• Latest
  • Trending
Babe Didrikson Zaharias Biography Facts | कर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सन

Babe Didrikson Zaharias Biography Facts | कर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सन

April 26, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Friday, March 24, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Babe Didrikson Zaharias Biography Facts | कर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सन

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | महिलादिनी स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा जागर होणं स्वाभाविक आहे. मात्र, ज्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपली छाप उमटवली अशा काही महिला कालौघात विस्मरणात गेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बेब डिड्रिक्सन झहारियाज..

Mahesh Pathade by Mahesh Pathade
April 26, 2021
in All Sports, Autobiography, Inspirational Sport story, Inspirational story, Women Power
1
Babe Didrikson Zaharias Biography Facts | कर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सन
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

कर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सन


The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | महिलादिनी स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा जागर होणं स्वाभाविक आहे. मात्र, ज्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपली छाप उमटवली अशा काही महिला Biography Facts | कालौघात विस्मरणात गेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बेब डिड्रिक्सन झहारियाज (Babe Didrikson Zaharias).

बेबने इतकी मैदानं गाजवली, की थक्क व्हायला होतं. ती काय नाही खेळली! सगळ्याच खेळांत मास्टर. बास्केटबॉल, ट्रॅक, गोल्फ, बेसबॉल, टेनिस, स्विमिंग, डायव्हिंग, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बोलिंग (bowling), बिलियर्ड्स, स्केटिंग, सायकलिंग…. बापरे! ही सगळी नावं एका दमात घेतानाच धाप लागते. ती तर खेळत होती!

असा एकही खेळ नाही, जो बेबने खेळला नसेल. तिला गमतीने विचारण्यात आलं, की एखादा खेळ खेळायचा शिल्लक राहिलाय काय?

ती पटकन म्हणते, “हो, बाहुली खेळायचं राहिलं!”

तिने मैदान गाजवले, पण ते अशा काळात जेथे महिलांना पदवी शिक्षणाची दरवाजेही खुली नव्हती. भारतातच नाही, तर युरोपातही हीच स्थिती काही प्रमाणात होतीच. बेब मात्र अशा परिस्थितीला धक्का देते. बंधनं झुगारते आणि फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेते.

विसाव्या शतकातील पहिल्या सहा महिन्यात एपी (असोसिएटेड प्रेस) संस्थेने तिला ‘सर्वांत महान खेळाडू’ म्हणून गौरविले होते. ‘दि वायर सर्व्हिस’नेही तिची ‘वर्षातली सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून पाच वेळा गौरविले, एकदा ट्रॅक प्रकारात, तर पाच वेळा गोल्फर म्हणून गौरविण्यात आले.

बेबने अशा काळात कर्तृत्व गाजवलं होतं, ज्या काळात महिलांना खेळाडू म्हणून अजिबात स्वीकारलं जात नव्हतं. महिलेने खेळात येणं हेच घृणास्पद मानलं जायचं.

the legend of babe didrikson zaharias biography and facts

बेबची कौटुंबिक पार्श्वभूमी


डिड्रिक्सन परिवार नॉर्वेतून अमेरिकेत स्थलांतरित

बेबचा परिवार मूळचा नॉर्वेचा. डिड्रिक्सन परिवार नॉर्वेतून अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि अमेरिकेत साखरेसारखा मिसळला. नॉर्वेतून स्थलांतरामागचं कारण म्हणजे चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळात २७५ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळेच हे कुटुंब नॉर्वेतून अमेरिकेत स्थायिक झालं. नॉर्वेत ‘डिड्रिकसेन’ (Didriksen) म्हणून वावरणारा हा परिवार अमेरिकेशी जुळवून घेताना ‘डिड्रिक्सन’ (Didrikson) झाला. बेबचं मूळ नाव मिल्ड्रेड एल्ला डिड्रिक्सन (Mildred Ella Didrikson). अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील पोर्ट आर्थर येथे ११० वर्षांपूर्वी म्हणजे २६ जून १९११ रोजी तिचा जन्म झाला. बेबने मात्र तिच्या आत्मचरित्रात २६ जून १९१४ अशी जन्मतारीख नमूद केलेली आहे. तिच्या कब्रस्तानावर आणि बाप्तिस्मा प्रमाणपत्रावर मात्र १९११ हे वर्ष नमूद केलेलं आहे. हेच तिचं खरं जन्मवर्ष ग्राह्य धरलं जातं.

