जम्बो पुरस्कारांवरून टीका
यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची जम्बो यादी अनेकांना खटकली. यावरून क्रीडा क्षेत्रात टीकाही झाली.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारा पहिलवान सुशील कुमारने या जम्बो यादीवर टीका केली आहे. Sushil Kumar questions of awards | तो म्हणाला, की या जम्बो यादीमुळे पुरस्कारांची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.
निवड समितीने आवश्यकतेपेक्षा अधिक नावांची शिफारस केल्याने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.

निवड समितीने खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा पाच, तर अर्जुन पुरस्कारासाठी २९ नावांची शिफारस केली होती. यातील दोन नावांवर फुली मारल्याने २७ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर क्रीडा क्षेत्रात तो चर्चेचा विषय झाला आहे.
Sushil Kumar questions of awards | सुशील कुमारने थेट टीका केली नसली तरी जम्बो यादीवर नाराजी नक्कीच व्यक्त केली आहे. एवढ्या खेळाडूंना पुरस्कार दिले तर या पुरस्कारांची प्रतिष्ठा कमी होईल.
सुशील कुमार म्हणाला, ‘‘ज्यांच्या नावांची शिफारस केली, त्यांचं मी कौतुक करतो. मात्र, मला वाटते, की राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही यादी कमी करायला हवी आणि हे काही ऑलिम्पिक वर्ष नाही.’’
Sushil Kumar questions of awards | यापूर्वी २०१६ मध्ये सरकारने रिओ ऑलिम्पिकमधील उत्तम कामगिरीबद्दल चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार प्रदान केला होता. यात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पहिलवान साक्षी मलिक, जिम्नास्ट दीपा करमाकार आणि नेमबाज जीतू राय यांचा समावेश होता.
यंदा रोहित शर्मा, पहिलवान विनेश फोगाट, महिला हॉकीपटू राणी रामपाल, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक मिळविणारा मरियप्पन थांगवेलू यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार तर तब्बल २७ खेळाडूंना प्रदान करण्यात आले.
बीजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये कांस्य आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सुशील कुमारने सांगितले, की हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, की ज्या खेळाडूंना यापूर्वीच सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी देण्यात आले असताना त्या खेळाडूंच्या नावाची शिफारस त्यापेक्षा छोट्या पुरस्कारासाठी का केली गेली?
(सुशील कुमारचा रोख साक्षी मलिकच्या नावाची शिफारस करण्यावर होता. साक्षी मलिकचा दावा)
सुशील कुमार म्हणाला, ‘‘एवढेच नाही, तर ज्या कामगिरीच्या आधारावर यापूर्वी खेळाडूला पुरस्कार मिळाला आहे, त्याच कामगिरीवर पुन्हा विचार करण्यात आला आहे. ’’
क्रीडामंत्री रिजिजूंनी दिले हे कारण
क्रीडा क्षेत्रातून सरकारवर कडाडून टीका झाल्यानंतर अखेर क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्यावर भाष्य केले.
सरकारचा बचाव करताना रिजिजू म्हणाले, ‘‘आपल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. जेव्हा आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतात तेव्हा त्यांचं कौतुक आणि पुरस्कारांनी सन्मानित करायला हवं. जर सरकारने या खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं नाही तर त्यांच्या क्रीडाप्रतिभेचा उत्साह कमी होईल.’’
ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खेळाडूंची कामगिरी उत्तम असल्याने खेळाडूंची संख्या वाढली आहे.’’
पुढे त्यांनी अशीही पुस्ती जोडली, की क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. या विजेत्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र निवड समितीने केली आहे.