All SportsCricketSports History

हे स्टेडियम आहे सौरऊर्जेवर | This stadium is solar powered

हे स्टेडियम आहे सौरऊर्जेवर

This stadium is solar powered | कर्नाटकातील बेंगलुरू येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियम (M. Chinnaswamy cricket stadium) तब्बल सात विश्वकरंडक क्रिकेट सामन्यांचा साक्षीदार आहे. विशेष म्हणजे एकही सामना भारताने गमावलेला नाही. अपवाद फक्त २०११ मधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा आहे. इथे भारत हरला नाही, पण सामना बरोबरीत सुटला होता.

स्टेडियमची जागा कर्नाटक सरकारच्या मालकीची आहे. ही जागा कर्नाटक क्रिकेट संघटनेला १०० वर्षांच्या कराराने दिली आहे. आता प्रश्न हा आहे, की कोण हे चिन्नास्वामी? (M. Chinnaswamy) त्यांचं नाव या स्टेडियमला का देण्यात आलं?

बेंगलुरूच्या या स्टेडियमचं नाव कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या नावाने होतं. नंतर हे नाव बदलण्यात आलं आणि एम. चिन्नास्वामी स्टेडियम असं ठेवण्यात आलं.

एम. चिन्नास्वामींचं पूर्ण नाव मंगलम चिन्नास्वामी मुदलियार. कर्नाटक क्रिकेट संघटनेचे ते जवळपास चार दशके अध्यक्ष होते, तसेच १९७७ ते १९८० दरम्यान ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही (BCCI) अध्यक्ष होते.

केवळ क्रिकेट प्रशासक होते म्हणून त्यांचं नाव स्टेडियमला दिलं असं नाही, तर या क्रिकेट स्टेडियमसाठी त्यांनी कर्नाटक क्रिकेट संघटनेला आपली जागा दान केली. त्यामुळेच त्यांचं नाव स्टेडियमला देण्यात आलं.

This stadium is solar powered

हे जगातील पहिलं स्टेडियम आहे, जेथे सौरऊर्जेवर दिवे लागतात. आहे की नाही पर्यावरणपूरक स्टेडियम! या स्टेडियमवर सौरव गांगुली आणि युवराजसिंग या डावखुऱ्या जोडीने एक विक्रम रचला आहे. झालं काय, की २००७ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान तिसरा कसोटी सामना या मैदानावर झाला होता.

या सामन्यात भारताची स्थिती ४ बाद ६१ अशी नाजूक झाली होती. मैदानावर भारताचे दोन दिग्गज डावखुरे फलंदाज खेळत होते- युवराजसिंग आणि सौरव गांगुली.

या दोघांनी भारताचा डाव सांभाळलाच नाही, तर तीनशे धावांची भक्कम भागीदारीही रचली. डावखुऱ्या फलंदाजांनी केलेली ही जगातील सर्वोच्च भागीदारी आहे. यात सौरव गांगुली यांनी २३९ धावांची द्विशतकी खेळी रचली होती. आणखी बऱ्याच आठवणींनी हे स्टेडियम ओतप्रोत भरलेलं आहे.

चिन्नास्वामी यांनी जमीन दान केली नसती तर आज हे स्टेडियम उभं राहिलं नसतं. त्यामुळे चिन्नास्वामींच्या दातृत्वाला आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वाला सलाम.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]

Related Articles

One Comment

  1. खूप छान लेख..पण अजून माहिती द्यायला हवी हाेती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!