डिड्रिक्सन परिवारात बेब सात भावंडांमध्ये सहावी. आईचं नाव हन्नाह (Hannah), तर वडिलांचं नाव ओले डिड्रिक्सन (Ole Didriksen). तिची तीन मोठी भावंडे नॉर्वेत जन्मली, तर बेबसह इतर भावंडांचा जन्म पोर्ट आर्थरमधला. डिड्रिक्सन कुटुंब नंतर ब्यूमाँटमधील टेक्सास येथे स्थलांतरित झालं. त्या वेळी बेब अवघी चार वर्षांची होती.

बेब बेसबॉलमध्ये उत्तम खेळाडू होती. तिने बालपणी बेसबॉलमध्ये पाच होम रन काढल्यानंतर तिची तुलना बेब रुथ या खेळाडूशी होऊ लागली. त्याच्याच नावावरून तिचं नाव ‘बेब’ (Babe) असं ठेवण्यात आलं. मात्र तिची आई तिला ‘बेबे’ (Bebe) असंच म्हणायची.

बेबला क्रीडाकौशल्याची देणगी जन्मजातच असली तरी तिच्याकडे इतरही गुणवत्ता ठासून भरलेली होती. ती शिवणकामातही पुढे होती. तिने सीमस्ट्रेससह अनेक कपड्यांची निर्मिती केली. १९३१ मध्ये डल्लास येथे शिवणकाम चॅम्पियनशिपही जिंकली. पन्नासच्या दशकात दक्षिण टेक्सास राज्याच्या मेळाव्यात तिने पारितोषिकही मिळविले होते.

बेब खेळाडूच नव्हे, तर गायिकाही होती!


बेब अभ्यासात यथातथाच

ब्यूमाँट हायस्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. बेब अभ्यासात यथातथाच होती. आठवी इयत्तेत तिने दोन वर्षे काढली. यावरून तिच्या अभ्यासातली ‘प्रगती’ लक्षात येते; पण अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणांत तिची बरोबरी कुणीही करू शकलं नाही. आश्चर्य म्हणजे तिला गोड गळाही लाभलेला होता. ती माउथ ऑर्गनही इतका सुरेख वाजवायची, की तिची अनेक गाणी मर्क्युरी रेकॉर्ड्स लेबलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली. तिने गायलेलं ‘आय फेल्ट अ लिट्ल टीअरड्रॉप’ हे गीत इतकं लोकप्रिय झालं, की ते सर्वाधिक विकलं गेलं.

१९३० मध्ये ब्यूमाँट हायस्कूलमध्ये (Beaumont High School) बास्केटबॉल खेळत असताना तिला डल्लासमधील एका कॅज्युअल्टी कंपनीने ७५ डॉलर प्रतिमहिना पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. त्याचबरोबर आपल्या संघातही तिने खेळावं असा प्रस्ताव ठेवला.  खरं तर तिला कंपनीत सचिवपदासाठी पगार देण्यात आला होता. कारण हौशी खेळाडूचा दर्जा तिने केव्हाच गमावला होता.

बेबकडे एक तर पदवी नव्हती. कारण त्या काळात मुलींना हायस्कूलमध्ये पाठवण्यात पालकच संकोच करीत होते.

‘एएयू’ने दिली संधी

1930-32 च्या सुमारास तिला आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविण्याची संधी ऑल अमेरिकन हॉनर्सच्या (AAU All-American honors) रूपाने मिळाली. अमेरिकेतील ही संघटना हौशी खेळाडूंना संधी देते. डल्लासमधील मुक्कामात ती ट्रॅकवरही उतरली. 1930 मध्ये मैदानात उतरल्यानंतर तिने बघता बघता एएयूच्या (AAU) चार स्पर्धाही लीलया जिंकल्या.

