• Latest
  • Trending

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Sunday, September 24, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

बॅडमिंटन खेळासाठी 2022 हे वर्ष कसं होतं, याचं उत्तर दमदार असंच म्हणावं लागेल. सिंधू आपली यशाची कारकीर्द आणखी लांब खेचू शकणार नाही...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
February 11, 2023
in All Sports, Badminton, Sports History, sports news, Sports Review
0
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

बॅडमिंटन खेळासाठी 2022 हे वर्ष कसं होतं, याचं उत्तर दमदार असंच म्हणावं लागेल. सिंधू आपली यशाची कारकीर्द आणखी लांब खेचू शकणार नाही ही वस्तुस्थिती असली तरी तिने 2022 च्या मोसमात उत्तम कामगिरी केली. तसं पाहिलं तर बॅडमिंटन विश्वावर चीन, जपान, इंडोनेशियाच्या वर्चस्वाला धक्के देत साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी आपला ठसा उमटवला आहे. साईनानंतर कोण याचं उत्तर जसं सिंधू हे एकच नाव पुढे येत होतं. मात्र, सिंधूनंतर कोण, याचं उत्तर शोधताना अनेक पर्याय पुढे येतात. 2022 वर्षात भारतीय बॅडमिंटनला नवी फळी दमदारपणे उभी राहताना दिसली. यंदाच्या मोसमात सिंगापूर ओपन जिंकल्यानंतर जागतिक क्रमवारीत सिंधू पाचव्या स्थानावर स्थिरावली. अजूनही सिंधूमध्ये खेळातलं कौशल्य शिल्लक आहे हा गतवर्षाने दिलेला विश्वास दिलासादायक म्हणता येईल. महिला गटात महाराष्ट्राची मालविका बनसोड, स्मित तोष्णिवाल, छत्तीसगडची आकर्षी कश्यप अशी अनेक नावं पुढे येत आहेत. भारतीय पुरुषांसाठी 2022 हे वर्ष अधिक फलदायी म्हणता येईल. कारण किदाम्बी श्रीकांतनंतर एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन यांच्यासारखे नव्या दमाचे खेळाडू बॅडमिंटन विश्वावर अधिराज्य गाजवत आहेत. 2022 मध्येच लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत प्रथमच सहाव्या स्थानावर झेप घेतली. सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीत विजेतेपद जिंकण्याची किमया साधली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण आणि दोन ब्राँझ पदके जिंकत ठसा उमटवला. बॅडमिंटनमध्ये भारताला उज्ज्वल भविष्य असल्याचा विश्वास 2022 या वर्षात नव्या फळीने दिला आहे.

14 जुलै

अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा : तारा शहा विजेती

पुणे : पुण्याच्या 17 वर्षीय तारा शहाने अखिल भारतीय ज्युनियर (19 वर्षांखालील) बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. पंचकुलामध्ये ही स्पर्धा झाली. मुलींच्या एकेरीच्या अंतिम लढतीत तारा आणि तिसरी मानांकित देविका सिहाग आमनेसामने होत्या. 2०19मध्ये भुवनेश्वरला झालेल्या सब-ज्युनिअर स्पर्धेत ताराने हरियाणाच्या देविकाला हरवले होते. तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी तारा उत्सुक होती, तर दुसरीकडे देविका त्या पराभवाचे उट्टे काढून जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक होती. मात्र, या वेळीही ताराने देविकाला पराभूत केले. या लढतीत ताराने 12-21, 21-16, 21-17 अशी बाजी मारली. अखिल भारतीय स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील ताराचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.

17 जुलै

चौरंगी पॅरा बॅडमिंटन 2022 : नित्याला सुवर्ण पदक

नवी दिल्ली : भारताच्या नित्या स्रे सुमती सिवानने चौरंगी पॅरा बॅडमिंटन-2022 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिलांच्या एसएच-6 गटाचे विजेतेपद मिळवले. डब्लिन (आयर्लंड) येथे ही स्पर्धा झाली. नित्याने इंग्लंडच्या रॅचेल चूंगवर 21-14, 18-21, 21-7 असा विजय मिळवला. यानंतर पुरुष एकेरीच्या एसएल-3 गटात प्रमोद भगतला अंतिम फेरीत इंग्लंडच्या डॅनिएल बेथेलकडून 17-21, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत चिराग बरेता-मनदीप कौर यांनी रौप्यपदक जिंकले.

