All SportsTokyo Olympic 2020

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तरी अॅथलेटिक्समध्ये मिळणार का भारताला पदक?

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला यंदा तरी मिळणार का  ऑलिम्पिक पदक?

अ‍ॅथलेटिक्स (athletics) हा ऑलिम्पिकमधील खेळांचा आत्मा म्हंटला जातो. टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic) क्रीडा महायुद्धात भारतानेही आतापर्यंत 172 खेळाडूंना उतरवले आहे. मात्र, भारताला (India) केवळ दोनच पदके मिळाली आहेत. ही दोन्ही पदके एकाच खेळाडूने जिंकली आहेत. मात्र, तो खेळाडू मूळ भारतीय नव्हता, तर तो मूळचा ब्रिटिश खेळाडू होता.

म्हणूनच एक खंत भारतीयांना आजही सलत आहे, की अजूनपर्यंत एकाही भारतीयाला अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) पदकसूचीत भारताच्या नावावर केवळ दोन रौप्यपदकांची नोंद आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही पदके १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आहेत. अँग्लो इंडियन खेळाडू नार्मन प्रिचार्ड याने 200 मीटर आणि 200 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ही पदके जिंकली होती. आता त्याला १२० वर्षांचा काळ लोटला आहे.

रौप्यपदके मिळविणारा भारतीय की ब्रिटिश?

olympic athletics india | प्रिचार्ड पहिलाच पदकप्राप्त भारतीय खेळाडू नाही, तर ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व करणारा पहिलाच खेळाडू होता. अर्थात, जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने 2005 मध्ये त्याची पदके ब्रिटनच्या खात्यात नोंदवली आहेत. ते काहीही असो, भारतीय ऑलिम्पिक संघटना मात्र प्रिचार्डला आजही भारतीय खेळाडूच मानत आहे. प्रिचार्डचा जन्म 23 जून 1875 रोजी कलकत्त्याला (आताचा कोलकाता) झाला. तो 1905 मध्ये ब्रिटेनमध्ये स्थायिक झाला. तो अभिनेता होता. नंतर तो हॉलीवूडच्या चित्रपटांत काम करण्यासाठी लॉस एंजिल्सला गेला. तेथेच त्याने 30 ऑक्टोबर 1929 रोजी लॉस एंजिल्समध्ये अखेरचा श्वास घेतला. म्हणजे भारताकडून पदक जिंकल्यानंतर तो भारताचा राहिलाच नाही.

ऑलिम्पिकवारी करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण?

olympic athletics india | ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या मूळ भारतीय खेळाडूंपैकी वेगवान धावपटू पूरमा बॅनर्जी, लांब पल्ल्याचा धावपटू पादेपा चौगुले आणि सदाशिव दातार यांचा समावेश होता. त्यांनी 2020 च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. नीलिमा घोष आणि मेरी डिसौझा ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या. त्यांनी उन्होंने 1952 च्या हेलंसिकी ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत भाग घेतला होता. घोषने 80 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतही देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

चौथ्या स्थानापर्यंतच उंचावली कामगिरी!

अ‍ॅथलेटिक्समध्ये 1900 से 2016 दरम्यान भारताकडून 119 पुरुष आणि 53 महिला खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, एकालाही पदक जिंकता आले नाही. या कार्यकाळात भारताची ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी चौथ्या स्थानापर्यंतच राहिली.  उडता शीख (उडन सिख) मिल्खासिंग यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिले होते.  मिल्खासिंग यांचे कोव्हिडपश्चात आजाराने निधन झाले. त्यांची इच्छा होती, की मी जरी ऑलिम्पिक पदक मिळवू शकलो नसलो तरी मी असेपर्यंत एका तरी भारतीयाने पदक जिंकावं, अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने त्यांची ही इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही.

पी टी उषाचेही थोडक्यात हुकले पदक

olympic athletics india | उड़नपरी पी. टी. उषाने मात्र हे स्वप्न पूर्ण केले असते. 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये ती या पदकाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिलाही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

नीरज चोपडाकडून पदकाची आशा?

टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होत आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताचे 12 अ‍ॅथलीट वैयक्तिक आणि मिश्र रिले संघासाठी पात्र ठरले आहेत. यात केवळ भालाफेक खेळाडू नीरज चोपडा यालाच पदकाचा दावेदार मानले जात आहे.  नीरज चोपडाने 2018 च्या जाकार्ता आशियाई स्पर्धेत 88.06 मीटर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, गेल्या वर्षीपासून फारच कमी स्पर्धांत त्याला सहभाग घेता आला. त्याचा थोडा फार परिणाम त्याच्या कामगिरीवर होऊ शकतो.

भारताचा मिश्र रिले संघ 2019 च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला होता. केटी इरफान हा भारताचा पहिला खेळाडू आहे, जो यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम पात्र ठरला. तो 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. मात्र, पोडियमपर्यंत चालण्यासाठी त्याला आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

olympic athletics india | भारताकडून केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला (पुरुष गटातील 20 किमी चालण्याची शर्यत), अविनाश साबळे (पुरुष गटातील 3000 मीटर स्टीपलचेस), मुरली श्रीशंकर (लांब उडी), नीरज चोपड़ा (भालाफेक), शिवपाल सिंह (भालाफेक), तजिंदरपाल सिंह तूर (गोळाफेक), कमलप्रीत कौर आणि सीमा पूनिया (महिला गट- थाळीफेक), भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (महिला गट- 20 किमी चालणे), तसेच 4×400 मीटर मिश्र रिले संघही टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

Follow us

Olympic athletics India Olympic athletics India Olympic athletics India Olympic athletics India Olympic athletics India Olympic athletics India

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ exclude_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!