Cricket

हा कसोटी सामना विराट कधीही विसरू शकणार नाही…

क्रिकेटप्रेमींना काही सामने आयुष्यभर स्मरणात राहतात. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याही स्मरणात असाच एक सामना आहे. तो म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडीलेडमध्ये 2014 मध्ये खेळला गेलेला कसोटी सामना. हा अविस्मरणीय सामना होता. भारतासाठी तो कायमस्वरूपी मैलाचा दगड राहील, अशी भावना विराटने मंगळवारी, ३० जून २०२० रोजी इन्स्टाग्रामवर व्यक्त केली

अॅडिलेडवर हा सामना ९ ते १३ डिसेंबर २०१४ दरम्यान खेळविण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा पहिलाच कसोटी सामना होता. मायकेल क्लार्क Michael Clarke | याच्या नेतृत्वाखालील कांगारूंच्या संघासमोर भारताचे कडवे आव्हान होते. या सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावांत शतके Virat Kohli Century | ठोकली. तरीही भारतीय संघ हा सामना जिंकू शकला नाही.

या सामन्याचा एक फोटो कोहलीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोवरून आपल्या आठवणी शेअर करताना विराट म्हणाला, ‘आमचा आज जो संघ आहे, त्या आमच्या संघाच्या प्रवासातला हा कसोटी सामना महत्त्वाचा टप्पा आहे. अॅडिलेडमध्ये 2014 मध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. जसा तो भारतीय संघासाठी अविस्मरणीय सामना आहे, तसाच तो ऑस्ट्रेलियासाठीही.’

विराट म्हणाला, ‘‘मात्र, हा सामना आम्ही जिंकू शकलो नाही. मात्र, एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे आपण आपलं सर्व काही पणाला लावलं तर काहीही शक्य आहे. कारण आम्ही असं काही करण्यासाठी समर्पित आहोत. मात्र, त्याची सुरुवात खूपच कठीण झाली. आम्ही सामना जवळजवळ जिंकला होता. कसोटी सामन्यापुरते बोलायचे झाले, तर आमच्या प्रवासातील हा सामना मैलाचा दगड राहील.’’

ऑस्ट्रेलियाने पहिला डाव सात बाद 517 धावांवर घोषत केला होता. या धावाला आकार दिला तो डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क आणि स्टीव स्मिथच्या शतकांनी.

भारतानेही पहिल्या डावात जोरदार प्रत्युत्तर दिलं. विराटच्या 115 धावांच्या शतकी खेळीमुळे भारताने 444 धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियाने पाच बाद 290 धावांवर डाव घोषित केला होता आणि भारताला जिंकण्यासाठी 364 धावांचं लक्ष्य देण्यात आलं.

विराटने दुसऱ्या डावातही 141 धावांची शतकी खेळी रचली. याशिवाय मुरली विजयने 99 धावा केल्या. दुर्दैवाने या दोघांचे प्रयत्न अपयशी ठरले. भारताचा संघ 315 धावांत गारद झाला.

हेही वाचा…

विराट कोहली नंबर वन

मंदीतही विराटची चांदी

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!