Amit Mishra ruled out of IPL 2020
अमित मिश्रा आयपीएलबाहेर
Follow us
10/06/2020
दुबई | उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) याला यंदाचे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2020) सत्र अर्ध्यावरच सोडावे लागणार आहे. तो आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत दिसणार नाही.
शारजाहमध्ये कोलकाता नाइटरायडर्स (केकेआर) विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. केकेआरविरुद्ध 3 ऑक्टोबर 2020 रोजी हा सामना खेळविण्यात आला होता. त्या वेळी 37 वर्षीय अमित मिश्रा amit mishra age | नीतीश राणाचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात जखमी झाला.
वेदना होत असतानाही त्याने गोलंदाजी पूर्ण केली. अशा परिस्थितीतही त्याने शुभमन गिलची विकेटही घेतली. मिश्राच्या उजव्या हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर आहे. त्यामुळेच त्याला आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा धक्का आहे. मिश्राने आयपीएलच्या मोसमात amit mishra ipl 2020 | तीन सामने खेळले आहेत. त्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांत दोन, केकेआरविरुद्ध 14 धावांत एक विकेट घेतली होती.
Amit Mishra ruled out of IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने चार षटकांत 23 धावा दिल्या होत्या.
Amit Mishra ruled out of IPL 2020 | आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 160 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या स्थानावर लसिथ मलिंगा आहे. त्याने 170 विकेट घेतल्या आहेत.
अमित मिश्राला यंदाच्या आयपीएलमध्ये मलिंगाला मागे टाकण्याची संधी होती. केवळ दहा विकेट घेणे मिश्राला फारसे अवघड नव्हते. मात्र, आयपीएलमधून बाहेर व्हावे लागल्याने हा विक्रम यंदा तरी हुकला आहे.