बीसीसीआयच्या एजीएमने घेतले हे मोठे निर्णय
अहमदाबाद, 23 डिसेंबर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महासभेच्या 89 व्या वार्षिक बैठकीत (AGM) आयपीएलच्या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयसीसीने भारतातील जागतिक स्पर्धांवरील करातून सवलती व विविध क्रिकेट समित्यांची स्थापना या विषयांचाही यात समावेश आहे.
बिनविरोध निवडले गेलेले बीसीसीआयचे (BCCI) नवनियुक्त उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याही निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे. ब्रजेश पटेल हे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख म्हणून काम पाहतील.
अशीही अटकळे बांधली जात आहे, की बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांच्या जाहिरातींशी आणि त्यासंबंधित हितसंबंधांच्या वादग्रस्त निर्णयासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. मात्र, असे होईलच यावर अद्याप तरी स्पष्टता नाही.
आयपीएल 2022 साठी दोन नवीन संघांनाही मान्यता देण्यात येणार आहे. बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की “2021 मध्ये आयपीएलमध्ये दहा संघ असणे शक्य नाही. त्यासाठी निविदाप्रक्रिया व लिलाव करण्यास बराच कालावधी लागेल आणि इतक्या कमी वेळेत ते शक्य नाही.”
हा अधिकारी म्हणाला, “मंजुरी घेतली गेली आहे आणि २०२२ मध्ये ९४ सामन्यांची स्पर्धा होऊ शकेल.
त्याचबरोबर, आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संपूर्ण करात सवलत देण्याच्या आश्वासनासाठी मुदतीच्या मर्यादेमध्ये केवळ एक आठवडाच शिल्लक राहिला आहे. तसे न झाल्यास ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीतच खेळविली जाईल.
बीसीसीआयचे सचिव आणि गांगुली आयसीसीवर मंडळाचे प्रतिनिधी म्हणून कायम राहतील. जर बीसीसीआयने 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याला पाठिंबा दर्शविला तर बीसीसीआयची स्वायत्तता संपुष्टात येईल आणि हे मंडळ राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येईल.
बीसीसीआयच्या विविध समित्यांची निर्मितीदेखील बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. असा विश्वास आहे, की एक नवीन क्रिकेट सल्लागार समिती स्थापन केली जाईल, जी तीन सदस्यांची निवड करेल.