१९३२ मध्ये बेबने एएयू चॅम्पियनशिप एकहाती जिंकली आणि १६ जुलै १९३२ रोजी तिने इव्हानस्टनमधील इलिनॉइस (Illinois) येथे ऑलिम्पिक पात्रताही गाठली.  कॅज्युअल्टी कंपनीच्या या प्रतिनिधीने ३० गुण घेतले. थक्क करणारी बाब म्हणजे प्रतिस्पर्धी संघापेक्षा ती आठ गुणांनी पुढे होती.  आणखी विशेष म्हणजे, अवघ्या तीन तासांच्या अवधीत तिने १० पैकी ८ इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. विश्वास बसणार नाही, पण तिने यापैकी पाच इव्हेंटमध्ये विजय मिळवला, तर उंचउडीत तिने प्रतिस्पर्ध्याशी बरोबरी साधली. धक्का तर पुढे आहे. तिने चार इव्हेंटमध्ये विश्वविक्रमांच्या राशी ओतल्या. भालाफेक, ८० मीटर शर्यत, उंच उडी आणि बेसबॉल थ्रोमध्ये तिने विश्वविक्रम प्रस्थापित केले.

पाच क्रीडा प्रकारांत गाठली ऑलिम्पिक पात्रता

गंमत पाहा, तिने पाच क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिकची पात्रता सिद्ध केली खरी, पण तिला या पाचही प्रकारांमध्ये भाग घेता आला नाही. कारण लॉस एंजिल्समधील ऑलिम्पिकमध्ये एका महिलेला फक्त तीन प्रकारांत सहभाग घेण्यास परवानगी होती.  नियमच तो. त्याला इलाज नव्हता. मात्र, लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये तिने अशी कामगिरी केली, ज्याला जगात तोड नव्हती. तिने भालाफेकमध्ये (१४३ फूट चार इंच) सुवर्णपदक जिंकले. ८० मीटर अडथळ्यांच्या शर्यत तिने अवघ्या ११.७ सेकंदांत पूर्ण केली. ही विश्वविक्रमी कामगिरी म्हणून नोंद झाली.

विश्वविक्रमानंतरही हाती रौप्य!

उंच उडीतही तिने विश्वविक्रमी कामगिरी केली होती; पण दुर्दैव आड आलं. झालं काय, की उंच उडीत तिच्यासह जीन स्माइले (Jean Smiley) या दोघींनी समान ५ फूट पाच इंच उंच उडीची नोंद केली. या दोघींची ही कामगिरी विश्वविक्रमी ठरली. पण बेबची अखेरची उडी अयोग्य ठरवण्यात आली. बेबने उडी घेतली तेव्हा आधी तिचे डोके बारच्या पलीकडे गेले, त्यानंतर शरीराचा उर्वरित भाग आला. त्या वेळी अशी उडी अयोग्य ठरवण्यात येत होती. (आता हा नियम वगळण्यात आला आहे.) मात्र, ही पंचांची चूक म्हणायला हवी. कारण तिने सर्व उड्या अशाच पद्धतीने घेतल्या होत्या. त्या वेळी त्या ग्राह्य धरण्यात आल्या, मात्र केवळ अंतिम उडी अवैध ठरवण्यात आली. पण या एका चुकीमुळे बेबचे सुवर्ण हुकले. त्याऐवजी जीन स्माइले हिला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं, तर बेबला रौप्य.

पुढच्या काही वर्षांतच तिने वुडविले सर्किटचा (vaudeville circuit) दौरा केला. बेबने हा दौरा ऑल अमेरिकन बास्केटबॉल टीम आणि दाढीवाल्या डेव्हिड बेसबॉल संघासोबत केला. बेब या सगळ्या स्पर्धा तर खेळतच होती, पण आता तिच्यासमोर नव्या खेळाने आव्हान उभं केलं, तो खेळ म्हणजे गोल्फ. असं नाही, की हा खेळ ती अजिबातच खेळलेली नव्हती. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना ती गोल्फही खेळून चुकली आहे. १९३३ मध्ये ती पुन्हा गोल्फकडे वळली.

the legend of babe didrikson zaharias biography and facts

गोल्फमध्ये धडाकेबाज कामगिरी

१९३५ मध्ये तिने अमेरिकेतील टेक्सास महिला अमॅच्युअर गोल्फ स्पर्धा जिंकली. तसं पाहिलं तर बेब काही हौशी खेळाडू नव्हती. ती इतर स्पर्धांमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणूनच खेळली होती. बेबने आता गोल्फ खेळणेही सुरू ठेवले. कमाल म्हणजे, एका दिवसात ती गोल्फ आणि त्याचबरोबर १७ सेटचा टेनिसही खेळायची. या खेळांमध्ये १९४३ पर्यंत ती हौशी खेळाडू म्हणूनच खेळत होती. तिने गोल्फने मारलेला चेंडू तब्बल २५० यार्डापलीकडे जाऊन पडायचा. तसं पाहिलं तर तिचं वजन 65 किलोही नव्हतं. त्यावर ती म्हणायची, तुम्ही गोल्फ हलक्या हाताने पकडायची आणि मग चेंडू तडकवायचा. बेब अनुभवातून खेळातले बारकावे अगदी सहज हेरायची. त्यामुळेच ती कोणत्याही खेळात सहजपणे पकड घ्यायची.

