Uncategorized

Navid Afkari Executed | धक्कादायक! इराणच्या कुस्तीपटूला फाशी!!

Your Content Goes Here

धक्कादायक! इराणच्या कुस्तीपटूला फाशी!!


इराणने कुस्तीपटू नाविद अफकारी याला फाशीची शिक्षा दिली आहे. Navid Afkari Executed | या घटनेने जगभरात खळबळ माजली आहे. इराण सरकारविरुद्ध आंदोलनात सहभाग घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता. 

त्याला क्षमा करावी, यासाठी इराण सरकारकडे जगभरातून मागणी केली जात होती. मात्र, इराणी सरकारने कोणालाही जुमानले नाही. एवढेच नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराण सरकारला फाशी रद्द करण्याचे आवाहन केले होते. 

इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांचे आवाहन फेटाळून लावत पहिलवान नाविद अफकारी (वय 27) याला फाशी दिली. Navid Afkari Executed | असे समजते, की नाविदला शिराजमध्ये १२ सप्टेंबर २०२० रोजी फाशी देण्यात आली. 

नाविदने दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. तेव्हापासूनच तो इराणी सरकारच्या निशाण्यावर होता. Navid Afkari Executed | अॅम्नेस्‍टी इंटरनॅशनलने त्याचा खून झाल्याची शंका व्यक्त केली होती. 

नाविदला फाशी देण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून नाविदची फाशी रद्द करण्याचे आवाहन इराण सरकारला केले होते. त्यांनी ट्वीट करतान म्हंटले होते, की “नाविदला माफ केल्यास मी इराणच्या नेत्यांचा आभारी राहीन” 

दोलनादरम्यान एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नाविदला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. असाही आरोप होत आहे, की नाविदचा छळ करून त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेण्यास भाग पाडले.

कोण होता नाविद?

Navid Afkari Executed नाविद फ्रीस्‍टाइल आणि ग्रीको रोमन पहिलवान होता. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याप्रकरणी नाविदचा भाऊ वाहिद (वय 54) आणि हबीब (वय 27) यांना तुरुंगात धाडण्यात आले होते.

ट्रम्प यांनी सांगितले, की नाविदचा एवढाच गुन्हा होता, की त्याने सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. इराणी प्रशासनाने नाविदच्या भावांचाही अनन्वित छळ केल्याचा आरोप होत आहे.

नाविदची फाशी रद्द करण्यासाठी जगभरातील खेळाडूंनी आवाहन केले होते. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने जाहीर केले, की पहिलवान नाविदला एका व्यक्तीच्या खून प्रकरणात फाशी दिली आहे.

ही फाशी शिराजच्या आदिलाबाद कारागृहात देण्यात आल्याचे सांगण्यात येते. नाविद या 27 वर्षीय इराणी पहिलवानाने फ्रीस्‍टाइल आणि ग्रीको-रोमन कुस्तीत राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळविली होती.

Follow us…

[jnews_footer_social social_icon=”circle”]
[jnews_slider_3 post_offset=”3″ include_category=”73″]

Your Content Goes Here

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!