सिंगापूर ओपन बॅडमिंटन 2022 : सिंधूला विजेतेपद

Currently Playing

सिंगापूर : भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन (सुपर 5००) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या 22 वर्षीय वँग झी यी हिची झुंज 21-9, 11-21, 21-15 अशी मोडून काढली. हैदराबादकर सिंधूने याआधी वँगविरुद्ध एकमेव लढत यंदाच्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत जिंकली होती. येत्या 28 जुलैपासून बर्मिंगहॅमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असताना लाभलेले हे जेतेपद सिंधूचा आत्मविश्वास दुप्पट करणारे ठरले आहे. कारण तिने सध्याची आशियाई विजेती वँग झी हिला नमवत स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला. यंदाच्या मोसमातील सिंधूचे हे तिसरे जेतेपद ठरले. तिने सिंगापूर आधी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. तसेच स्विस ओपन (दोन्ही सुपर 3०० स्पर्धा) स्पर्धेतही तिने अजिंक्यपद पटकावले. सिंधूने आतापर्यंत दोन ऑलिम्पिक पदके (रौप्य, ब्राँझ) जिंकली असून जगज्जेतेपदही तिच्या नावावर आहे. शिवाय दोनवेळा ती जागतिक उपविजेती ठरली आहे.

28 जुलै

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : भारताविरुद्धच्या लढतीआधीच पाकची माघार?

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला टी-2० स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान लढत रंगणार होती. मात्र, तत्पूर्वीच पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली. मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या गटसाखळीत भारताची सलामी पाकिस्तानविरुद्ध होती. मात्र बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे पाकने संघच न पाठवण्याचा निर्णय घेतला. अर्थात लढत झालीच असती तरी पाकिस्तान भारतीय बॅडमिंटन संघाला आव्हानही देण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे गटात भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोनच संघांचे आव्हान शिल्लक राहिले.

8 ऑगस्ट

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : भारताला तीन सुवर्ण, दोन ब्राँझ

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण पदके, तर दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत सुवर्ण पदके जिंकली, तर किदाम्बी श्रीकांत, तसेच महिला दुहेरीतील त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी ब्राँझ पदक पटकावले.

13 ऑगस्ट

जागतिक अजिंक्यपद : पी. व्ही. सिंधूची माघार

नवी दिल्ली : भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या पायाला (स्ट्रेस फ्रँक्चर) दुखापत झाल्याने माजी जगज्जेतीने शनिवारी हा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन सिंधूने ही माहिती दिली. 2०19 मध्ये सिंधू जगज्जेती ठरली होती, तर त्याआधी तिने दोन वेळा जागतिक उपविजेतेपद पटकावले असून दोन वेळा सिंधूने जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाईदेखील केली आहे. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान टोकियोला होणार असताना सिंधूला माघार घ्यावी लागली.

16 ऑगस्ट

बॅडमिंटनपटू प्रथमेशच्या सहभागाचा मार्ग मोकळा

औरंगाबाद : राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रथमेश कुलकर्णी याला अखेर न्याय मिळाला आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या प्रथमेशला भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या गलथान कारभाराचा फटका बसला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वातंत्र्यदिनी सुनावणी घेतली. या वेळी भारतीय बॅडमिंटन संघटनेने शपथपत्र दाखल करून नागपूरमध्ये 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेत प्रथमेशला संधी देण्यात येईल, असे नमूद केले. त्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी, असे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले. प्रथमेशला पुण्यात 3० ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धेतही नियमांचे पालन करून संधी देण्याचा प्रयत्न करावा, असे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी प्रथमेशचे वडील प्रकाश कुलकर्णी यांनी अमोल जोशी यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली होती. संघटनेच्या गलथान कारभारामुळे प्रथमेशचे नाव सुरुवातीला महिलांच्या गटात समाविष्ट करण्यात आले होते. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात त्याचे नाव तांत्रिक दुरुस्ती करून घेण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती.

