या दिवशी मिताली होणार निवृत्त
Mithali will retire on this day | भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने Mithali Raj | अखेर निवृत्तीचा मुहूर्त निवडला. न्यूझीलंडमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या वन-डे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर मितालीने निवृत्ती घेण्याचे संकेत 24 एप्रिल रोजी दिले. या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर अडतीस वर्षीय मितालीचा 23 वर्षांचा क्रिकेट प्रवास थांबणार आहे. मितालीने सांगितले, की मी न्यूझीलंडच्या जिवंत खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजीचा पर्याय आम्ही शोधत आहोत.
‘1971: दि बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस’ या पुस्तकाच्या आभासी प्रकाशन सोहळ्यात मिताली राजने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ती म्हणाली, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला 21 वर्षे झाली आहेत. मला ठाऊक आहे, की 2022 हे माझे निवृत्तिवर्ष असेल. ही निवृत्ती विश्वकरंडक स्पर्धेनंतर होऊ शकते.’’
‘1971: दि बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस’ हे पुस्तक हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केले आहे. बोरिया मजुमदार आणि गौतम भट्टाचार्य या पुस्तकाचे लेखक आहेत. मितालीने सांगितले, ‘‘2020 हे वर्ष माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 20 वर्षांइतकं होतं.’’
मिताली एकमेव महिला फलंदाज आहे, जिच्या नावावर वनडेमध्ये 7000 पेक्षा अधिक धावा आहेत. मितालीने कोविड-19 महामारीदरम्यान तिने स्वत:ला सकारात्मक ठेवले. ती म्हणाली, ‘‘मला माहीत आहे, की आपण एका कठीण प्रसंगातून जात आहोत. मात्र, मी स्वत:ला तंदुरुस्त राखण्यासाठी बरंच काही केलं. तसंही माझं वय काही कमी होणार नाही. मात्र, वय जसजसं वाढतं, तसतसं तंदुरुस्तीचं महत्त्व मी जाणून आहे.’’
ती म्हणाली, ‘‘भावनात्मक रूपाने मजबूत राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे, की विश्वकप स्पर्धेनंतर फारच कमी प्रवास दौरे होतील.’’
भारतीय महिला संघाला द्विपक्षीय पातळीवर चार मालिका खेळायच्या आहेत. यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील दौऱ्यांचा समावेश आहे. याचदरम्यान वेस्ट इंडीजविरुद्धा स्थानिक मालिकांचाही यात समावेश आहे. मिताली म्हणाली, ‘‘आता प्रत्येक दौरा माझ्यासाठी एक फलंदाज म्हणून खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मला विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघही उभा करायचा आहे. त्यांची एकजूट करायची आहे.’’
मिताली सांगितले, ‘‘आणि हो, मी मुलींना पाहून खूप सकारात्मक आहे. त्या कमी वेळेत तयार होत आहेत. त्यांची एकाग्रता, उत्साह आगामी मालिकांवर केंद्रित झालं आहे.’’ मितालीने हे मान्य केलं, की वेगवान गोलंदाजी हा असा विभाग आहे, ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे. भविष्यात वेगवान गोलंदाजांची फळी उभारण्याची गरज आहे. कारण झूलन गोस्वामीही सध्या करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे.
Mithali will retire on this day | मितालीने Mithali Raj | सांगितले, ‘‘आम्हाला नक्कीच काही खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी ते महत्त्वाचे आहे.’’
महान क्रिकेटपटू सुनील गावस्करही पॅनलमध्ये सहभागी होते. त्यांनी मितालीला काही सल्ले दिले. गावस्कर यांना वाटते, की मितालीच्या संघाने विराट कोहलीच्या संघासारखा भीती न बाळगता प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हान देण्यास शिकले पाहिजे.
गावस्कर म्हणाले, ‘‘मी माझ्या पत्नीसोबत लॉर्ड्सवर 2017 महिला वनडे विश्वकप फायनल पाहत होतो. मी पाहिले, की इंग्लंडच्या खेळाडूने तळातल्या फलंदाजांना त्रासून सोडले होते. आपल्या हावभावांनी तिने सर्वांना घाबरवून सोडले होते.’’
गावस्कर म्हणाले, ‘‘मला मुलींना हेच सांगायचंय, की त्यांनी खाली पाहण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यांत पाहिले पाहिजे. मला वाटते, की ‘बॉडी लँग्वेज’ महत्त्वाचा पैलू आहे. विराट कोहलीला पाहा, तो प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवतो. नंतर संपूर्ण संघ तशाच पद्धतीने पाहू लागतो.’’
Comments 1