All SportsCricketSports History

सदोष गोलंदाजी म्हणजे काय? | what is Illegal Bowling Actions

 

what is Illegal Bowling Actions

सदोष गोलंदाजी म्हणजे काय?


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

सुनील नारायणच्या सदोष गोलंदाजीच्या शैलीने यंदाची आयपीएल २०२० चर्चेत आली. यातून तो निर्दोष सुटला असला तरी वर्षातून एकदा तरी एखादा गोलंदाज सदोष शैलीचा शिकार होतोच. ही सदोष गोलंदाजी म्हणजे काय, what is Illegal Bowling Actions | असा प्रश्न अनेकांना पडतो.

त्याचे नियम नेमके काय आहेत, याची अनेकांना माहिती नाही. सदोष गोलंदाजीलाच ‘चकर’ गोलंदाजी chucker bowling | असेही म्हंटले जाते. क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या शैलीसाठी स्वतंत्र नियम आहे. क्रिकेटचे नियम लंडनच्या मेरिलबोन क्रिकेट क्लबतर्फे MCC | तयार केले जातात.

1788 पासून क्रिकेटशी संबंधित नियम तयार करण्यात येत आहेत.what is Illegal Bowling Actions | गोलंदाजीबाबत काय नियम आहेत यावर एक प्रकाशझोत…

what is Illegal Bowling Actions?
सदोष गोलंदाजीची शैली


क्रिकेटच्या नियमांमध्ये सदोष गोलंदाजीच्या chucker bowling | शैलीवर 24 (2) आणि 24(3) अनुसार नियम आहेत. यातला 24(3) नियम सर्वाधिक वेळा वापरण्यात येतो. कारण याच नियमाचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. हा नियम आहे सदोष गोलंदाजीच्या शैलीचा. Illegal Bowling Actions |

आयसीसीच्या या नियमानुसार, गोलंदाजाचा हात १५ अंशांत वळायला हवा. मात्र, जो गोलंदाज १५ अंशांपेक्षा अधिक अंशांत हात वळवत असेल तर ती सदोष व अवैध शैली Illegal Bowling Actions | मानली जाते. हातातला चेंडू फेकेपर्यंत जो कोन तयार होतो, तो मोजला जातो. त्यावरून ही शैली वैध की अवैध ठरवली जाते.

कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज सुनील नारायण याची गोलंदाजी योग्य ठरवण्यात आली. वेस्ट इंडीजचा हा खेळाडू सदोष गोलंदाजीच्या शैलीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कोलकाता नाइट रायडर्सनेही त्याला संघाबाहेर ठेवले होते.

आता आयपीएलच्या सदिग्ध अॅक्शन समितीने रविवार, १८ ऑक्टोबर २०२० रोजी त्याची गोलंदाजीची शैली योग्य ठरवली आहे. यामुळे सदोष गोलंदाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुथय्या मुरलीधरनसह अनेक दिग्गज खेळाडू या समस्येतून गेले आहेत.

What action is taken?
काय कारवाई केली जाते?


जर एखादा गोलंदाज टी-२० मध्ये सदोष गोलंदाजीत सापडला तरी तो कसोटीत खेळू शकतो किंवा वन-डेत गोलंदाजी करतो. कारण टी-२०, वन-डे आणि कसोटी या तिन्ही प्रारूपांचे नियम वेगवेगळे आहेत. डिसेंबर 2018 मध्ये श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकिला धनंजय याला सदोष गोलंदाजीच्या शैलीवरून आंतरराष्ट्रीय गोलंदाजी करण्यास निलंबित करण्यात आले होते. कारण त्याचा हात १५ अंशांपेक्षा अधिक कोनातून वळत होता.

