All SportsOther sportssports news

नरेंद्र यादवची एव्हरेस्ट मोहीम बनावट! Narendra Yadav’s Everest expedition fake!

नरेंद्र यादवची एव्हरेस्ट मोहीम बनावट!

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी

गिर्यारोहक नरेंद्र यादव Narendra Yadav | याने गेल्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर Everest expedition | केल्याचा दावा केला होता. त्यानुसार त्याची तेन्झिंग नोर्गे पुरस्कारासाठी शिफारसही करण्यात आली होती. मात्र, त्याने जी कागदपत्रे जोडली, ती बनावट असल्याचं समोर आलं आहे. Narendra Yadav’s Everest expedition fake!  त्यामुळे त्याला आता हा पुरस्कार मिळणार नसल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

यादव आणि त्याची सहकारी गिर्यारोहक सीमा रानी यांना बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 रोजी नेपाळ सरकारने सहा वर्षांसाठी गिर्यारोहणास मनाई केली आहे. त्यामुळे या दोन्ही गिर्यारोहकांना नेपाळमध्ये एव्हरेस्ट सर करता येणार नाही.

जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या एव्हरेस्ट पर्वतावर यादव व रानी यांनी 2016 मध्ये यशस्वी मोहीम राबविल्याची खोटी कागदपत्रे सादर केली होती. या खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांना जे प्रमाणपत्र देण्यात आले होते, ते आता रद्द करण्यात आले आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, ‘‘आमच्या बाजूने नरेंद्रसिंह यादवचा मुद्दा संपला आहे. मंत्रालयाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे, की नरेद्रसिंह यादवने माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटा आहे. त्याने बनावट छायाचित्रे सादर केली होती.’’

हा अधिकारी म्हणाला, ‘‘एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटा असल्यानेच 2020 च्या तेंन्झिंग नोर्गे पुरस्काराच्या यादीतून त्याचे नाव वगळले आहे. आता त्याला हा पुरस्कार मिळणार नाही.’’

यादवच्या नावाची शिफारीश आधी देशातील आघाडीच्या साहसी क्रीडा पुरस्कारासाठी करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याने बनावट कागदपत्रे सादर केल्याची शंका माध्यमांनी केली होती. त्यामुळे त्याच्या नाव या यादीतून वगळण्यात आले होते.

या प्रकरणी चौकशीसाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. समितीने केलेल्या तपासणीत यादवची कागदपत्रे बनावट निघाली.

अधिकाऱ्याने सांगितले, की चौकशी समितीत क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशिवाय दिल्लीच्या इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनचे प्रतिनिधीचा समावेश होता. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन ही देशातील एव्हरेस्टशी संबंधित सर्वोच्च संस्था आहे.

इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनला केंद्र सरकार आणि अंतराष्ट्रीय फेडरेशन ऑफ स्पोर्ट क्लाइबिंग या दोघांची मान्यता आहे.

नेपाळच्या सरकारनेही नरेंद्र यादव आणि रानी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. नेपाळच्या संस्कृती, पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने बुधवारी यादव आणि रानी यांच्यासह टीमचा नायक नाबा कुमार फुकोनला गिर्यारोहणाशी संबंधित मोहिमांवर सहा वर्षासाठी निर्बंध घातले आहेत.

एव्हरेस्ट सर केल्याबद्दल त्यांना जे प्रमाणपत्र देण्यात आले होते, तेही रद्द करण्यात आले आहे.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”76″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!