All SportsCricketSports History

या मैदानावर आहे जगातील सर्वांत मोठा मानवी फलक

या मैदानावर आहे जगातील सर्वांत मोठा मानवी फलक

On this ground is the largest manually operated scoreboard in the world | या मैदानावर आहे जगातील सर्वांत मोठा मानवी फलक… होय, हेच ते मैदान जेथे हाताने धावफलक बदलला जातो. डिजिटल युगातही या मैदानाने पारंपरिक धावफलकाची पद्धत जपली आहे. हे मैदान आहे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियम (Green Park Stadium).

उत्तर प्रदेशात क्रिकेटची दोन आंतरराष्ट्रीय मैदाने आहेत. ही मैदाने आहेत कानपूर आणि लखनौमध्ये. त्यापैकी कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम (Green Park Stadium) सर्वांनाच परिचित असेल यात कोणतीही शंका नाही. गंगेच्या काठावर वसलेलं हे स्टेडियम सौरव गांगुली कधीही विसरणार नाही.

गांगुलीची गोलंदाजी बहरली याच मैदानावर

गांगुली तसा हाडाचा फलंदाज, पण त्याने या स्टेडियमवर २००० मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेतले होते. हे स्टेडियम रोहित शर्माही कधी विसरू शकणार नाही. कारण याच मैदानावर त्याने वन-डेतलं द्विशतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे या मैदानावर द्विशतक ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.

असं हे ग्रीन पार्क स्टेडियम. अनेक क्रिकेटपटूंची जडणघडणही या मैदानाने पाहिली आहेत. या मैदानाचं नाव ग्रीन पार्क का असेल, यामागेही इतिहास आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतात हा खेळ रुजवला, त्या ब्रिटिशांची छाप मैदानांच्या नावात तरी दिसेल किंवा बांधकाम शैलीत तरी.

on-this-ground-is-the-largest-manually-operated-scoreboard-in-the-world (1)

चाळीसच्या दशकातील ही गोष्ट आहे. ब्रिटिश लेडी मॅडम ग्रीन या मैदानावर हॉर्स रायडिंगच्या सरावासाठी यायच्या. हे मैदान तसेही गंगेच्या काठावर असल्याने कानपूरचा परिसरही हिरवागार आहे. म्हणून स्टेडियमचं नाव ग्रीन आहे असं अजिबात नाही, तर ग्रीन नावाच्या इंग्रज बाईमुळे या स्टेडियमचं नाव ग्रीन पार्क स्टेडियम असं ठेवण्यात आलं आहे.

जगातला सर्वांत मोठा मानवी धावफलक

स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे भारतातलं एकमेव असं मैदान आहे, जेथे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गॅलरी आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे जगातला सर्वांत मोठा मानवी धावफलक आहे. म्हणजे धावसंख्येचे आकडे उचलून ठेवावे लागतात. डिजिटल युगातही हा धावफलक आजही सक्षमपणे वापरला जातो हे विशेष. अर्थात, त्याच्या जोडीला व्हिडीओ स्क्रीनही आहे.

या मैदानाशी संबंधित आणखी एक आठवण आहे. डिसेंबर १९५९ मध्ये भारताने पहिल्या कसोटी विजयाची मुहूर्तमेढही याच मैदानावर रोवली. तीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध. ही किमया साधली ऑफ स्पिनर जसुभाई पटेलमुळे. आता जसूभाई अनेकांना आठवणार नाही, पण तुम्हाला सांगतो, या जसुभाईने १४ विकेट घेतल्या होत्या!

सुभाष गुप्ते हा भारतीय गोलंदाज अनेकांच्या विस्मरणात गेला असेल, पण याच कानपूरच्या मैदानावर त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध डावात ९ विकेट घेतल्या होत्या. तशा त्याने डावात दहा विकेट घेण्याचीही कामगिरी केली असती, पण ती थोडक्यात हुकली. ही दहावी विकेट लान्स गिब्सची असती, पण यष्टिरक्षक नरेन ताम्हाणे याच्याकडून त्याचा झेल सुटला… असो, तर असे हे कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम. जेव्हा जेव्हा इथे सामने होतील तेव्हा तेव्हा हे आठवणींचे चेंडू टप्पे खाणारच…

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!