आयसीसीच्या 11.1 नियमानुसार धनंजयवर ही कारवाई करण्यात आली होती. याच नियमानुसार तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही गोलंदाजी करू शकणार नाही. मात्र, आयसीसीच्या 11.5 नियमानुसार जर या सदोष खेळाडूला संबंधित देशाच्या अधिकृत क्रिकेट संघटनेने किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटने गोलंदाजी करण्यास परवानगी दिली तर तो गोलंदाजी करू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय गोलंदाजी करण्यास त्याला परवानगी नसेल.

what is Illegal Bowling Actions

What is the right action of bowling?
गोलंदाजीची योग्य शैली कशी असते?


२०१९ मध्ये कामचलावू फिरकी गोलंदाज अंबाती रायुडूच्या गोलंदाजीच्या शैलीवर अंपायरनेच आक्षेप घेतला होता. त्यामुळे रायुडूला 14 दिवसांच्या आत गोलंदाजीच्या शैलीची चाचणी द्यावी लागली होती. सदोष गोलंदाजी शैलीवर तक्रार झाली तर खेळाडूला 14 दिवसांच्या आत शैलीची चाचणी देणे अनिवार्य असते.

जर त्या शैलीत त्याने आवश्यक ते बदल केले तर त्याला आयसीसीच्या 4.5 नियमानुसार गोलंदाजीची शैलीची चाचणी पुन्हा करण्यास सांगितले जाते. त्यात ती शैली योग्य ठरली तर संबंधित गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास परवानगी मिळू शकते.

How is the reporting process on Illegal bowling?
सदोष गोलंदाजीवर अहवालाची प्रक्रिया कशी असते?


एखाद्या गोलंदाजाची शैली सदोष आढळली तर त्याची माहिती सामनाधिकारी म्हणजे पंच, सामन्याचा पंच यांनी लिखित स्वरूपात आयसीसीकडे दिली जाते. त्याची एक प्रत संबंधित गोलंदाजाला आणि त्याच्या देशाच्या क्रिकेट संघटनेला दिली जाते.

संबंधित खेळाडू सातत्याने नियमाचं उल्लंघन करतो का किंवा गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी एकदोन चेंडू चुकीच्या पद्धतीने फेकतो का आदी माहिती या अहवालात नमूद करावी लागते.

अधिकृत अहवाल पाठवण्यापूर्वी सामनाधिकारी आणि पंच यांनी गोलंदाजीची शैली खुल्या डोळ्यांनी म्हणजे डोळ्यांवर चष्मा न लावता पाहणे आवश्यक आहे. हे पाहताना व्हिडीओ फूटेज सामान्य स्पीडमध्ये सुरू असावी लागते. मात्र, तक्रारीची अधिक चांगल्या प्रकारे तपासणी करायची असेल तरच स्लो मोशनचे फूटेज पाहिले जाते.

दोषी आढळलेल्या गोलंदाजाला विशेष स्वतंत्र समितीच्या तज्ज्ञांसमोर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक द्यावे लागते. हे तज्ज्ञ गोलंदाजीच्या शैलीचे स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीच्या (State of the Art Technology) मदतीने तपासणी केली जाते. जर आरोप खरा ठरला तर गोलंदाजावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते.

How the bowling style changes?
गोलंदाजीच्या शैलीत कसा करतात बदल?


गोलंदाजाची शैली सदोष आढळली तर त्यात सुधारणा करण्यासाठी त्याला प्रशिक्षण केंद्रात पाठवले जाते. त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी घेतली जाते. जर गोलंदाजाच्या शैलीत सुधारणा झाली तर त्याला पुन्हा खेळण्यास परवानगी दिली जाते. जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत बंदी कायम राहते. पाकिस्तानचा सईद अजमल याचं उत्तम उदाहरण आहे. गोलंदाजीत सुधारणा केल्यानंतरच त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली होती.

सदोष गोलंदाजीबाबत पहिल्यांदा जी चाचणी होते त्याचा खर्च आयसीसीकडून (ICC) केला जातो. मात्र, दुसऱ्यांदा जी चाचणी होते, त्याचा खर्च खेळाडू किंवा त्याच्या देशातील क्रिकेट संघटनेला उचलावा लागतो.

