Tennis

Petra Kvitova reaches first French Open quarter-final since 2012

 

Petra Kvitova reaches first French Open quarter-final since 2012 |
पेत्रा क्विटोवा 2012 नंतर प्रथमच
फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत


Follow us

[jnews_footer_social ]

पॅरिस | विम्बल्डन स्पर्धेचे दोन वेळा विजेतेपद मिळविणारी चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्विटोवा (Petra Kvitova) हिने आठ वर्षांत प्रथमच फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी (French Open quarter-final ) गाठली आहे. 2012 मध्ये तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

पेत्रा क्विटोवा हिला फ्रेंच ओपनमध्ये सातवे मानांकन आहे. तिने चीनच्या झांग शुआई (Zhang Shuai) हिचा 6-2, 6-4 असा पराभव केला. 2012 मध्ये रोलां गॅरोमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर पेत्राला फ्रेंच ओपनमध्ये फारशी कमाल करता आलेली नव्हती.

पहिल्या सेटमध्ये 2-5 अशा पिछाडीवर पडलेल्या झांगने मेडिकल टाइम आउट घेतला होता. रोलां गॅरोमध्ये प्रचंड थंडी आहे. मेडिकल टाइम आउट दरम्यान क्विटोवाने थंडीपासून बचावासाठी गुलाबी रंगाचा कोट परिधान केला होता.

तीस वर्षीय क्विटोवासमोर पुढच्या फेरीत बिगरमानांकित लॉरा सीगमंडचे आव्हान आहे. जर्मनीच्या सीगमंडने स्पेनच्या पॉला बादोसा हिचा 7-5, 6-2 असा पराभव करीत प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

स्पर्धेत मर्यादित प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात आली आहे. किमान एक हजार प्रेक्षक या स्पर्धेत रोज हजेरी लावू शकणार आहेत.

[jnews_hero_8 include_category=”90″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!