All SportsCricketsports news

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं? ही घटना घडली आहे 9 फेब्रुवारी 2023 रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर. झालं काय, की कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया संघाचे पाच खेळाडू तंबूत धाडले. दीर्घ कालावधीनंतर जडेजा आंतरराष्ट्री सामना खेळत होता. त्याच्या या कामगिरीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत स्थितीत आला. मात्र, त्याच्या या कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्याच्यावर बॉल टेम्परिंगचा आरोप केल्याने चर्चेला उधाण आले. यात माध्यमेच नाही, तर माजी क्रिकेटपटूंनीही जडेजाच्या संशयास्पद हालचालींवर शंका उपस्थित केली. मात्र, भारताने हे आरोप फेटाळले आहेत. ही घटना नेमकी काय आहे, याचेही स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, सोशल मीडियावर एक क्लिप सध्या प्रचंड चर्चेत आली.

काय घडलं?

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=K2FWM2iaHtI” column_width=”4″]

सोशल मीडियावर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लीपवरूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पाच विकेट गमावल्या होत्या. या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा याने डाव्या हाताच्या बोटाला काही तरी लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोहम्मद सिराज आपल्या मनगटावरून काही तरी पदार्थ जडेजा आपल्या डाव्या हाताच्या बोटाला लावताना दिसतो. मात्र, या क्लीपवरून हे समजत नाही, की सिराजने जडेजाला नेमके असे काय दिले आहे, ज्याच्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत आहे. त्यानंतर जडेजा तो पदार्थ बोटाला रगडतो आणि पुन्हा गोलंदाजी करू लागतो.

सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम पेन यावर ‘आश्चर्यकारक आणि मनोरंजक’ अशी प्रतिक्रिया दिली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ट्विटरवर म्हणतो, “तो फिरकी घेणाऱ्या आपल्या बोटाला काय लावतो आहे? मी असं कधी नाही पाहिलं?”

रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पंचांना याबाबत माहिती दिली होती, असं ‘ईएसपीएन क्रिसइन्फो’ने म्हंटलं आहे.

Ravindra Jadeja च्या Ball Tampering नंतर पुढे आले हे कारण

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंचांनी सांगितलं, की जडेजा आपल्या बोटाला वेदनाशामक क्रीम (मलम) लावत होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनीही दिलेल्या माहितीत हेच स्पष्टीकरण दिलं आहे. जडेजाने महंमद सिराजच्या हातावरून मलम घेतले आणि ते बोटाला चोळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी हा मुद्दा उचलून धरला.

का घडली ही चर्चा?

2018 मध्ये चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जडेजा पाच विकेट घेतल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याने हाताला काही लावल्यामुळेच जडेजाला विकेट मिळाल्या, असे मिम्स फिरू लागले.

काय म्हणाला, Ravindra Jadeia?

खेळपट्टी फिरकीच्या आहारी नव्हती. इतरांच्या तुलनेत ही खेळपट्टी संथ होती. चेंडू थोडा खाली राहत होता. त्यामुळे मी क्रीझचा उत्तम वापर करून गोलंदाजी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा गोंधळ उडाला, असं Ravindra Jadeja ने सांगितलं, त्या वेळी Ball Tampering चा मुद्दा पुढे आलेला नव्हता.

ravindra jadeja ball tampering

आक्षेप घेणाऱ्यांचे काय आहेत प्रश्न?

रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पंचांना याबाबत माहिती दिली होती, असं ‘ईएसपीएन क्रिसइन्फो’ने म्हंटलं आहे. BCCC च्या सूत्रांनीही हेच म्हंटलं आहे.

  • आता प्रश्न हा आहे, की जर Ravindra Jadeja च्या हाताच्या बोटाला वेदना होत होत्या, तर त्यावर मलम लावण्यासाठी डॉक्टर का नाही आला?
  • जर हाताला मलम लावण्यासाठी मोहम्मद सिराज आला असेल तर मग त्याच्या मनगटावर मलम लावून तो Ravindra Jadeja च्या बोटाला लावण्याची ही पद्धत अजब नाही का?
  • पंचांकडे परवानगी नेमकी कशाची मागितली होती? मलम लावण्याची परवानगी दिली असेल तर ती तो मलम डॉक्टरांनी लावून द्यायला हवा होता. व्हाया सिराजमार्गे आणि तेही त्याच्या मनगटावरून जडेजाच्या बोटावर हा प्रवासच अजबगजब नाही काय?

जडेजाच्या समर्थनार्थ प्रश्न

  • जर जडेजाने हाताच्या बोटाला मलम लावण्याच्या बहाण्याने चेंडूला मलम लावला तर त्याचा फायदा त्याला कसा मिळू शकतो? कारण मलम लावण्यापूर्वीच त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. मलम लावल्यानंतर त्याला दोनच विकेट मिळाल्या?
  • मलम लावल्याने चेंडू वळतो की चेंडू कुरतडल्याने?
  • मैदानावर कोणत्याही वर्तनाचे चित्रण समोर येत असताना जडेजा इतक्या बिनधास्तपणे कसे काय असे वर्तन करील?

तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील तर जरूर कळवा…

हार्दिक पंड्या याला अष्टपैलू म्हणण्यास कपिलदेव यांचा का आहे आक्षेप?

[jnews_block_9 first_title=”Read More at:” url=”https://www.youtube.com/channel/UCtDg3ouSUEsZ-kt8Z83dhAA” include_category=”cricket”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!