ फारसा उल्लेखनीय नसला तरी त्यांनी काही गोष्टी केल्या आणि काही उत्तम करण्याचाही प्रयत्न केला. दुसऱ्या पिढीचे डेंग शियाओपिंग यांनी सुधारणा केल्या, तसेच बऱ्याच गोष्टी खुल्याही केल्या. तिसऱ्या पिढीचे जियांग जेमिन यांनी फार नाही, पण अध्यक्षपद सांभाळले.

चौथ्या पिढीचे हू जिंताओ यांनी 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवले. आता पाचव्या पिढीचे नायक म्हणून पुढे आलेले शी जिनपिंग यांनी त्यावर कळस चढवत शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चं यजमानपद मिळवले. आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळातल्या इतिहासात काही तरी मोठं केलं, असं त्यांना संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे ते असंच काही तरी करतील हे चिनी नागरिक पुरते ओळखून आहेत.

शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये कोणकोणते खेळ समाविष्ट होतात?

शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मध्ये कोणकोणते खेळ समाविष्ट होतात, बऱ्याच जणांना माहीत नाही. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मध्ये एल्पाइन स्केटिंग, क्रॉस कंट्री स्कीइंग, कर्लिग, फिगर स्केटिंग, फ्रीस्टाइल स्कीइंग, आइस हॉकी, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग, स्केलेटन, स्की जंपिंग, स्नो बोर्डिग आणि स्पीड स्केटिंग या खेळांचा समावेश आहे.

शीतकालीन ऑलिम्पिक का हवे चीनला?

चीनमध्ये प्रथमच शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | होणार आहे. बीजिंग आणि झांगजियाकौ ही दोन्ही शहरं या स्पर्धेचे यजमान आहेत. बीजिंग शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics | आयोजन समितीच्या प्रसिद्धी आणि प्रचार विभागाचे मंत्री चांग यू के यांनी शिजियाझुआंग शहरात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या १० व्या जागतिक चीनी मीडिया फोरममध्ये शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |विषयी भाष्य केले होते. चीनने पुन्हा ऑलिम्पिकचे यजमानपद का भूषवावे यावर त्यांनी सरकारची भूमिका मांडली होती.

चांग यू म्हणाले, की ऑलिम्पिकमधील सर्व खेळ यजमान शहरांत उभे राहू शकतील. चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. त्यासाठी २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचं उदाहरण डोळ्यांसमोर आहे. ऑलिम्पिकनंतर या शहरात ऑलिम्पिक फॉरेस्ट पार्क, नॅशनल स्टेडियम (बर्ड्स नेस्ट) आणि नॅशनल स्विमिंग सेंटर (वॉटर क्यूब) यांसारख्या क्रीडासुविधा कायमस्वरूपी उभ्या राहिल्या.

एवढेच नाही, तर 2008 बीजिंग ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर अनेक नागरिकांना उत्तम क्रीडाकौशल्य आणि स्वस्थ जीवनशैली विकसित करण्याची सुविधा मिळाली. अनेक खेळाडू मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ लागले आहेत.

2022 मधील आगामी शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. कारण 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमुळे अनेक सुविधा आधीच सज्ज आहेत. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |साठी बीजिंगमध्ये ज्या 13 ठिकाणांचा उपयोग केला जाणार आहे, त्यापैकी ११ तर २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्येच तयार करण्यात आलेली आहेत.

शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चं यजमानपद बीजिंगच्या 8 वर्ग किलोमीटर क्षेत्रात होणार आहे. हेबै येथे एक जगप्रसिद्ध नवं स्की सेंटर होणार आहे. याशिवाय बीजिंग आणि झांगजियाकौ यांना जोडणारे वेगवान लोहमार्ग होणार आहे, जे या दोन्ही शहरांतील अंतर कमी करणार आहेत.

शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चं यजमानपद मिळाल्याने चीनमधील बर्फ आणि बर्फांवरील खेळांना लोकप्रिय बनवतील. स्पर्धास्थळाजवळील निवासी नागरिकांना रोजगार मिळेल. हे वास्तविक परिवर्तन आहे, जे शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |मुळे बीजिंग, तियानजिंग, हेबैमध्ये येणार आहे.

मंत्री चांग यू के यांनी जो युक्तिवाद केला आहे, तो एक वेळ मान्य केला तरी 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर लोकांचे रोजगार गेले त्याचं काय हे उदाहर धडधडीत समोर असताना शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |चंही तसंच होणार असेल तर चीनसमोरचे प्रश्न वाढणार आहेत.

अर्थात, त्याच्याशी चीन कम्युनिस्टांना काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त जगात काही तरी वेगळं करण्याची खुमखुमी आहे. शीतकालीन ऑलिम्पिक Winter Olympics |नंतर चीनमध्ये काय बदल होतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Read more at:

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र
All Sports

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

by Mahesh Pathade
May 6, 2022
भाविना टेबल टेनिस रोबोट
All Sports

यामुळे पॅरालिम्पिक स्पर्धेत भाविनाने रचला इतिहास

by Mahesh Pathade
September 9, 2021
अवनी लेखरा पॅरालिम्पिक नेमबाजी
All Sports

अवनी लेखरा : पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय

by Mahesh Pathade
September 6, 2021
ऑलिम्पिक भारत सुवर्ण पदक
All Sports

बिंद्रा, चोपडामुळे मिळाली हॉकीव्यतिरिक्त ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याची ऊर्जा

by Mahesh Pathade
August 10, 2021
Tags: Winter Olympics 2022Winter Olympics 2022 and ChinaWinter Olympics and China
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
do-you-know-this-mascots-from-the-olympics

ऑलिम्पिकमधील हे शुभंकर तुम्हाला माहीत आहेत का?

Comments 1

  1. Pingback: Do you know this mascot from the Olympics? ऑलिम्पिकमधील हे शुभंकर तुम्हाला माहीत आहेत का? - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!