All SportsCricket

‘गुल-डोझर’चा क्रिकेटला अलविदा | pakistan pacer umar gul announces retirement of cricket

 

pakistan pacer umar gul announces retirement of cricket

‘गुल-डोझर’चा क्रिकेटला अलविदा


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल Umar Gul  | याने १७ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रीय टी-२० क्रिकेट  स्पर्धेच्या समारोपात क्रिकेटला अलविदा केला. त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या भेदक गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांचे स्टम्प उखाडणारा गुल पाकिस्तानमध्ये ‘गुल-डोझर’ नावाने परिचित होता.

pakistan pacer umar gul announces retirement of cricket

गुलने कारकिर्दीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन-डे सामना २०१६ मध्ये खेळला होता. तो सध्या राष्ट्रीय टी-२० करंडक सामन्यात बलुचिस्तानचं प्रतिनिधित्व करीत आहे. रावळपिंडीत शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत सदर्न पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 

umar gul announces retirement  | गुलने आपल्या ट्विटर पेजवर लिहिले आहे, ‘‘जड अंत:करणाने आणि खूप विचारांती मी राष्ट्रीय टी-२० करंडक स्पर्धेनंतर क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

त्याने सांगितले, ‘‘मी नेहमीच पाकिस्तानसाठी निष्ठेने खेळलो. क्रिकेट हेच माझं पहिलं प्रेम आहे आणि राहील. मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टींचा कधी तरी शेवट असतो.’’

पेशावर मध्ये जन्मलेल्या 36 वर्षीय गुलने 2003 मध्ये वन-डेत पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने कारकिर्दीतला पहिला कसोटी सामना खेळला, तर अखेरचा कसोटी सामना २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला.

गुलने 47 कसोटी सामन्यांत 34.06 च्या सरासरीने १६३ विकेट घेतल्या. त्याने 130 वन-डे सामन्यांत १७९ विकेट आणि 60 टी- 20 अंतरराष्ट्रीय सामन्यांत 85 विकेट घेतल्या. 

कौटुंबिक पार्श्वभूमी


उमर गुलचा जन्म १४ एप्रिल १९८४ रोजी पेशावर येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या उमरची ओढ क्रिकेटकडे अधिक होती. साध्या टेप-बॉलवर तो क्रिकेट खेळायचा. त्याच्या गोलंदाजीला धार होती. वेगवान गोलंदाजीमुळे तो मित्रांमध्ये परिचित होता. मित्रांच्याच प्रोत्साहनामुळे त्याची निवड राष्ट्रीय क्रिकेट संघात झाली. 

गुल ऑक्टोबर २०१० मध्ये दुबईस्थित एका डॉक्टरशी विवाहबद्ध झाला. त्याचं लग्न ठरलं त्या वेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) पत्रकाराने त्याच्या पत्नीचं नाव विचारलं, त्या वेळी तो म्हणाला, “तिच्या नावाविषयी विचारू नका. पश्तूनमध्ये लग्नाआधी पत्नीचं नाव सांगत नाहीत.”

लग्नानंतर गुल दाम्पत्याच्या घरात दोन वर्षांनी पाळणा हलला. मे २०१२ मध्ये गुल दाम्पत्याला मुलगी झाली. रेहाब तिचं नाव. याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने उमर गुलच्या पेशावर येथील घरी छापा टाकला. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून सैन्याने उमरचा भाऊ मीराजला ताब्यात घेतले. नंतर सैन्याला आपली चूक उमगली. चुकीच्या माहितीच्या आधारे छापा टाकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मिराजकडे दिलगिरीही व्यक्त केली.

भारताविरुद्धच्या कामगिरीने चर्चेत


पाकिस्तानी खेळाडूंची लोकप्रियता भारताविरुद्धच्या सामन्यापासूनच सुरू होते. उमर गुलसुद्धा भारताविरुद्धच्या कामगिरीने अधिक चर्चेत आला.

2004 मध्ये लाहोर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 31 धावांत भारताचे पाच खंदे फलंदाज तंबूत धाडले होते. हे पाच खंदे फलंदाज होते वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, पार्थिव पटेल. एका डावात या दिग्गज फलंदाजांना तंबूत धाडणे सोपे मुळीच नव्हते.

या कामगिरीने उमर गुलला पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी डोक्यावर घेतले नसेल तरच नवल. यापूर्वीही त्याने चार कसोटी सामन्यांत 19 विकेट घेतल्या आहेत.

दुखापतीने बेजार


वेगवान गोलंदाजांना दुखापतीचा सामना करावा लागतोच, पण उमर गुलच्या वाट्याला दुखापत जरा जास्त वाट्याला आली. किंबहुना या दुखापतीमुळेच त्याच्या कामगिरीला ब्रेक लागला. 2004 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीनंतर गुल जवळपास दोन वर्षे खेळू शकला नाही.

कारण या कसोटी नंतर गुलचं पाठीचं दुखणं वाढलं. त्याच्या पाठीत तीन स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं. दीर्घ काळ उपचारानंतर गुलने पाकिस्तान क्रिकेट संघात पुनरागमन केलं. हे पुनरागमनही 2006 मधील भारताविरुद्धच्या वन-डे सामन्यानेच झालं.

दीर्घकाळ संघाबाहेर राहिल्यानंतरही गुलच्या वेगवान गोलंदाजीतली धार कमी झाली नाही. 2007 अखेरपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला. 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या.

पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दोन वेळा (2007 व 2009) पोहोचला आहे. त्याचे श्रेय उमरलाच जाते. पाकिस्तान 2007 मध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभूत झाला. मात्र, 2009 मध्ये पाकिस्तान वर्ल्डकपचा विजेता ठरला. या विजयाचे श्रेय बरेचसे उमर गुलला जाते. 2011 मध्ये उमर गुल पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला.

यशाच्या पायऱ्या लीलया सर करताना दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याला पाकिस्तानी संघातून बाहेर व्हावे लागले.

गुलने अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना 2013 खेळला. त्या वेळी ते 29 वर्षांचा होता. नंतर त्याच्या कामगिरीला ओहोटी लागली. 2016 पर्यंत तर त्याची पाकिस्तानी संघात ये-जा सुरू राहिली. मात्र, हा तो गुल नव्हता, ज्याचा यॉर्कर फलंदाजांना जेरीस आणायचा. अचूकतेबाबत तो लोकप्रिय होता.

[jnews_block_34 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!