28 ऑगस्ट

जागतिक बॅडमिंटन 2022 : अ‍ॅक्सेलसेन, यामागुची पुन्हा जगज्जेते

टोकियो : डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन आणि जपानच्या अकाने यामागुची यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा आपणच सरस असल्याचे दाखवून दिले. ॲक्सेलसेन आणि यामागुची यांनी रविवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अ‍ॅक्सेलसेनने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या थायलंडच्या कुलनावुत विदितसर्न याचा 21-5, 21-16 असा पराभव केला. अ‍ॅक्सेलसेनने सलग 37 वा सामना जिंकला. त्याने मार्चपासून एकही लढत गमावलेली नाही. त्याने दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपद जिंकले. गतविजेत्या यामागुचीने महिलांच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक विजेत्या चेन यू फेईचा 21-12, 1०-21, 21-14 असा पराभव केला. गतवर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यामागुचीला पदक जिंकता आले नव्हते; पण त्याची काहीशी भरपाई तिने घरच्या कोर्टवर जागतिक विजेतेपद जिंकून केली.

2 सप्टेंबर

बॅडमिंटन स्पर्धा रद्द

क्वालालंपूर : जागतिक बॅडमिंटन महासंघाने गुरुवारी करोनामुळे हाँगकाँग ओपन सुपर 5०० आणि मकाउ ओपन सुपर 3०० बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत. मकाउ ओपन 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान, तर हाँगकाँग ओपन 8 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार होती.

8 सप्टेंबर

पश्चिम विभागीय बॅडमिंटन : महाराष्ट्र विजेता

पुणे : महाराष्ट्र संघाने पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेतील सिनियर गटाचे विजेतेपद पटकावले, ज्युनिअर गटात महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. परभणीत ही स्पर्धा झाली. सीनिअर गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गुजरातचा 3-० असा पराभव करीत जेतेपद मिळवले. यात पुरुष एकेरीत वरुण कपूरने गुजरातच्या अधीप गुप्ताचा 4-21, 21-14, 21-14 असा पराभव केला आणि महाराष्ट्राचे विजयाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ महिला एकेरीत पूर्वा बर्वेने गुजरातच्या अदिता रावचा 19-21, 21-19, 21-17 असा पराभव केला आणि महाराष्ट्राला 2-० अशी आघाडी मिळवून दिली. आव्हान राखण्यासाठी गुजरातला पुरुष दुहेरीची लढत जिंकणे गरजेचे होते. मात्र, विप्लव आणि विराज कुवळे यांनी गुजरातच्या हेमेंद्रसिंह राजपूत-पुरुषोत्तम आवटे यांच्यावर 21-12, 21-11 अशी मात केली आणि महाराष्ट्राच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : एच. एस. प्रणॉयची अग्रस्थानी झेप

मुंबई : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत असलेल्या भारताच्या एच. एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धा मालिकेच्या क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जपान ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे प्रणॉयने ग्वाँझू येथे होणाऱ्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेसाठीच्या क्रमवारीत गुरुवारी अव्वल क्रमांक मिळवला. प्रणॉयने हे स्थान मिळवताना व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला मागे टाकले आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने प्रणॉयचे कौतुक करताना, ‘हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,’ असे ट्वीट केले होते.

13 सप्टेंबर

जागतिक बॅडमिंटन क्रमवारी : प्रणॉय 16 स्थानी

नवी दिल्ली : भारताचा एच. एस. प्रणॉय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरीत सोळाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रणॉय नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद आणि जपान ओपन सुपर-75० या सलग दोन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. त्याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला. सध्या 33 स्पर्धांमध्ये मिळून त्याच्या खात्यात 64,33० गुण जमा आहेत. तीस वर्षीय प्रणॉय ‘रेस टू ग्वाँझू’च्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहोचला होता.

24 सप्टेंबर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : दुखापतीमुळे सिंधूची माघार

अहमदाबाद : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. मात्र, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सिंधूने सांगितले. दुखापतीमुळे मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून खेळू शकणार नाही. तंदुरुस्त असते तर या स्पर्धेत नक्कीच खेळले असते, असे सिंधूने माघारीचे कारण स्पष्ट केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धा 2 ऑक्टोबरला सुरतमध्ये होणार असताना सिंधूने माघार घेतली होती.

