All SportsIPL

कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद का सोडले? | Why did Dinesh Karthik leave the captaincy of KKR?

 

Why did Karthik leave the captaincy of KKR?

कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद का सोडले?


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

इंडियन प्रीमियर लीगच्या मध्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) 16 ऑक्टोबर 2020 रोजी मोठा फेरबदल केला आहे. यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने Dinesh Karthik | कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

आता केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा इयॉन मॉर्गनच्या Eoin Morgan | खांद्यावर आली आहे. या बदलामुळे केकेआरला उभारी मिळेल की नाही, हे पुढे कळेलच, तूर्तास कार्तिकला नेतृत्व गमवावं लागणं चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला हाच तो मॉर्गन आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने विश्वकरंडक जिंकला. आतापर्यंत त्याच्यावर केकेआरच्या उपकर्णधारपदाची धुरा होती. आता तो कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

Why did Karthik leave the captaincy of KKR? | मात्र, या सगळ्या घडामोडी अचानक घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडले की त्याला सोडण्यास भाग पाडले, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.

Why did Karthik leave the captaincy of KKR?

कार्तिक काय म्हणाला?


What did Karthik say? | कर्णधारपद सोडल्यानंतर दिनेश कार्तिकने Dinesh Karthik | आपली बाजू मांडली आहे. मला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असून, संघात अधिक चांगले योगदान द्यायचे असल्याने मी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे, असे कार्तिकने संघ व्यवस्थापनाला कळविले आहे.

कार्तिकची ही बाजू अर्धसत्य आहे. मुळात, कार्तिकने केवळ याच कारणासाठी कर्णधारपद सोडलं यावर कोणी विश्वास ठेवू शकणार नाही. दोन वर्षांपासून त्याच्याकडे हे पद होते. त्यामुळे यामागचे कारण वेगळे असू शकते असं म्हणण्यास जागा आहे.

संघाची ढासळती कामगिरी आणि नेतृत्वाचा अभाव ही दोन कारणे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्न उभी करण्यास पुरेशी आहेत. हे वास्तव संघ नक्कीच दुर्लक्षित करणार नाही.

केकेआरचे सीईओ काय म्हणाले?


What did the CEO of KKR say? | दिनेश कार्तिकच्या या निर्णयावर केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी जी प्रतिक्रिया दिली तीही मजेशीर आहे.

ते म्हणाले, ‘‘दिनेश कार्तिकसारखं नेतृत्व संघाला मिळाल्याने आम्ही भाग्यवान होतो. असा निर्णय घ्यायलाही धाडस असावं लागतं. त्याच्या या निर्णयाने आम्ही सर्वच चकित आहोत. आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो.’’

मैसूर पुढे म्हणाले, ‘‘कार्तिक आणि इयॉन यांनी एकमेकांसोबत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आता इयॉन मॉर्गनकडे नेतृत्व आलं आहे. भूमिकांची केवळ अदलाबदल झाली आहे. अपेक्षा हीच आहे, की हा बदल सहजपणे स्वीकारला जाईल.’’

कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद का सोडले?


Why did Karthik leave the captaincy of KKR? | संघाच्या आतापर्यंतच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर बरीच टीका होत होती. केकेआरने आतापर्यंतच्या आठ सामन्यांत (17 ऑक्टोबर 2020 पर्यंत) चार सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेवन पंजाबविरुद्ध त्यांना निसटते विजय मिळाले आहेत.

संघाला सुनील नारायणच्या संदिग्ध गोलंदाजीच्या शैलीवरूनही फटका बसला आहे. त्याच्या फिरकी गोलंदाजीच्या सदोष शैलीवर आक्षेप घेतल्याने संघासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. या तक्रारीनंतर त्याला संघात घेतलेले नाही.

कार्तिकच्या नेतृत्वाची समीक्षा सुरुवातीपासूनच होत आली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धची त्याची अर्धशतकी खेळी सोडली तर कार्तिकची कामगिरी यथातथाच राहिली आहे. त्याची वैयक्तिक कामगिरीच नाही, तर त्याची अनेक संघाविषयीची धोरणंही अयशस्वी ठरली आहेत.

कुलदीप यादवसारखा उत्तम फिरकी गोलंदाज शारजाहच्या संथ खेळपट्टीवर कमाल करू शकला असता. मात्र, त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यास कार्तिक उत्सुक नव्हता. यावरूनही त्याच्यावर टीका झाली.

प्रसिद्ध कृष्णासारख्या उत्तम गोलंदाजाची उपयुक्तताही कार्तिकला समजली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध डेथ ओव्हरमध्ये कृष्णाने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली होती. मात्र, त्याला दुर्लक्षित करून कार्तिकने वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीवर विश्वास दाखवला.

मावी आणि नागरकोटी या दोन्ही गोलंदाजांच्या भात्यात सारखेच बाण आहेत. म्हणजे दोघांच्याही वैविध्यात फारसा फरक नाही.

कर्णधारपद सांभाळताना कार्तिकला किमान हे समजायला हवं होतं. मात्र तरीही त्याने दोघांनाही खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो पुन्हा टीकेचं लक्ष्य ठरला.

कार्तिकच्या नेतृत्वावर याच मोसमात शंका घेतल्या जाताहेत असं नाही, तर गेल्या मोसमातही त्याचं नेतृत्व वादाच्या भोवऱ्यात होतं.

गेल्या मोसमात केकेआर प्ले ऑफच्या जवळ असतानाही पोहोचू शकला नव्हता. त्या वेळी आंद्रे रसेलसारख्या कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूला खालच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याची घोडचूक कार्तिकने केली. यावर रसेलचा तर सात्त्विक संताप झाला होता. त्याने कार्तिकवर जाहीरपणे टीका करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.

केकेआर आठपैकी चार पराभवांमुळे चौथ्या स्थानावर आहे. या पराभवांमागे कार्तिकचं सदोष नेतृत्वच जबाबदार आहे हे केकेआरच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे संघाचं नेतृत्व इयॉन मॉर्गनच्या हाती सोपवलं असण्याची शक्यता आहे.

Point Table upto17 Oct 2020

Team  Pld  Won  Lost  Net RR  Pts
1 Mumbai Indians +1.353  12
2 Delhi Capitals +0.990  12
3 Royal Challengers Bangalore -0.139 10
4 Kolkata Knight Riders  -0.684  8
5 Sunrisers Hyderabad  +0.009  6
6 Chennai Super Kings  -0.390  6
7 Rajasthan Royals  -0.844  6
8 Kings XI Punjab  -0.295  4
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!