या आकलनशक्तीमुळेच ती गोल्फवर वर्चस्व मिळवू शकली. त्यामुळेच तिला १९४५ ते १९४७ अशी सलग तीन वर्षे एपी संस्थेने वर्षातली सर्वोत्तम महिला खेळाडू या पुरस्काराने गौरविले. उगाच या पुरस्काराने तिला गौरविलेले नव्हते. कारण १९४७ मध्ये तिने १८ पैकी १७ स्पर्धा लीलया जिंकल्या होत्या.

बेबची विचारसरणी

बेब धाडसी विचारांची होती. तिची भूमिका नेहमीच स्त्रीवादाविरोधी राहिली. तिची वेशभूषा पुरुषांसारखी असायची. विल्यम जॉन्सन आणि नॅन्सी विल्यम्सन यांनी बेबवरील ‘व्हाट्ट अ गल : दि बेब डिड्रिक्सन स्टोरी’ (Whatta-Gal!: The Babe Didrikson Story) यात म्हंटलंय, की ती ना नारीवादी होती, ना दहशतवादी, ना लिंगमुक्ती क्रांतीची प्रचारक. ती फक्त एक खेळाडू होती आणि तिचं शरीर तिच्यासाठी मौल्यवान होतं. काही लेखकांचा बेबविषयीचा दृष्टिकोन वेगळा होता. ते म्हणायचे, तिने घरीच राहावं, छानपैकी नटावं आणि टेलिफोनच्या रिंगची वाट पाहावी.

१९३० च्या सुमारास महिलांविषयी लेखकांमध्ये असलेले हे दोन टोकांचे विचार.

असं म्हणतात, की बेब स्पर्धा जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांपासून वेगळी राहायची. ती आत्मकेंद्रित होती, अभिमानी होती. थोडी गर्विष्ठही होती. नंतर तिचा गर्विष्ठपणा थोडा कमी झाला. मात्र, ती दबंग महिला होती हे नक्की.

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts

बेबला कोणत्याही पुरुषाविषयी विशेष अशी रुची दिसली नाही. मात्र, १९३८ मध्ये लॉस एंजिल्स ओपनमध्ये जॉर्ज झहारियाज या ग्रीक अमेरिकनशी जोडी जमली. जॉर्ज झहारियाज (George Zaharias) थोराड दिसायचा. तो २३५ वजनाचा पहिलवान होता, तसेच पार्ट टाइम चित्रपटांतही खलनायकाचं काम करायचा. या जॉर्जशी बेबची भेट गोल्फमुळे झाली. दोघेही हौसेने गोल्फ खेळायचे. या भेटीनंतर अकरा महिन्यांनी बेबने त्याच्याशी लग्न केलं आणि डिड्रिक्सनची बेब अखेर झहारियांची झाली. म्हणजे बेबचं नाव पुढे ‘बेब डिड्रिक्सन झहारियाज’ याच नावाने ओळखली जाऊ लागली. झहारियाज दाम्पत्याला मूल नव्हतं. म्हणून त्यांनी मूल दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना फटकारलं. त्यामुळे ते नि:संतानच राहिले.

खरं तर ती त्याची मॅनेजर, सल्लागार होऊ शकली असती, पण काही वर्षांतच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळे आली आणि जॉर्जचा बेबवरील प्रभावही कमी झाला. बेब आपला जास्तीत जास्त वेळ तिची जीवलग मैत्रीण बेट्टी डॉडसोबत (Betty Dodd) घालवू लागली. बेट्टी डॉड ही उत्तम गोल्फर होती. तिला महिलांमध्ये अजिबातच रुची नव्हती. ती बऱ्याचदा ताम्पा येथील झहारियाजच्या घरी राहायची.