25 सप्टेंबर

एमबीए : अध्यक्षपदी पुन्हा अरुण लखानी

नागपूर : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) रविवारी नागपुरात झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अरुण लखानी यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व राखले. अध्यक्षपदाच्या निवडणूक लखानी यांनी प्रदीप गंधे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, स्पर्धा संयोजन समिती सचिव हे एक पद सोडले तर इतर सर्व पदांवर लखानी गटातील उमेदवारांनी विजय मिळवला. अध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी ठरली असली तरी, डेप्युटी प्रेसिडेंटपदाच्या निवडणुकीत लखानी गटाचे अक्षय देवाळकर यांनी मंग्रीश पालेकर यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला. देवाळकर यांना 27, तर पालेकर यांना 25 मते मिळाली. स्पर्धा संयोजन सचिव या पदावर गंधे गटाचे आशिष बाजपेयी यांनी लखानी गटाचे मयूर घाटनेकर यांचा एका मताने पराभव केला. बाजपेयी यांना 25 मते मिळाली.

नवी कार्यकारिणी : अरुण लखानी (अध्यक्ष), अक्षय देवाळकर (डेप्युटी प्रेसिडेंट), शिरीष बोराळकर (वरिष्ठ उपाध्यक्ष), श्रीकांत वाड (सचिव), सिद्धार्थ पाटील (सहसचिव), प्रदीप गबाडा, सुधीर हरी, ओंकार हजारे, मंगेश काशीकर, मोहन शाह, पंकज ठाकूर (सर्व उपाध्यक्ष), जोवेल चांदेकर (प्रशिक्षण सचिव), आशिष बाजपेयी (स्पर्धा संयोजन समिती, गंधे गट), जगदीश जोशी (कोशाध्यक्ष). कार्यकारिणी सदस्य : नागोजी चिलकरवार, दिनेश धुत, नितीन गभने, प्रसाद गोखले, महेंद्र हिमाने, नंदकिशोर इंगोले, विनीत जोशी, चंद्रहास कन्हेरे, मिलिंद कुळकर्णी, विजय पळसकर, अजिंक्य पाटील.

27 सप्टेंबर

जागतिक रँकिंग : प्रणॉय अव्वल 15 मध्ये

नवी दिल्ली : सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने जागतिक रँकिंगच्या अव्वल 15 मध्ये पुनरागमन केले. युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन नवव्या क्रमांकावर कायम राहिला, तर किदाम्बी श्रीकांतला एका क्रमांकाचा फायदा झाल्याने तो 11 व्या क्रमांकावर आला होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साईना नेहवाल 31 व्या क्रमांकावर आली. सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीतील जोडी आठव्या क्रमांकावर कायम राहिली.

6 ऑक्टोबर

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मालविका बनसोडला रौप्यपदक

अहमदाबाद : महाराष्ट्राची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला एकेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत छत्तीसगडच्या आकर्षी कश्यपने मालविकावर 21-8, 22-2० अशी मात केली आणि सुवर्ण पटकावले. सुरत येथील पीडीडीयू कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेपर्यंत जागतिक क्रमवारीत आकर्षी 47 व्या, तर मालविका 41 व्या क्रमांकावर होती.

19 ऑक्टोबर

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन 2022 : साईना नेहवाल सलामीलाच गारद

ओडेन्स : भारताच्या लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांनी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. साईना नेहवालला मात्र पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली. महिला एकेरीत चीनच्या झ्हँग यि मानने साईनावर 21-17, 19-21, 21-11 असा विजय मिळवला. या वर्षी मानने दुसऱ्यांदा साईनाला पराभूत केले. फेब्रुवारीमध्ये मकाउ ओपनमध्ये मानने साईनाला नमविले होते.

25 ऑक्टोबर

जागतिक बॅडमिंटन क्रमवारी : सिंधू पाचव्या क्रमांकावर

भारताची पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत महिला एकेरीत पाचव्या क्रमांकावर पोहोचली. खराब फॉर्मातून जात असलेल्या साईना नेहवालची 33 व्या क्रमांकावर घसरण झाली. मालविका बनसोड 39 व्या, तर आकर्षी कश्यप 45 व्या क्रमांकावर आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आठव्या, किदाम्बी श्रीकांत अकराव्या, एच. एस. प्रणॉय बाराव्या क्रमांकावर राहिला.