हे खेळाडू ठरले होते चकर


मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), जोहान बोथा (दक्षिण आफ्रिका), मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), सईद अजमल (पाकिस्तान), तस्कीन अहमद (बांग्लादेश), सुनील नारायण (वेस्ट इंडीज)

आयसीसीकडे हरभजनसिंग, ब्रेट ली, मोहम्मद हाफीज, शोएब मालिक यांच्या गोलंदाजीच्या शैलीवरही तक्रारी आल्या होत्या. मोहम्मद हाफीज वगळता अन्य खेळाडूंवर आयसीसीने कोणतीही कारवाई केली नाही. हाफीजची शैली सदोष आढळल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाचा फिरकी गोलंदाज अर्जुन नायर याची शैली सदोष आढळल्याने त्याच्यावर ९० दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटममधून निलंबित करण्यात आले होते. सिडनी थंडर्स आणि होबार्ट हरिकेश या दोन संघांतील सामन्यादरम्यान अर्जुन नायरच्या सदोष गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आला होता. या अहवालात तो दोषी आढळला. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले.

These players were accused of faulty bowling
या खेळाडूंवर सदोष गोंलदाजीचा घेतला होता आक्षेप


2014

सदोष गोलंदाजीच्या शैलीचा आक्षेप यापूर्वी प्रज्ञान ओझावरही घेण्यात आला होता. रणजी करंडक सामन्यात हैदराबादकडून खेळत असताना 2014 मध्ये त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्या वेळी रणजी करंडक सामन्यातून त्याला बाहेर जावे लागले होते.

2016

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा इरंगा याच्याही गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला २-० असे पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर इरंगाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता.

2017

सदोष गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हाफीज याला निलंबित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हाफीजची शैली तिसऱ्यांदा दोषी ठरवली होती. त्यामुळे त्याला गोलंदाजीतून निलंबित करण्यात आले होते. आयसीसीच्या रडारवर अनेकदा आल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम आक्रमने त्याला फलंदाजीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

2019

अंबाती रायुडूवरही सदोष गोलंदाजीचा ठपका बसला आहे. तसा तो मूळचा फलंदाज आहे. मात्र, कामचलावू फिरकी गोलंदाजीही कधी कधी करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ वन-डे सामना खेळत असताना अंबाती रायुडूच्या शैलीवर तक्रार करण्यात आली होती. रायुडूने त्या वेळी फक्त दोनच षटके टाकताना १३ धावा दिल्या होत्या.

2019

वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने विडीजला २-० असे पराभूत केले होते. या सामन्यात विंडीजचा क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. असे असले तरी त्याला उर्वरित सामन्यांत गोलंदाजी करण्यास परवानगी देण्यात आली होती.

जोपर्यंत त्याच्या शैलीवर अहवाल येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणत्याही सामन्यास प्रतिबंध करण्यात येणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. गंमत म्हणजे, याच वेळी वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शैलीवरही प्रश्न उपस्थित केला होता.

ते म्हणाले होते, की काही लोक असेही आहेत जे बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर शंका घेत आहेत. यावर सुनील गावस्करांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, की बिशप यांनी त्यांची नावे जाहीर करावीत जे शंका घेत आहेत. क्रेग ब्रेथवेटच्या शैलीवर २०१७ मध्येही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शंका घेतली होती.

2019

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अकिला धनंजय आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन या दोघांवरही सदोष गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांत गॉल येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर या दोघांच्या शैलीवर आक्षेप नोंदविण्यात आले.

एकाच सामन्यात दोन प्रतिस्पर्धी संघांतील दोन गोलंदाजांवर सदोष शैलीचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यांच्या शैलीवर अहवाल येईपर्यंत त्यांना पुढच्या सामन्यांत खेळण्यास परवानगीही देण्यात आली होती.

[jnews_block_23 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”77″]

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!