All SportsIPL

सुनील नारायणची शैली निर्दोष | Sunil Narine’s action cleared

 

Sunil Narine’s action cleared

सुनील नारायणची शैली निर्दोष


Follow us

[jnews_footer_social ]

कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज सुनील नारायणला Sunil Narine | अखेर दिलासा मिळाला. वेस्ट इंडीजचा या खेळाडूवर सदोष गोलंदाजीच्या शैलीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कोलकाता नाइट रायडर्सनेही KKR | त्याला संघाबाहेर ठेवले होते.

आता आयपीएलच्या सदिग्ध अॅक्शन समितीने IPL Suspect Bowling Action Committee | रविवार, १८ ऑक्टोबर २०२० रोजी त्याची गोलंदाजीची शैली योग्य ठरवली आहे.

गेल्याच आठवड्यात त्याच्या (Sunil Narine) गोलंदाजीच्या सदोष शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 10 ऑक्टोबर 2020 रोजी त्याच्या शैलीवर शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र, आयपीएलच्या समितीने त्याची शैली योग्य ठरवली आहे.

आयपीएलतर्फे सांगण्यात आले, की ‘‘कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू सुनील नारायण Sunil Narine | याची गोलंदाजीची शैली आयपीएलच्या संदिग्ध गोलंदाजी अॅक्शन समितीने योग्य ठरवली आहे.’’

सुनील नारायणविरुद्ध जेव्हा तक्रार करण्यात आली होती, तेव्हा त्याला आयपीएलच्या चेतावणी यादीत टाकण्यात आले होते.

एका विशिष्ट समितीकडून नारायणच्या शैलीवर अधिकृत आकलन व्हावे, असा आग्रह नाइट रायडर्सने धरला होता. त्याच्या शैलीच्या आकलनासाठी केकेआरने त्याची सर्व कोनातील स्लो मोशन अॅक्शनचे फूटेज समितीकडे सोपविण्यात आले होते.

केकेआरने सांगितले, ‘‘समितीने नारायणच्या अॅक्शनच्या फूटेजवरून सर्व गोलंदाजीचे परीक्षण केले. त्याचा कोपरा निर्धारित केलेल्या नियमानुसार वळ असल्याचे दिसले. त्यामुळे त्याची शैली सदोष मानता येणार नाही. Sunil Narine’s action cleared |’’

समितीने असेही सांगितले, की नारायण आयपीएल 2020 च्या सामन्यांत तशाच शैलीनुसार गोलंदाजी करेल, जी तो आधीच्या सामन्यांमध्ये वापरत होता. त्याने गोलंदाजीच्या शैलीत बदल करण्याची गरज नाही.

32 वर्षीय नारायणला आता सदोष अॅक्शनच्या यादीतूनही काढण्यात आले आहे. नारायणला यापूर्वीही २०१५ मध्ये सदोष गोलंदाजीच्या शैलीवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते. त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला त्याची गोलंदाजीची शैली अवैध वाटली होती.

मात्र, 2016 मध्ये त्याच्या शैलीत सुधारणा केल्यानंतर त्याला क्रिकेटच्या सर्व प्रारूपामध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आली. २०१८ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्येही नारायणचीच्या शैलीवर शंका घेण्यात आली होती. नंतर त्याची शैली निर्दोष ठरविण्यात आली.

[jnews_block_19 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!