30 ऑक्टोबर

फ्रेंच ओपन 2022 : चिराग- सात्त्विकला विजेतेपद

Currently Playing

पॅरिस : चिराग शेट्टी – सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील भारताच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. ‘किदाम्बी श्रीकांतच्या लॅपटॉपवरील स्क्रीनसेव्हर 2०17 च्या फ्रेंच ओपन स्पर्धेतील विजेतेपदाचा आहे. या स्क्रीनसेव्हरने आम्हाला या यशासाठी प्रेरणा मिळाली,’ असे भारताचा दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू सात्त्विकसाईराजने सांगितले.

सात्त्विक, चिरागला प्रत्येकी पाच लाख

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघटनेने सोमवारी फ्रेंच ओपन विजेत्या सात्त्विक-चिराग यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्याचबरोबर जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या शंकर मुथूस्वामी यालाही पाच लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. या निमित्ताने बॅडमिंटनपटूंवरही आता बक्षिसांची खैरात सुरू होतेय हेही नसे थोडके.

6 नोव्हेंबर

जागतिक पॅरा-बॅडमिंटन : भगत, मनीषाला सुवर्ण

टोकियो : भारताच्या प्रमोद भगत, मनीषा रामदास यांनी जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या एसएल-3 गटाच्या अंतिम फेरीत भगतने नीतेशकुमारला 21-19, 21-19 असे पराभूत केले. यानंतर महिलांच्या एसयू-5 गटाच्या अंतिम फेरीत मनीषाने जपानच्या मामिको टोयोदाला 21-15, 21-15 असे नमविले. दुहेरीत भगत-मनोज सरकार यांनी रौप्यपदक मिळवले.

7 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 3०० : लक्ष्य सेनची माघार

नवी दिल्ली : लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 3०० बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली. घशाला संसर्ग झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून होती. लक्ष्य सेन जर्मनीतील स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभूत झाला होता. त्यामुळे जागतिक स्पर्धा मालिकेतील अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरण्याची कोणतीही संधी नसल्यामुळे त्याने माघारीचा निर्णय घेतला होता.

8 नोव्हेंबर

जागतिक बॅडमिंटन क्रमवारी : लक्ष्य सेन सहाव्या स्थानी

नवी दिल्ली : भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुरुष एकेरीत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान ठरले. 21 वर्षीय लक्ष्य सेन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याचे 25 स्पर्धांमध्ये 76,424 गुण झाले आहेत. किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय अनुक्रमे 11 आणि 12 व्या क्रमांकावर आहेत. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी – चिराग शेट्टी या जोडीने सातवे स्थान मिळवले आहे. या जोडीने इंडिया ओपन सुपर 5०० आणि फ्रेंच ओपन सुपर 75० या स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला दुहेरीत त्रिशा जॉली – गायत्री गोपीचंद ही जोडी 23 व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

13 नोव्हेंबर

वर्ल्ड टूर फायनल्स : सिंधूची माघार

नवी दिल्ली : डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने मोसमाच्या अखेरीस होणाऱ्या ‘बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल्स’ बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान सिंधूला दुखापत झाली होती. सिंधूने 2०18 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा 14 डिसेंबरपासून चीनमधील ग्वाँझू येथे झाली. सिंधूचे वडील पी. व्ही. रमण्णा म्हणाले, ‘तिच्या डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून नव्या मोसमात ती पूर्णपणे तंदुरुस्त होऊन खेळू शकेल. तिने स्पर्धेबाबत चर्चाही केली. मात्र, ग्वाँझूमध्ये करोनाचे सावट आहे. त्यामुळे तेथे बंधने खूप आहेत. त्याचबरोबर नवीन मोसम डोक्यात ठेवून तिने स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरविले.’

Read more at:

All Sports

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ऑलिम्पिक बॅडमिंटन सिंधू
All Sports

बॅडमिंटन स्टार सिंधूने नैराश्यावर अशी केली मात…

August 3, 2021
म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये सिंधूच्या ‘कांस्य’ला ‘सुवर्ण’झळाळी!
All Sports

म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये सिंधूच्या ‘कांस्य’ला ‘सुवर्ण’झळाळी!

August 2, 2021
Tokyo-Olympics-India-medal
All Sports

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदक जिंकणार का?

July 10, 2021
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!