All Sportssports newswrestling

सुशील कुमारचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले… | Sushil Kumar’s dream of playing in the Olympics was shattered

सुशील कुमारचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले…


Sushil Kumar’s dream of playing in the Olympics was shattered | ७४ किलो वजनगटात अमित धनखड खेळणार.

गत आशियाई विजेता अमित धनखडने (74 किलो) आगामी विश्व ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्ती संघातील राष्ट्रीय विजेता संदीप मान याची जागा घेतली आहे. हा बदल करताना कुस्ती महासंघाने (WFI) सुशील कुमारकडे (Sushil Kumar) साफ दुर्लक्ष केले आहे.

Sushil Kumar’s dream of playing in the Olympics was shattered | यामुळे अनुभवी पहिलवान सुशील कुमारचे ऑलिम्पिक खेळण्याचे मार्ग जवळजवळ बंद झाले आहेत. कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविण्यासाठी ही अखेरची स्पर्धा आहे. बल्गेरियातील सोफिया येथे 6 ते 9 मेदरम्यान ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार आहे.

Sushil Kumar’s dream


बीजिंग 2008 मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सुशील कुमारने लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे तो देशातील सर्वांत प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे. निवडीसाठी आपल्या नावाचा विचार न झाल्याने ३७ वर्षीय सुशील कुमार म्हणाला, ‘‘या संकटकाळात जिवंत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. मी अद्याप भारतीय कुस्ती महासंघाशी (WFI) चर्चा केलेली नाही. लवकरच त्यांच्याशी चर्चा करीन’’

सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रकात डब्लूएफआयने सांगितले, की निवड समितीची बैठक झाल्यानंतर कुस्ती संघाची निवड केली जाईल. धनखडशिवाय फ्री स्टाइल संघात सत्यव्रत कादियान (97 किलो) आणि सुमित (125 किलो) यांना स्थान मिळाले आहे. डब्लूएफआयने सांगितले, की फ्रीस्टाइलमध्ये समितीने 74 किलो वजनगटात बदल केला आहे. आशियाई क्वालिफायर आणि आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात आलेल्या संदीप मानने समाधानकारक कामगिरी केलेली नाही. त्यामुळे समितीने अमित धनखडला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 16 मार्च रोजी झालेल्या निवड चाचणीत धनखडने दुसरे स्थान मिळवले होते.

ग्रीको रोमन संघातही मोठे बदल


Sushil Kumar’s dream of playing in the Olympics was shattered | ग्रीको रोमन संघात सचिन राणा (60 किलो), आशू (67 किलो), गुरप्रीत सिंह (77 किलो), सुनील (87 किलो), दीपांशू (97 किलो) आणि नवीन कुमारला (130 किलो) संधी दिली आहे. डब्लूएफआयने सांगितले, की ग्रीको रोमनमध्येही समितीने 60 किलो आणि 97 किलो गटात बदल करण्यात आला आहे. या वजनगटांत निवडण्यात आलेल्या पहिलवानांमध्ये जानेंद्र आणि रवी या दोघांचीही कामगिरी आशियाई पात्रता आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये निराशाजनक आहे. त्यामुळे समितीने सचिन राणा आणि दीपांशूला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही खेळाडू निवड चाचणीत दुसऱ्या स्थानावर होते. भारतीय महिला संघात सीमा (50 किलो), निशा (68 किलो) आणि पूजा (76 किलो) यांना स्थान देण्यात आले आहे.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”73,97″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!