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | बेब हौशी गोल्फर होती. विशेष म्हणजे तिने १९४६ च्या सुमारास सलग १३ स्पर्धा जिंकल्या! ही छोटी गोष्ट अजिबातच नव्हती.  पुढच्याच वर्षी तिने ब्रिटिश अमॅच्युअर स्पर्धाही जिंकली. अशी कामगिरी करणारी ती अमेरिकेतली पहिली गोल्फर ठरली. बेब हौशी खेळाडू, पण एखाद्या व्यावसायिक खेळाडूला लाजवेल अशी खेळत होती. तिने ५५ स्पर्धा जिंकल्या, ज्यातील तीन स्पर्धा तर अमेरिकन महिला ओपनच्या होत्या!

पॅटी बर्ग, फ्रेड कॉरकोरन यांच्यासह बेब झहारियाजने १९४९ मध्ये महिलांची व्यावसायिक गोल्फ असोसिएशन (Ladies Professional Golf Association) स्थापन केली.

वर्षभरात दहा गोल्फ स्पर्धा जिंकणारी एकमेव महिला

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | पन्नासच्या दशकात बेबने गोल्फचा ग्रँड स्लॅम पूर्ण केला.  यूएस ओपन, टायटल होल्डर चॅम्पियनशिप आणि वुमेन्स ओपन या तीन स्पर्धा तिने एकाच वर्षात जिंकल्या. खेळाडूंमध्ये ती सर्वाधिक पैसे कमावणारी महिला ठरली. एवढेच नाही, तर एका वर्षात  १० स्पर्धा जिंकणारी ती एकमेव गोल्फर होती. एक वर्ष आणि २० दिवसांत तिने ही कामगिरी केली होती. हा एक विश्वविक्रमच असून, अद्याप तो अबाधित आहे. तिने दोन वर्षे आणि चार महिन्यांत तब्बल २० स्पर्धा जिंकल्या.

the legend of babe didrikson zaharias biography and facts

बेब समलिंगी?

गोल्फर बेट्टी टॉड ही बेबची अगदी जीवलग मैत्रीण. ‘बेब’वर सुसान केलेफ (Susan Cayleff) हिने लिहिलेल्या पुस्तकात डॉडने बेबविषयी म्हंटले आहे, की मला या व्यक्तीचे (बेब) खूप कौतुक वाटते, की “मी तिच्यावर प्रेम केले. मी तिच्यासाठी काहीही करायला तयार असते.”

बेट्टी डॉड ही व्यावसायिक गोल्फर होती. बेब आणि डॉड यांची १९५० मध्ये मियामी येथील एका अमॅच्युअर गोल्फ स्पर्धेत झाली आणि त्या एका भेटीत त्यांची घट्ट मैत्री झाली. सुसान केलेफ (Susan Cayleff) हिने या मैत्रीवर लिहिले, की “बेबच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढत होता. त्यामुळे ती आपला अधिकाधिक वेळ डॉडसोबत व्यतित करू लागली. गोल्फ सर्किटच्या निमित्ताने डॉडने बेबसोबत दौरे केले. त्यानंतर जवळपास सहा वर्षे बेबच्या आयुष्यात डॉडने प्रवेश केला होता. या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या होत्या, पण त्यांनी कधीही आपल्या नात्याला ‘लेस्बियन’चा (lesbian) शब्दप्रयोग केला नाही. पण मला संशय आहे, की त्यांच्या नात्यात लैंगिक आणि रोमँटिक संबंध होते.”

निर्वाणीचे दिवस…

एप्रिल १९५३ मध्ये ब्यूमाँटमधील स्वमालकीच्या बेब झहारियाज ओपन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धा खेळविण्यात आली होती. ही स्पर्धाही तिनेच जिंकली. त्याच सुमारास तिला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारानंतर तिचा ट्युमर काढण्यात यश आले खरे, पण तत्पूर्वीच कर्करोग लिम्फ नोड्सपर्यंत पसरला होता, ज्यावर नियंत्रण मिळविणे डॉक्टरांनाही शक्य नव्हते.

