All SportsTennisTokyo Olympic 2020

ऑलिम्पिकमधील पेसच्या कांस्याला सोन्याची चमक

ऑलिम्पिकमधील पेसच्या कांस्याला सोन्याची चमक

olympic tennis india | सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारत ‘सिफर’चा (पदकांचा दुष्काळ) सामना करीत होता. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्येही भारताचे हात रिकामेच राहणार की काय, अशी परिस्थिती होती. मात्र, जेव्हा टेनिस कोर्टवर लिएंडर पेसने (Leander Paes) पाऊल ठेवले तेव्हा भारतीयांच्या मनात पदकाची आशा पल्लवित झाली. त्याच्या चमत्कारिक प्रदर्शनाने भारताने कांस्यपदक जिंकले. दिग्गज खेळाडू आजही हे पदक सर्वोत्तम मानतात. पेसचं हे पदक कांस्य असले तरी भारतीयांसाठी या पदकाची चमक सोन्यापेक्षा कमी नव्हती. कारण 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हॉकीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सलग तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे हात रिकामेच राहिले. 1984 चे लॉस एंजिल्स ऑलिम्पिक, 1988 चे सिओल ऑलिम्पिक आणि 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये भारत एकही पदक जिंकू शकला नाही.

1924 मध्ये ऑलिम्पिकमधून टेनिस आउट

olympic tennis india | ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले असले तरी ती सांघिक कामगिरी होती. 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक कांस्यपदक जिंकले होते. त्यांनी फ्रीस्टाइलमध्ये 57 किलो वजनगटात ही कामगिरी केली होती. हा एक अपवाद सोडला तर वैयक्तिक पदक भारताला जिंकता आलं नाही. क्रिकेटप्रेमी भारतात टेनिसचं महत्त्व तरी किती असणार? तसंही 1924 मध्ये टेनिसला ऑलिम्पिक खेळांतून आउट केले होते. म्हणजे ऑलिम्पिक खेळांच्या यादीतून टेनिसची गच्छंती झाली. मात्र 1988 मध्ये या खेळाने पुनरागमन केलं.

1992 मध्ये पेस जिंकला असता…

खरं तर लिएंडर पेसला 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्येच पदक जिंकण्याची संधी होती. बार्सिलोनातील टेनिस कोर्टवर ज्या वेळी लिएंडर पेस उतरला त्या वेळी तो अवघ्या 19 वर्षांचा होता. तो रमेश कृष्णन यांच्यासोबत पुरुष दुहेरीत उतरला होता. मात्र या भारतीय जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. जॉन बासिल फिटजगेराल्ड आणि टॉड अँड्रयू वुडब्रिज या ऑस्ट्रेलियन जोडीने भारतीय जोडीला पराभूत केले होते. जर हा सामना जिंकला असता तर भारतीयांचे कांस्यपदक निश्चित होते. कारण उपांत्य फेरीत पोहोचल्यावर कांस्यपदक दिले जाते. मात्र, अंतिम आठमध्ये भारतीय जोडीच्या पराभवाने ऑलिम्पिक पदक मिळविण्याचं स्वप्न भंगलं.

ऐतिहासिक कामगिरीकडे पेसची पावलं…

olympic tennis india | लिएंडर पेसने यानंतर एकेरीकडे लक्ष केंद्रित केलं. पुढच्या चार वर्षांत त्याची मेहनत कामी आली. अटलांटा ऑलिम्पिकमध्ये जागतिक क्रमवारीत 127 व्या स्थानावर असताना त्याला वाइल्ड कार्ड मिळविण्यात यश आलं. या ऑलिम्पिक अभियानात त्याने रिची रेनबर्ग, निकोलस पिरेरिया, थॉमस एंक्विस्ट आणि डिएगो फुरलान यांना पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. आता पुढचं आव्हान कठीण होतं. कारण या वेळी त्याच्यासमोर अमेरिकेचा दिग्गज खेळाडू आंद्रे आगासी याचे कडवे आव्हान होते. पेस हा सामना नेटाने लढला. पहिल्या सेटमध्ये त्याने आगासीला कडवी लढत दिली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याचा निभाव लागू शकला नाही. आगासीने पेसला 7-6, 6-3 असे पराभूत केले. या दरम्यान पेसच्या मनगटाला दुखापत झाली.

मनगटाच्या वेदनांवर मात करीत कांस्यवर मोहोर

पुढची लढत कांस्यपदकासाठी होती. या वेळी त्याच्यासमोर आव्हान होतं ब्राझीलच्या फेरांडो मेलिगेनीचं. नेमक्या या लढतीत त्याच्या मनगटाच्या दुखापतीने डोके वर काढले. फेरांडोने पहिला सेट 6-3 असा जिंकला. पेसने आता आपल्या वेदनांची पर्वा केली नाही. त्याने जोरदार वापसी करीत पुढचे दोन्ही सेट जिंकले. पेसने हा सामना 3-6, 6-2, 6-4 असा जिंकला आणि भारतीयच नव्हे, तर क्रीडाविश्वाच्या नजरा विस्फारल्या. तीन ऑगस्ट 1996 हा दिवस भारतीय क्रीडाप्रेमी कधीही विसरणार नाही. वैयक्तिक प्रकारात भारताच्या नावावर हे दुसरंच कांस्यपदक होतं.

