श्रीलंकेत होणार एलपीएल
कोलंबो : संयुक्त अरब अमिरातमध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू होत असतानाच आता श्रीलंकेतील पहिल्या लंका प्रीमियर लीगचीही चर्चा सुरू झाली आहे. LPL in Sri lanka | एलपीएलच्या LPL | लिलावात अनेक दिग्गज खेळाडू नशीब आजमावत आहेत.
LPL in Sri lanka | या खेळाडूंमध्ये भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेल, वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमीसह 150 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंवर एक ऑक्टोबरमध्ये बोली लागणार आहे.
पाकिस्तानचा शाहीद अफरीदी, बांग्लादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन, वेस्ट इंडीजचा डेरेन ब्राव्हो, इंग्लंडचा रवी बोपारा आणि दक्षिण आफ्रिकेचे वेर्नोन फिलँडर, तसेच कॉलिन मुनरो यांच्यावरही बोली लागणार आहे. एलपीएलच्या LPL | पहिल्या सत्रात पाच संघ असतील.
LPL in Sri lanka | एलपीएल 14 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. यापूर्वी ही लीग ऑगस्टमध्ये होणार होती. मात्र, करोना महामारीमुळे ती स्थगित करण्यात आली.
क्रिकेट संन्यास घेतलेल्या मुनाफ पटेलने भारतासाठी 13 कसोटी, 70 वन डे आणि तीन टी 20 सामने खेळले आहेत. तो 2011 मधील विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघातही होता.
LPL in Sri lanka | एलपीएलमधील प्रत्येक संघ सहा विदेशी खेळाडूंना खरेदी करू शकते आणि प्रत्येक संघात एकूण 19 खेळाडू असतील. एलपीएलचे सामने दाम्बुला, पल्लेकेले आणि हम्बनटोटा येथे खेळविले जाणार आहेत.
श्रीलंका सरकारने खेळाडू, अधिकारी आणि प्रसारण स्टाफसाठी क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. कारण श्रीलंका क्रिकेटने १४ दिवसांऐवजी सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी करण्याची विनंती केली आहे.
Follow us
Read more...
Your Content Goes Here