१४ आठवड्यांनी म्हणजे १९५४ मध्ये तिने स्पर्धेत पुनरागमन केले आणि वेर ट्रॉफी ( Vare Trophy) जिंकली. नंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर महिनाभरातच ‘कोलोस्टोमी बॅग’ घालूनच ती स्पर्धेत उतरली आणि महिलांची प्रतिष्ठेची यूएस ओपन चॅम्पियनशिप जिंकली. उरुग्वेची फेक क्रॉकरनंतर  (Fay Crocker) ही स्पर्धा जिंकणारी ती जगातली दुसरी सर्वाधिक वयाची महिला खेळाडू ठरली. (सध्या ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्यापुढे क्रॉकर (Crocker) आणि शेरी स्टीहॉअर (Sherri Steinhauer) आहे.) हा तिचा तिसावा विजय होता. वेगवान ३० स्पर्धा जिंकणारी ती जगातली एकमेव महिला आहे. बेबने ही कामगिरी पाच वर्षे आणि २२ दिवसांत साकारली. ती सातत्याने स्पर्धा खेळत होती. याच काळात म्हणजे ऑगस्ट १९५२ ते जुलै १९५५ दरम्यान ती एलपीजीएची अध्यक्षही होती. पुढच्याच वर्षात तिने गोल्फमध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली. एपी संस्थेचा सहावा वर्षातली सर्वोत्तम खेळाडूचा बहुमानही मिळवला.

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | यश तिच्या पायाशी लोळण घेत होतं. आयुष्याची रेषा मात्र पुसट होत चालली होती. कर्करोगामुळे कंबरेच्या वेदनांनी उचल खाल्ली. १९५५ मध्ये तिला पुन्हा कर्करोगाने घेरले. त्यामुळे स्पर्धा खेळण्यावर तिला मर्यादा आल्या. मात्र, नंतर तिला वेदना असह्य झाल्या. दिवसरात्र मैदान डोक्यावर घेणाऱ्या बेबने अखेर २७ सप्टेंबर १९५६ रोजी टेक्सासच्या गॅल्वेस्टन बेटावर चिरनिद्रा घेतली. त्या वेळी बेब अवघी ४५ वर्षांची होती. तिचा मृत्यू झाला तेव्हाही ती महिला गोल्फरमध्ये अव्वल स्थानावर होती.

बेब आणि तिचा पती जॉर्ज या दोघांनी कर्करोग क्लिनिकला मदतीसाठी बेब झहारियाज फंडची स्थापनाही केली होती. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षात डिड्रिक्सन केवळ खेळाडू म्हणूनच ओळखली जात नव्हती, तर कर्करोग जागरूकतेसाठी सार्वजनिक वकील म्हणूनही ओळखली जात होती. त्या वेळी अनेक अमेरिकी कर्करोगाची तपासणी किंवा उपचार घेण्यासही नकार देत होते. अशा काळात बेबने कर्करोगाविषयी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला. तिच्या कामाची दखल दस्तूरखुद्द अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर (Dwight Eisenhower) यांनी घेतली. त्यांनी तिचा व्हाइट हाउसवर सत्कारही केला होता.

The legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts | बेबला टेक्सास प्रांतातील ब्यूमाँट येथील मायभूमीत फॉरेस्ट लॉनमध्ये दफन करण्यात आले. बेबचा अवघ्या पंचेचाळिशीतला हा प्रवास… एखाद्याला शंभर वर्षांचं आयुष्य मिळूनही ते परिपूर्ण नसतं. बेब मात्र एका आयुष्यात अनेक आयुष्ये जगली… ती खऱ्या अर्थाने कर्तृत्वस्वामिनी होती. दावा नाही, तर आत्मविश्वास आहे, असं चौरस व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही…!

Follow us :

The legend of Babe Didrikson Zaharias Biography FactsThe legend of Babe Didrikson Zaharias Biography FactsThe legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts
The legend of Babe Didrikson Zaharias Biography FactsThe legend of Babe Didrikson Zaharias Biography FactsThe legend of Babe Didrikson Zaharias Biography Facts

Read more at:

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

February 11, 2023
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

February 16, 2023
Tags: Babe Didrikson Zahariasthe legend of babe didrikson zaharias biography and factsकर्तृत्वस्वामिनी बेब डिड्रिक्सनडिड्रिक्सनबेब डिड्रिक्सनबेब डिड्रिक्सन झहारियाज
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
ICC CEO Manu Sawhney sent on leave

आयसीसीच्या सीईओंना पाठवले सुटीवर! ही आहेत कारणे...

Comments 1

  1. Pingback: जॅकी जॉयनर : मैदान गाजविणारी ‘फर्स्ट लेडी’ - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!