पेस-भूपती वादाने भारताचे हात रिकामे

olympic tennis india | एकेरीत ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर पेसने 2000 ची सिडनी ऑलिम्पिक, 2004 ची अथेन्स ऑलिम्पिक, 2008 बीजिंग ऑलिम्पिक, 2012 ची लंडन आणि 2016 मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. मात्र, पदक जिंकू शकल नाही. एकेरी आणि पुरुष दुहेरीतील त्याच्या सर्वोत्तम जोडीदारांपैकी एक महेश भूपतीलाही सिडनी ऑलिम्पिकमध्ये विशषेष यश मिळू शकलं नाही. अथेन्स ऑलिम्पिकपूर्वी पेस आणि भूपती ही जोडी फुटली. मात्र, देशासाठी त्यांनी पुन्हा एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही पेस आणि भूपती यांच्यातील वाद अधूनमधून डोके वर काढतच होते. त्यांची मने कधी जुळली नाहीत. चार वर्षांनी पेस आणि भूपती यांच्यातले वादाच्या ठिणग्या जगजाहीर झाल्या. त्याचा फटका बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोघांनाही बसला. ही जोडी पुन्हा निष्प्रभ ठरली. बीजिंगमध्ये ही जोडी भारताला पदक मिळवून देऊ शकली नाही.

जोड्या जुळल्या, पण मने नाहीत…

olympic tennis india | लंडन ऑलिम्पिकपूर्वी भारतीय टेनिस खेळाडूंमधील मतभेद पुन्हा समोर आले. एआयटीएने बरीच मनधरणी केल्यानंतरही भूपती आणि रोहन बोपण्णा या दोन्हींपैकी कोणीच पेससोबत खेळण्यास तयार झाले नाहीत. अखेर एआयटीएला नाइलाजाने भूपती आणि बोपण्णा, तसेच पेस आणि विष्णू वर्धन या जोड्यांना ऑलिम्पिकच्या महायुद्धात पाठवावे लागले. या निर्णयाने पेसने उघड नाराजी व्यक्त केली. पेसने धमकीच दिली, की मिश्र दुहेरीत मी सानिया मिर्झासोबतच खेळेन; अन्यथा ऑलिम्पिकमधून मी माझे नाव मागे घेईन. खरं तर सानियाची भूपतीसोबत खेळण्याची इच्छा होती. मात्र, एआयटीएने पेससोबत तिची जोडी बनवली. एकूणच या घडामोडींचा परिणाम ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पाहायला मिळाला. एकही भारतीय जोडी पदकाच्या जवळपासही जाऊ शकली नाही. यानंतरही भारतीय टेनिसमधील वाद शमले नाहीत. संघनिवडीची ही कटकट रियो ऑलिम्पिकमध्येही (2016) पाहायला मिळाली. बोपण्णाने पेसला आपला जोड़ीदार बनविण्यावर थेट नाराजी व्यक्त केली. मारूनमुटकून बनविलेली ही भारतीय जोडी रियोच्या भूमीत पहिल्याच फेरीत पराभूत झाली. महिला दुहेरीतही भारताच्या पदरी निराशा पडली. टेनिस स्टार सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे या जोडीनेही पहिल्याच फेरीत घरची वाट धरली. सानिया आणि बोपण्णा या मिश्र दुहेरीतल्या जोडीने किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, या जोडीला अँडी मरे आणि हीथर वॉटसन जोडीने 6-4, 6-4 पराभूत केले. मिश्र दुहेरीतही ऑलिम्पिक पदकाच्या भारताच्या आशा संपुष्टात आल्या.

…तर भारतीय टेनिससाठी टोकियो ऑलिम्पिक अखेरची

olympic tennis india | आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताच्या आशा सानिया मिर्झावर आहेत. सानिया आणि अंकिता रैना आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सानिया ऑलिम्पिकमध्ये चौथ्यांदा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. सर्वाधिक वेळा भारताकडून ऑलिम्पिक खेळणारी ती पहिलीच भारतीय महिला असेल. याउलट तिची जोडीदार अंकिता प्रथमच ऑलम्पिक खेळणार आहे. पुरुष एकेरी किंवा दुहेरीत कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी आता ऑलिम्पिक तिकीट मिळणं जवळजवळ अशक्य आहे. भारतीय टेनिससाठी ही लाजिरवाणी बाब आहे. अंतर्गत कलह, खालावलेली कामगिरी… हे असंच सुरू राहिलं तर भारतीय टेनिस पुढच्या ऑलिम्पिकमध्ये दिसणार नाही…

Follow us

olympic tennis india olympic tennis india olympic tennis india olympic tennis india olympic tennis india olympic tennis india

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!